PM Poshan Menu 2024-25 Update - शासन निर्णयानुसार नवीन निश्चित केलेल्या पाककृती शालेय पोषण आहार वेळापत्रक प्रमाण
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत (शालेय पोषण आहार योजना) योजनेस पात्र शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मध्यान्ह भोजन दिले जाते. सर्व पात्र शाळांना धान्यादी वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी, संदर्भ क्र. 3 अन्वये, सन 2024-25 करीता संचालनालयाकडून नियुक्त पुरवठादार नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अॅन्ड रिटेलिंग को ऑप ऑफ इंडिया लि., नागपूर (NACOF) यांचेमार्फत आवश्यक तांदूळ, भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून उचल करुन शाळा स्तरापर्यंत वाहतूक करणे आणि आवश्यक असणा-या धान्यादी मालाचा पुरवठा करुन घेण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत संदर्भ क्र. १ शासन निर्णयान्वये, सन २०२४-२५ पासून १५ प्रकारच्या पाककृर्तीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सदर पाककृतीचा तपशिल सोबतचे परिशिष्ठ अ, ब, व क मध्ये देण्यात आलेला आहे.
संदर्भ क्र. २ संचालनालयाकडील पत्रान्वये, तीन संरचीत आहार विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी "परिशिष्ट-अ नुसार पाककृती प्रमाणे आहार शिजवून दिल्यानंतर शिल्लक राहीलेल्या तांदुळापासुन तांदळाची खीर (परिशिष्ट ब) आणि शिल्लक राहणाऱ्या भाजीपाला / मोड आलेले कडधान्य यांची कोशिंबीर (परिशिष्ट क) अशा प्रमाणे तीन परिशिष्टानुसार विद्यार्थ्यांना दैनंदीन आहार पुरवणे बंधनकारक आहे.
परिशिष्ट- अ" मधील पाककृतीप्रमाणे तांदळाचे प्रमाण इयत्ता १ ली ते ५ वी साठी ८० ग्रॅम व इयत्ता ६ वी ते ८ वी साठी १२० ग्रॅम असे तसेच डाळ / कडधान्य यांचे प्रमाण इ. १ ली ते ५ वी साठी १० ग्रॅम व इ. ६ वी ते ८ वी साठी १५ ग्रॅम. असे याप्रमाणात वापरावयाचे आहेत. पाककृती "परिशिष्ट-ब" मधील तांदुळाची खीर तयार करण्यासाठी वापरावयाचे आहे. तरी उर्वरीत डाळ / कडधान्य इयत्ता १ ली ते ५ वी १० ग्रॅम व इ. ६ वी ते ८ वी साठी १५ ग्रॅम आणि "परिशिष्ट-अ" मधील पाककृती नंतर शिल्ल्क राहीलेला ५० टक्के, भाजीपाला यांचे एकत्रित असे "परिशिष्ट-क" नुसार मोड आलेली कडधान्य (Sprouts) आणि भाजीपाला यांची कोशिंबीर करावयाचे आहे.
महत्वाच्या सुचना
1) सदर, योजनेअंतर्गत तीन संरचीत आहार पध्दतीने पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे.
2) सदरची पाककृती खालील शाळांमध्ये लागू राहील. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत समाविष्ट असलेल्या ग्रामीण भागातील सर्व पात्र शाळा.
नागरी भागातील केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली मध्ये समाविष्ट नसलेल्या सर्व पात्र शाळा. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व पात्र शाळा.
3) नागरी भागातील केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये समाविष्ठ नसलेल्या शाळा आणि ग्रामीण भागातील शाळा यांनी पाककृती प्रमाणे आवश्यक धान्यादी मालाची व तांदुळाची एकत्रित मागणी माहे ऑगस्ट 2024 व सप्टेंबर 2024 (45) कार्यदिवस) करीता जिल्हयाच्या पुरवठा दाराकडे दि.29/07/2024 पर्यंत नोंदवावी व त्याची एक प्रत जिल्हास्तरीय कार्यालयास सादर करण्यात यावी. 4) केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व पात्र शाळांकरिता माहे ऑगस्ट 2024 व सप्टेंबर 2024 (45) कार्यदिवस) करीता अनुज्ञेय तांदुळाची एकत्रित मागणी दि.29/07/2024 पर्यंत जिल्हायाच्या पुरवठादाराकडे नोंदवावी व त्याची एक प्रत जिल्हास्तरीय कार्यालयास सादर करण्यात यावी
5) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अॅन्ड रिटेलिंग को ऑप ऑफ इंडिया लि., (NACOF) यांचा झालेला करारनामा दि.
6) सुधारीत पाककृतीनुसार दोन आठवडेसाठी प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे सोबत जोडलेल्या "परिशिष्ट-अ नुसार एकुण 1 ते 12 पाककृती वेगवेगळ्या दिवसांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सदर प्रत्येक दिवस ठरवून दिलेल्या पाककृतीप्रमाणेच आहार पुरविण्यात यावा. उपरोक्त नमूद पाककृतीप्रमाणे आहार दिल्यानंतर शिल्लक राहिलेल्या तांदळापासुन तांदळाची खीर आठवडयातील चार दिवस (सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार) "परिशिष्ट-ब" प्रमाणे देणे बंधनकारक राहील.
8) पहिल्या आठवड्यातील बुधवार व दुस-या आठवड्यातील बुधवार या दिवशी अंडा पुलाव याचा लाभ देण्याचे निश्चित झालेले आहे. जे विद्यार्थी अंडी पुलाव खाणार नाही त्यांना "परिशिष्ट- अ" मधील पाककृती 1 प्रमाणे व्हेजीटेबल पुलाव दयावयाचा आहे. तसेच अंडी न खाणा-या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावे. सदर दिवशी तांदूळाची खीर, नाचणीचे सत्व व मो आलेले कडधान्य (Sprouts) देण्यात येऊ नयेत,
आठवडयातील एक दिवस (दर शनिवार) "परिशिष्ट-ब" प्रमाणे नाचणीसत्व देणे बंधनकारक राहील, 10) प्रत्येक आठवडयात (बुधवार वगळून) प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांना मोड आलेले कडधान्य (Sprouts) "परिशिष्ट-क" प्रमाणे देण्यात यावी. सदर कडधान्य (Sprouts) तयार करण्यासाठी दैनंदीन पाककृतीमधील कडधान्यामधुन 50 टक्के बचत करुन त्याचा वापर करावयाचा आहे तसेच सदर कडधान्य (Sprouts) मध्ये दैनंदीन पाककृतीमध्ये आवश्यक प्रमाणे भाजीपाला वापर करण्यात यावा (शासन निर्णय दिनांक 02/02/2011 अन्वये पाककृतीसाठी इयत्ता 1 ली ते 5 वी करीता 50 ग्रॅम भाजीपाला व इयत्ता 6 वी ते 8 वी करीता 75 ग्रॅम भाजीपाला वापरणे बंधरकारक आहे. 11) अंडी, सोयाबीन वडी, गुळ/ साखर, दुध पावडर इत्यादी साठी लागणारा आहार खर्चाव्यतिरीक्तचा अधिकचा निधी राज्यस्तरावरुन पुरवण्यात येईल. नाचणीसत्वासाठी आवश्यक नाचणीचा पुरवठा भारतीय अन्न महामंडळाकडुन करण्यात येणार आहे.
12) शाळा स्तरावर सर्व मुख्याध्यापक यांनी स्वयंपाकी तथा मदतनीस यांना संदर्भ क्र 1 मधील शासन निर्णयातील सर्व बाबी जसे की, तीन संरचीत आहार पध्दती, पाककृती शिजवून तयार करण्याचा सविस्तर घेवून विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करावी.
तपशील इत्यादी समजावून सांगून शासन निर्णयातील सर्व बाबींचे तंतोतंत अनुपालन होईल याची दक्षता घ्यावी.
13 ) हरभऱ्याचे मोड विद्यार्थ्यांना देण्यापुर्वी ते वाफवून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात यावे.
निश्चित करण्यात आलेली पाककृती खालीलप्रमाणे :-
सदर सर्व बाबींचा विचार करुन विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार आवडीने खातील. तीन संरचित पध्दतीमध्ये तांदूळ, डाळी/कडधान्यापासून तयार केलेला आहार मोड आलेले कडधान्य (स्प्राउट्स) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर/नाचणीसत्व यांचा समावेश करुन नविन पाककृती शासनाने संदर्भिय शासन निर्णयान्वये निश्चित केली आहे.
१) प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पाककृती सुधारणा समितीने सुचविलेल्या १५ प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास शासनाने संदर्भिय शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे.
२) केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या शाळा वगळून उर्वरित सर्व शाळास्तरावर सद्यस्थितीत ज्या डाळी व कडधान्य उपलब्ध आहेत. त्या डाळी व कडधान्यापासून उक्त शासन निर्णयामध्ये दिलेल्या परिशिष्टात नमूद असलेल्या पाककृतींनुसार विद्यार्थ्यांना योजनेचा तात्काळ लाभ देण्यात यावा.
३) तांदुळ व धान्यादी मालाची यापुढील मागणी नोंदविताना संदर्भिय शासन निर्णयाचे पालन होईल यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करुन यापुढील मागणी नोंदविण्यात यावी.
४) आपल्या कार्यक्षेत्रातील केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना संदर्भिय शासन निर्णयानुसार तात्काळ मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात यावा. याबाबत हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
५) तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी (अंडा पुलाव पाककृती असलेला दिवस वगळून) आहारासोबत मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) व तांदळाची खीर/नाचणी सत्व देण्यात यावेत.
६) ज्या दिवशी विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव (पाककृती क्र.९) या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देणार आहे. त्या दिवशी इ. १ ली ते ५ वी करीता १०० ग्रॅम तांदूळ व इ. ६ वी ते ८ वी करीता १५० ग्रॅम तांदूळाचा वापर करुन मध्यान्ह भोजनचा लाभ देण्यात यावा. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर दिवशी व्हेजिटेबल पुलाव या पाककृतीच्या स्वरुपात लाभ देण्यात यावा. तसेच, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या खर्च मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावेत, सदर दिवशी तांदळाची खीर, नाचणीसत्व व मोड असलेले कडधान्य (स्प्राऊट्स) देण्यात येऊ नये.
७) गोड खिचडी, नाचणी सत्व व तांदळाच्या खीरीच्या पाककृतीसाठी दुध पावडर, गुळ/साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी यांची आवश्यकता आहे. सदर वस्तू पुरवठेदारामार्फत पुरविण्यात येत नसल्यामुळे प्रस्तुत वस्तूंच्या खरेदीसाठी महिन्यातील दोन दिवसांच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम शाळा स्तरावर वितरीत करावयाची आहे. त्या रक्कमेतून शालेय व्यवस्थापन समितीने दुध पावडर, गुळ/साखर, सोयाबीन वडी यांची खरेदी करुन विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा.
७.१ केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या शाळा वगळून उर्वरित सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना सदर शासन निर्णयानुसार लाभ देण्यासाठी उक्त पदार्थांच्या खरेदी करीता आवश्यक निधी शाळास्तरावर वर्ग करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील इ. १ ली ते ५ वी व इयत्ता ०६ वी ते ०८ वी च्या विद्यार्थ्यांच्या दिनांक ०१/०७/२०२४ रोजीच्या पटसंख्येचा तपशिल दिनांक ०२/०७/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजेपर्यंत संचालनालयास सादर करण्यात यावा, विहित कालमर्यादेत माहिती सादर न झाल्यास होणाऱ्या विलंबास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल. याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
८) नाचणी सत्वासाठी आवश्यक नाचणीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळातून प्रस्तुत नाचणीचा पुरवठा शासनामार्फत शाळास्तरावर करण्यात येईल.
९) शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशांनुसार आपल्या स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करुन विद्यार्थ्यांना तात्काळ योजनेचा लाभ देण्यात यावा.
१०) योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ देण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करावयाची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीव्दारे तात्काळ निर्णय घेण्यात यावा. तसेच, मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरीता शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तात्काळ निर्णय घ्यावा, प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसारच विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा.
योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) चा लाभ देणेकरीता आपल्या स्तरावरुन शासन निर्णयानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. याबाबत हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता आपल्या स्तरावरुन घेण्यात यावी.