google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education

Sunday, June 9, 2024

मोदी कैबिनेट 2024 । Modi Cabinet Ministers List 2024 LIVE केंद्रात 30 जनांनी कॅबिनेट , 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार तर 36 जनांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ ; पाहा सविस्तर मंत्रीमंडळ यादी !

केंद्रात 30 जनांनी कॅबिनेट | 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार तर 36 जनांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ  पाहा सविस्तर मंत्रीमंडळ यादी


Central New Ministers list ] : आज दिनांक 09 जुन रोजी केंद्रात मोदी यांच्या पंतप्रधान शपथविधी नंतर केंद्रांमध्ये 30 जनांनी कॅबिनेट , व 36 जनांनी  राज्यमंत्री तर 05 जनांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार मंत्री पदांची शपथ घेतले आहेत . सदर मंत्रीमंडळाची संपुर्ण यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .



कॅबिनेट मंत्रीमंडळ यादी ( Cabinet Ministers list ) : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळांमध्ये अनेक नविन खासदारांना संधी देण्यात आलेली आहे , यांमध्ये प्रामुख्यान 30 खासदारानां कॅबिनेट मंत्रीमंडळाची शपथ घेतली आहे .सदर कॅबिनेट मंत्रीमंडळ मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता .

  • अमित शहा
  • राजनाथ सिंग
  • जे.पी नड्डा
  • नितीन गडकरी
  • शिवराज सिंग चौहान
  • निर्मला सितारमण
  • एस जयशंकर
  • एडी कुमारस्वामी
  • मनोहर लाल खट्टर
  • पियुष गोयल
  • धर्मेंद्र प्रधान
  • जीतनराम मांझी
  • राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंग
  • सर्बानंद सोनोवाल
  • डॉ.विरेंद्र कुमार
  • किंजरापू राम मोहन नायडु
  • प्रल्हाद जोशी
  • जुआल ओरम
  • गिरीराज सिंह
  • अश्विनी वैष्णव
  • ज्योतिरादित्य सिंधिया
  • भुपेंद्र यादव
  • गजेंद्रसिंह शेखावत
  • अन्नपुर्णा देवी
  • किरेन रिजिजू
  • हरदीप सिंग पुरी
  • मनसुख मांडविया
  • जी किशन रेड्डी
  • चिराग पासवान
  • सीआर पाटील
 
स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्री : स्वतंत्र प्रभार असणाऱ्या विभागाचे राज्यमंत्री म्हणून राव इंद्रजित सिंग , जितेंद्र सिंग , अर्जुन राम मेघवाल , प्रतापराव गणपतराव जाधव व जयंत चौधरी या 05 जनांनी शपथ घेतली .

राज्यमंत्री : राज्यमंत्री पदांची शपथ एकुण 36 खासदारांनी घेतली , सदर राज्यमंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रराज्यमंत्र्यांचे नावे
01.जितीन प्रसाद
02.श्रीपाद नाईक
03.पंकज चौधरी
04.कृष्ण पाल गुर्जर
05.रामदास आठवले
06.रामनाथ ठाकुर
07.नित्यानंद राय
08.व्ही. सोमन्ना
09.अनुप्रिया पटेल
10.डॉ.चंद्रशेखर पेम्मासानी
11.एसपी सिंग बघेल
12.शोभा करंदलाजे
13.किर्तीवर्धन सिंग
14.बिएल वर्मा
15.शंतनु ठाकुर
16.सुरेश गोपी
17.एल मुरुगन
18.अजय तमटा
19.बंदी संजय कुमार
20.कमलेश पासवान
21.भगीरश चौधरी
22.सतीशचंद्र दुबे
23.संजय सेठ
24.रवनीत सिंग बिट्टू
25.दुर्गा दास उईके
26.रक्षा खडसे
27.सकांता मजुमदार
28.सावित्री ठाकूर
29.तोखान साहु
30.राजभुषण चौधरी
31.भूपती राजु श्रीनिवास वर्मा
32.हर्ष मल्होत्रा
33.निमुबेल जयंतीभाई बांभनिया
34.मुरलीधर मोहोळ
35.जॉर्ज कुरियन
36.पवित्र मार्गारीटा
 

शाळा सोडल्याच्या दाखल्याची फी किती द्यावी लागते? शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय

 

शाळा सोडल्याच्या दाखल्याची फी किती द्यावी लागते? शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 4 जानेवारी 2016 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अंतर्गत लोकसेवा आवश्यक कागदपत्रे शुल्क नियतकाल मर्यादा पदनिर्देशित अधिकारी प्रथम व द्वितीय अपील अधिकारी अधिसूचित करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


वाचा : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.५)


प्रस्तावना: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५, दिनांक २६ एप्रिल, २०१५ रोजी प्रख्यापित करण्यात येवून राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सदर अध्यादेश दिनांक २८ एप्रिल, २०१५ पासून लागू करण्यात आलेला आहे. राज्यातील व्यक्तींना दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने आवश्यक असणाऱ्या लोकसेवा तत्परतेने व पारदर्शकपणे विहीत कालावधीत कार्यक्षमरित्या पुरवावयाच्या आहेत. या विभागामार्फत इयत्ता १२ वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थी हा केंद्रबिंदु मानून त्याला सातत्याने आवश्यक असणाऱ्या सेवा विहीत कालावधीत वाजवी शुल्क आकारुन सोप्या पध्दतीने पुरविणे आवश्यक आहे. यासंदर्भात विचार करता या विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळामधील तसेच महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद त्याचप्रमाणे शाळास्तरावरुन विद्यार्थ्यांना दिल्या जाणान्या विविध प्रकारच्या सेवांचा विचार करावा लागतो. या सेवा त्यांच्या शैक्षणिक बाबींसाठी किंवा व्यावसायिक आवश्यकता म्हणून त्यांना विहीत कालावधीत पुरवाव्या लागतात. याचा विचार करता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद व शाळास्तरावरुन विद्यार्थ्यांना / नागरिकांना पुरवावयाच्या महत्वाच्या खालील १५ सेवा अध्यादेशाच्या कलम ३ नुसार आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत अधिसूचित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. त्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

१) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ च्या प्रयोजनार्थ या विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांनी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने व शाळांनी सोबत जोडलेल्या तक्त्यात (प्रपत्र- अ) दर्शविलेल्या त्यांच्याशी संबंधित सेवा विद्यार्थी / नागरिक यांना कालमर्यादा दर्शविलेल्या कालावधीत पुरवावयाच्या आहेत.


२) सर्व विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी याबाबत त्यांच्या स्वरावर एक लघुसमिती स्थापन

करुन दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या लोकसेवांबाबत आढावा घ्यावा. तसेच अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ यांच्या


स्तरावरही या प्रयोजनार्थ आढावा समिती स्थापन करावी. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या सेवांसंदर्भात


परिषदेच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. आयुक्त, शिक्षण हे परिषदेच्या लोकसेवा

पुरविण्याविषयी झालेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेतील. शाळांनी द्यावयाच्या लोकसेवांबाबत शिक्षणाधिकारी


(निरंतर) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती आढावा घेईल. या सेवा सर्व प्राथमिक/ उच्च प्राथमिक /


माध्यमिक व उच्च माध्यमिक मान्यताप्राप्त शाळांना लागू होतील.

३) तसेच सर्व विभागीय मंडळाच्या कार्यालयात व शिक्षण मंडळाच्या पुणे येथील मुख्यालयात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या कार्यालयात व सर्व शाळामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांची माहिती असलेले फलक विद्यार्थी/ नागरिक यांच्या माहितीस्तव संपूर्ण तपशीलासह लावण्यात यावेत. तसेच उपलब्ध


शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०१५/१५५/१५)/समन्वय कक्ष

वरील शासन निर्णयानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना नेमके कोणते कागदपत्र किती दिवसात व किती शुल्क भरून मिळेल याबाबत सविस्तर विवरण दिले आहे. ते पुढील प्रमाणे.

वरील संपूर्ण शासन निर्णय परिशिष्टासह पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


Thursday, June 6, 2024

*सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवेश वितरणाच्या कार्यवाहीबाबत MPSP च्या आजच्या महत्वपूर्ण सूचना*

 २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवेश वितरणाच्या कार्यवाहीबाबत MPSP च्या आजच्या महत्वपूर्ण सूचना* 

समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयातून निर्गमित दि. 05 JUN 2024 रोजीच्या परिपत्रका नुसार १. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, २. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व, ३. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व. यांना सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवेश वितरणाच्या कार्यवाहीबाबत समीर सावंत प्रकल्प समन्वयक तथा राज्य सह संचालक (प्रशासन), म.प्रा.शि.प., मुंबई यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


१. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता १ ली ते ८ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनु. जाती मुले, अनु. जमाती मुले तसेच दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले यांना प्रत्येकी दोन गणवेश संचाचा लाभ देण्यात येतो.


२. राज्य शासनाने निर्गमित केलेल्या दि.०८ जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सन २०२३-२४ पासून समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ देण्यात न येणाऱ्या दारिद्रय रेषेवरील पालकांच्या मुलांना राज्य शासनाच्या योजनेमधून दोन शालेय गणवेश संचाचा लाभ देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे.

३. सदर निर्णयानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून एक नियमित गणवेश संच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करुन पुरविण्यात येणार आहे.


४. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये स्काऊटस् व गाईडस् विषयास अनुरुप एक गणवेश संच संबंधित शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन शिलाई करुन पुरविण्यात येणार आहे. याकरीता गणवेश कापड पुरवठादार यांचेकडून शाळानिहाय लाभार्थी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात कापड उपलब्ध करुन देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कापड पुरवठादाराकडून कापडाची निर्मिती झाल्यांनतर या कापडाच्या दर्जाची तपासणी टेक्सटाईल कृमिटी, मुंबई या केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या संस्थमार्फत करण्यात येणार असून कापडाच्या दर्जाच्या तपासणीअंती टेक्सटाईल कमिटीचे निरीक्षक यांच्या समक्ष त्या गणवेशाचे कापड सुयोग्य पॅकेटमध्ये भरून त्यावर टेक्सटाईल कमिटीचे सील लावण्यात येणार आहे.


५. स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवशाचे कापड उपलब्ध करुन देण्यात आले नंतर सदर गणवेशाचे कापड सुस्थितीत असलेबाबत तसेच विदयार्थी संख्येच्या प्रमाणात उपलब्ध झालेची खात्री संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक राहील.

६. इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टील ग्रे रंगाचे हाफ शर्टचे कापड उपलब्ध करुन देण्यात येईल. शिलाई करताना (two patch pockets with sholder straps) देण्यात यावेत. तसेच इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांकरीता हाफ पॅन्टचे कापड उपलब्ध करुन देण्यात येईल. हाफ पॅन्टची शिलाई करताना (two side pockets and one back Pocket) देण्यात यावेत. इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी फुल पॅन्टसाठी गडद निळ्या रंगाचे कापडाचा पुरवठा करण्यात येईल. फुल पॅन्टची शिलाई करताना (two side pockets and one back Pocket) देण्यात यावेत.


७. पिनोफ्रॉक (One Piece) इयत्ता १ ते ५ वीच्या विद्यार्थीनींकरीता निळ्या रंगाचे (Deep Sky Blue) कापड उपलब्ध करुन देण्यात येईल. शिलाई करताना (two top patch pockets and two side pockets) देण्यात यावेत. कमीज इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थीनींकरीता आकाशी निळ्या रंगाचे (Deep Sky Blue) कापड उपलब्ध करुन देण्यात येईल. शिलाई करताना (two patch pockets and two side pockets) देण्यात यावेत. तसेच सलवार गडद निळ्या रंगाचे (Dark Blue) कापड पुरविण्यात येणार आहे.

८. सुलभ संदर्भासाठी स्काऊट गाईड गणवेशाचे फोटो संलग्न करण्यात येत आहेत.


९. विदयार्थी संख्येच्या प्रमाणात स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवशाचे कापड पुरवठा न झाल्यास तसेच गणवेशाचे कापड खराब मळलेल्या स्थितीत आढळून आल्यास स्वीकारण्यात येऊ नये. त्याबाबतची माहिती कापड पुरवठादारास त्वरीत देण्यात यावी. सदर बाब राज्य कार्यालयास अवगत करावी.


१०, स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवेश शिलाईची रक्कम प्रती गणवेश संच रु.१००/- या दराने लाभार्थी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांना वितरीत करण्यात येणार आहे.

११. संबंधित शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन स्थानिक शिलाई कारागिर यांची निवड करावी व सदर कारागिरांच्या माध्यमातून स्काऊटस् व गाईडस् विषयास अनुरुप गणवेशाची शिलाई पूर्ण करण्यात यावी. शिलाई कारागिरांची निवड करतांना स्थानिक महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात यावे.

१२. वर नमूद केल्याप्रमाणे कापडाचे तागे BRC/CRC/लोक संचालित साधन केंद्रावर प्राप्त झाल्यानंतर सदर कापडाच्या गणवेशाचा स्वीकार करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे,


१ गट शिक्षणाधिकारी


अध्यक्ष


२ गट शिक्षणाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या २ शाळांचे मुख्याध्यापक सदस्य


१३. गणवेशाचे कापड प्राप्त झाल्यानंतर त्यावर टेक्सटाईल कमिटीचे सील आहे किंवा कसे, तसेच सर्व कापडाचे तागे सुस्थितीत आहेत, याची काळजीपूर्वक तपासणी करून त्यानंतरच सदरहू कापडाच्या ताग्यांचा स्वीकार करण्यात यावा. सुलभ संदर्भासाठी सिलचा नमुना सोबत जोडण्यात येत आहे.


१४. कापडाचा स्वीकार करतेवेळी वर नमूद केल्याप्रमाणे सील नसल्यास सदरहू मालाचा स्वीकार करण्यात येऊ नये व याबाबत योग्य नोंद घेऊन सदरचा माल पुरवठादारास अथवा त्याच्या प्रतिनिधीस परत करण्यात यावा.

वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

Scholarship For Education in Foreign Countries Update - विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०२४-२५ संपूर्ण माहिती अर्ज लिंक

 

Scholarship For Education in Foreign Countries Update - विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०२४-२५ संपूर्ण माहिती अर्ज लिंक

 विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०२४-२५.


परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांकडून परदेशी शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्रता तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इच्छूक विद्यार्थ्यांकडुन अर्ज मागविण्यासाठी जाहिरात.


अटी व शर्ती

विद्यार्थी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.

विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखापेक्षा जास्त नसावे.

शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागा मुलींसाठी राखीव असतील.

निवडीसंदर्भातील अन्य अटी व शर्ती ह्या जाहिराती मध्ये नमूद केल्यानुसार व शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग दिनांक ३०.१०.२०२३ व शासन निर्णय नियोजन विभाग दिनांक २०.०७.२०२३ मध्ये नमुद केल्याप्रमाणे राहतील.

परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्वाच्या अटी शर्ती इ. सविस्तर माहितीसाठी विभागाच्या पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी.

https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in


वरील संकेतस्थळा (वेबसाईट) वरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांच्याकडे जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते दिनांक:- ३०/०६/२०२४ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत जमा करावा


लाभाचे स्वरुप

विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम.

विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च


विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अथवा महाराष्ट्र शासन वेळोवेळी जाहीर करेल या पैकी जी कमी असेल ती रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अनुज्ञेय असेल.

विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर भारतात परत येताना नजिकच्या मार्गाने (Economy Class) विमान प्रवासाचा खर्च अनुज्ञेय असेल.


(स्वा/-)

(ज्ञानेश्वर खिलारी (भा.प्र.से.)



संपूर्ण माहिती पत्रक जाहिरात व पीडीएफ अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा

Download






Wednesday, June 5, 2024

STARS | पहिली ते बारावीच्या शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांना प्रशिक्षणासाठी करावी लागणार ऑनलाइन नोंदणी! MIEPA संचालक.

 

पहिली ते बारावीच्या शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांना प्रशिक्षणासाठी करावी लागणार ऑनलाइन नोंदणी! MIEPA संचालक.

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था छत्रपती संभाजी नगर च्या संचालकांनी दिनांक पाच जून 2024 रोजी  निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार स्टार्स प्रकल्प : मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत व्यक्तीच्या ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता नावनोंदणी करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


संदर्भ - १.STARS प्रकल्प अंतर्गत मंजूर PAB मिटिंग इतिवृत्त दि. ३१ मार्च, २०२४. २. मा. संचालक, SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा.क्र./राशैसंप्रपम/सशि/STARS उपक्रम नियोजन /२०२४-२५/०१९६३/दि.०४.०४.२०२४.

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळविण्यात येते की, राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि परिणाम यांचे बळकटीकरण करण्यासंदर्भात जागतिक बँक अर्थसहायीत, केंद्र पुरस्कृत Strengthening Teaching Learning And Results for States (STARS) या उपक्रमातील मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सन २०२२-२३,२०२३-२४ मध्ये मुख्याध्यापक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न झाले आहे. सदर उपक्रमाअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये उर्वरित (आतापर्यंत सदर ऑनलाईन प्रशिक्षण न घेतलेल्या) आपल्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभागाच्या तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक/प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या (पदाचे/प्रभारी) यांनी पुढे दिलेल्या लिंकवर दि.३०/०६/२०२४ या तारखेपर्यंत नोंदणी करणेबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे.

नोंदणीसाठी ऑनलाईन लिंक कुणी भरावी याबाबत महत्वाची सूचना -

१. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक /प्राचार्य या पदावर (पदाचे/प्रभारी) कार्यरत व्यक्ती २. प्रथम वेळी नोंदणी करणारे

नोंदणी करताना ईमेल आय-डी, संपूर्ण नाव (SPELLING), जिल्हा ही माहिती काळजीपूर्वक भरावी. आपले प्रशिक्षण आपल्या वैयक्तिक ईमेल आयडी द्वारेच होणार आहे.

५. लिंक मधील सर्व माहिती फक्त इंग्रजी भाषेतच भरावी.

सदर प्रशिक्षणात पूर्वचाचणी, फेज-1, फेज-2, फेज-3, उत्तरचाचणी, स्वाध्याय, प्रात्यक्षिक, PLC- व्यावसायिक अध्ययन समूह बैठक यांचा समावेश आहे.

खालील नोंदणी लिंक भरणे अनिवार्य आहे.


ऑनलाईन लिंक- 

https://forms.gle/o7xs6NfFueAMNdxY8


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download




ऑनलाइन बदली अपडेट - फक्त या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या होणार ऑनलाईन सुगम दुर्गम भागानुसार! ग्रामविकास विभाग.

 

ऑनलाइन बदली अपडेट - फक्त या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या होणार ऑनलाईन सुगम दुर्गम भागानुसार! ग्रामविकास विभाग.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 31 मे 2012 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार उच्च न्यायालयात गेलेल्या शिक्षकांना दुर्गम भागातून सुगम भागात बदली मिळणे बाबत मे. विन्सीस आय टी सर्विसेस प्रा. लि., पुणे यांना उपलब्ध करून देण्यात यावेळी याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


संदर्भ : १) शासनाचे समक्रमांकीत दि. १५.५.२०२४ रोजीचे पत्र. २) आपली दिनांक २१.५.२०२४ व दि. २९.५.२०२४ रोजीची पत्रे.


महोदय,


उपरोक्त संदर्भ क्र. २ वरील आपल्या पत्रान्वये उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने नमूद करण्यात्त येते की, यातील मुद्दा क्र. १ (server availability) व २ (Renewal of SMS and email work order) बाबत (शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल सुरू करण्यासाठी लागणारे हार्डवेअर आणि त्याच्यासाठी येणारा एकूण १ वर्षासाठीचा खर्च) यानुषंगाने विभागाच्या स्तरावर कार्यवाही करण्यात येत असून याबाबत आपणास कळविण्यात येईल. दरम्यान, शिक्षक ऑनलाईन बदल्यांसाठी सर्वर अनुषंगिक बाबींची पूर्तता करून तात्काळ पोर्टल सुरू करण्याची कार्यवाही करावी तसेच जिल्हा परिषद अमरावती करिता तात्काळ पोर्टल उपलब्ध करून द्यावे. सदर बाब तातडीची समजण्यात यावी. तसेच मुद्दा क्र. ३ व ४ बाबत जिल्हा परिषद, अमरावती यांचेकडून तातडीने माहिती उपलब्ध करून घ्यावी. जिल्हा परिषद, अमरावती यांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. तसेच मुद्दा क्र. ५ बाबत सध्या फक्त अमरावती जिल्हा परिषदेसाठी पोर्टल सुरू करण्याच्या सूचना आपणास संदर्भीय क्र. १ वरील पत्रान्वयेच देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी.

आपला,

(नितीन स. पवार)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन प्रतः- १. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांना कळविण्यात येते की, मे. विन्सीस आय टी. कंपनीचे दि. २१.५.२०२४ रोजीचे पत्र सोबत जोडले असून यातील मुद्दा क्र. ३ व ४ शिक्षक ऑनलाईन बदल्यांसाठी आवश्यक माहिती तात्काळ संबंधित कंपनीस उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच सदर कंपनीशी संपर्क करून जिल्हांतर्गत बदल्यांबाबतीच प्रक्रीया तात्काळ राबविण्यात यावी.