google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: May 2024

Thursday, May 30, 2024

अशासकीय प्राथमिक शाळांतील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरणाबाबत शासनाच्या महत्वाच्या सूचना

 अशासकीय प्राथमिक शाळांतील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरणाबाबत शासनाच्या महत्वाच्या सूचना 




उपरोक्त संदर्भ क्रमांक २ व ३ च्या पत्रान्वये खाजगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखकरणाचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सदर प्रकरणे निकाली काढण्यासाठी संचालनालयस्तरावरून मार्गदर्शन मिळणेबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. बुलडाणा व अधिक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक), जिल्हा बुलडाणा यांनी विनंती केलेली आहे.


उपरोक्त प्रकरणी आपणांस कळविण्यात येते की महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ नियम १६ मधील १८ (ब) नुसार फक्त माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकाला प्रत्येक पूर्ण वर्षासाठी १५ दिवसांची अर्जित रजा अनुज्ञेय आहे. खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही.


नियम १९ अन्वये कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुटीचा किंवा तिच्या भागाचा लाभ घेण्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी मुख्याध्यापकाला / कर्मचाऱ्याला शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी मिळवावी लागेल.


प्राथमिक शिक्षक / मुख्याध्यापकांना दिनांक


०१.०७.१९९५ अन्वये अर्धवेतनी रजेऐवजी मिळणाऱ्या


अर्जित रजा दरवर्षी १० दिवस मान्य केलेली आहे. तथापी,


सदरील आदेशामध्ये अर्धवेतनी रजेच्या ऐवजी मिळणाऱ्या


अर्जित रजेचे रोखीकरण करता येणार नाही असे नमूद


आहे.


महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली


१९८१ मध्ये तरतूद नसल्याने खाजगी प्राथमिक शाळांतील


मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही.


अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा


परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

                               Download

Wednesday, May 29, 2024

CCRT Training Registration link 2024 Update - सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत SCERT परिपत्रक लिंक

 

CCRT Training Registration link 2024 Update - सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत SCERT परिपत्रक लिंक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ने निर्गमीत केलेल्या दि. 28 मे 2024 रोजी च्या परिपत्रका नुसार सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत 

१. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई. 

२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व, यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 

संदर्भ-

राहुलकुमार, उपसंचालक, सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र (CCRT), नवी दिल्ली यांचे पत्र क्र. सी सी आर टी / १३०११/१/२०२४/ दि.१६ मे २०२४


उपरोक्त विषयानुसार, सी. सी. आर. टी. (CCRT-Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत जून २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात.

https://forms.gle/nYoYUjwMq1peyTkV8

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल. सदरील नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत करण्यात यावे. तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा.

डॉ. माधुरी सावरकर)

 उपसंचालक, 

कला क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ३०


प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तव :

• शिक्षणाधिकारी, प्राथमिक, सर्व जिल्हे. शिक्षणाधिकारी, माध्यमिक, सर्व जिल्हे.




 

:- Eco clubs for Mission Life अंतर्गत आयोजित करावयाच्या उन्हाळी शिबिराबाबत....

 महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे

व्य.क.रारीसंप्रपम/वि.वि/ECO club/२०२४/०२४६९

२७/०५/२०२४





विषय :- Eco clubs for Mission Life अंतर्गत आयोजित करावयाच्या उन्हाळी शिबिराबाबत....


Regarding the Summer Camp to be Organized Under Eco Clubs for Mission Life



संदर्भ :- १. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.०१/०५/२०२४.

२. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी ऑनलाईन बैठकीमध्ये दिलेल्या सूचना दि.२२/०५/२०२४.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार भविष्यात चांगले यशस्वी आणि नवोपक्रमशील नागरिक बनण्यासाठी सर्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कौशल्ये आणि क्षमता विकसित होणे गरजेचे आहे. या कोशल्यामध्ये पाणी व नैसर्गिक संसाधने यांचे जतन, स्वच्छता इ.च्या अनुषंगाने पर्यावरण जाणीवजागृती विकसित करणे ही महत्वाची क्षमता आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत शाळेतील इको क्लब ही एक योजना असून या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित करणे, सद्यस्थितीतील पर्यावरणीय समस्या जाणून घेणे. सकारात्मक दृष्टीकोन आणि पर्यावरण संरक्षणाकरिता अभिवृत्ती विकसित करणे या उद्देशाने पर्यावरण पूरक शैक्षणिक कृर्तीचे आयोजन करण्यात येते. सन २०२१ मध्ये COP२६ या हवामान बदल या विषयावर झालेल्या परिषदेमध्ये LIFE (Lifestyle for Environment) ही संकल्पना मांडण्यात आली आहे. मिशन लाईफ ही शाश्वत जीवनशैली पर्यावरण जतन करण्यासाठी उपलब्ध संसाधनाचा योग्य वापर या बाबींना प्रोत्साहन देणारी जागतिक स्तरावरील चळवळ आहे.

उपरोक्त संदर्भिय विषयांन्वये इको क्लब अंतर्गत Eco clubs for Mission Life या थीम वर आधारित शाळेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक पर्यावरण दिन दि.५ जून २०२४ रोजी उन्हाळी शिबीर सुरु होईल या दृष्टीने नियोजन करून एकूण सात दिवसांचे उन्हाळी शिबिर आयोजित करावे, एक आठवड्याचे उन्हाळी शिबीर आयोजित करत असताना जागतिक पर्यावरण दिन २०२४ थीम Land restoration, desertification and drought resilience आणि मिशन लाईफ अंतर्गत आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, शाश्वत अन्नप्रणाली स्वीकारणे, ई-कचरा कमी करणे, कचरा कमी करणे, उर्जा बचत करणे, पाणी बचत करणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या सात थीमवर आधारित शैक्षणिक कृती /उपक्रमांचे नियोजन करावे.

उन्हाळी शिबिरामध्ये घ्यावयाच्या काही मार्गदर्शक ठरतील अशा शैक्षणिक कृती/उपक्रम सोबत जोडलेल्या आहेत. उन्हाळी शिबिराचे आयोजन करताना या शैक्षणिक कृती/उपक्रम सोबतच सौर उर्जासारख्या नवीकरणीय उर्जा स्रोत, स्थानिक परिसंस्थेमधील पाण्याचे स्रोत, पाण्याची शुद्धता तपासणे, पाण्याचे जतन आणि वृक्ष लागवड इ. विषयांना अधिक महत्त्व देण्यात यावे. या शिबिरांना प्रसिद्धी देण्यासाठी शाळेमध्ये पोस्टर, वादविवाद आणि पेंटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या पर्यावरणतज्ञ, आणि अशासकीय संस्था यांचे आवश्यकतेनुसार या शिबिरासाठी सहकार्य घेण्यात यावे.

राज्य स्तरावरून विभागीय शिक्षण उपसंचालक यांची विभागीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील जास्तीत जास्त शाळापर्यंत उन्हाळी शिबीर आयोजित करणेसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच सदर उपक्रमाचा आढावा केंद्र शासन स्तरावरून घेण्यात येणार असल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या विभागातील उन्हाळी शिबीर आयोजित करणाऱ्या जिल्ह्यानिहाय शाळा आणि विद्यार्थ्यांची सांख्यिकीय माहिती/अहवाल प्रस्तुत कार्यालयास पाठवावा.


राहूल रेखावार
संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे- ३०


उन्हाळी शिबिर मार्गदर्शक सूचना

शाळेमध्ये उन्हाळी शिबीर आयोजित करण्यासाठी काही सुचविलेल्या कृती
शाळेमध्ये उन्हाळी शिबीर आयोजित करण्यासाठी काही सुचविलेल्या कृती शाळेमध्ये उन्हाळी शिबीर आयोजित करण्यासाठी विद्यार्थ्यांचा स्तर विचारात घेवून

शाळांनी पुढील कृती घ्याव्यात.

आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे

१. विद्यार्थ्यांसाठी परिसरातील स्थळांना / परिसंस्थाना निसर्ग फेरी आयोजित करणे.

२. स्थानिक परिस्थितीला अनुसरून वृक्ष लागवड करणे.

३. स्थानिक पर्यटन स्थळांना क्षेत्रमेटींचे आयोजन करणे,

शाश्वत अन्न प्रक्रिया स्वीकारणे

१. शाळेच्या परिसरामध्ये किचन गार्डन / परसबाग तयार करणे आणि त्याची देखभाल करणे यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे.

२. शाळेच्या परिसरात पुरेशी जागा उपलब्ध नसेल तर जुन्या बादल्या, बाटल्या यांचा वापर करून उपलब्ध असलेल्या जागेत छोट्या रोपांची लागवड करणे,

३. शाळेच्या उपलब्ध असलेल्या जागेत छोट्या वेलींची लागवड करणे

४. शाळेत तयार होणारा ओला कचरा वापरून तयार केलेले खत किचन गार्डनसाठी वापरावे जेणेकरून रासायनिक खतांचा आणि कीटकनाशक यांचा वापर टाळता येईल.

५. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक कीटकनाशक तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणे. उदा. किचन गार्डनसाठी जैव कीटकनाशक.

६. शाळेच्या परिसरामध्ये असलेल्या वनस्पतींपासून मिळणाऱ्या उत्पादितांच्या नोंदी ठेवणे तसेच यातून मिळणारे फळभाज्या आणि इतर उपयोगी पदार्थ शाळेमध्ये पोषण आहार करणेसाठी वापर करणे.

७. विद्यार्थ्यांना आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये भरडधान्य यासारख्या सुपरफूडचा समावेश करणे हे दाखविण्यासाठी भरडधान्य आकर्षक वेशभूषा

स्पर्धेसारख्या उत्साहवर्धक स्पर्धेचे आयोजन करणे,

८. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या या पर्यावरण पूरक कृतींचे शाळा आणि समाजामध्ये पुन्हा वापरण्यासाठी प्रेरणा देणे,

ई-कचरा कमी करणे.

१. ई- कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि त्यांचा पुनर्वापर करणे यासाठी ई- कचरा संकलित करणे हा उपक्रम राबविणे,

२. शाळेमध्ये ई-कचरा संकलन केंद्र तयार करून त्या ठिकाणी ई कचरा उदा. जुनी इलेक्टोनिक उपकरणे इ. जमा करणे.

३. शाळांनी संकलित ई-कचऱ्याची संकलनाच्या नोंदी करणे आणि ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे जतन करून ठेवण्यासाठी अधिकृत संस्थांशी संपर्क करणे.

४. शाळांनी ई-कचऱ्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याविषयी माहिती देण्यासाठी

शैक्षणिक माहिती देणारे बूथ/केंद्र तयार करणे,

• कचरा कमी करणे.

१. विद्यार्थी आणि समाज यांच्या सहाय्याने पर्यावरण विषयक जबाबदारीची जाणीव

होण्यासाठी स्वच्छता जनजागृती मोहीम आयोजित करणे.

२. कचरा विघटन करिता कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास शिकविणे.

३. सर्व वर्गामध्ये ओला आणि सुका कचरा यासाठी दोन डस्टबिन प्रणाली राबविणे. यामध्ये जर ओला कचरा जास्त प्रमाणात तयार होत नसेल तर ३-४ वर्गासाठी एक डस्टबिन

वापरणे, स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी नॅपकीन इ. साठी सॅनिटरी डस्टबिन ठेवणे इ.

४. शाळेमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी कंपोस्ट खड्डा तयार करणे आणि त्यातून तयार झालेल्या खताचा वापर परस बागेसाठी करण्यास प्रोत्साहन देणे.

५. शाळेमध्ये ३२ (कमी करणे, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण) याला प्रोत्साहन देण्यासाठी कचऱ्यापासून कलाकृती निर्मिती स्पर्धा आयोजित करणे.

६. जुने कपडे, खेळणी आणि फर्निचर इ. चे दान करण्यासाठी Donate Camp आयोजित करणे. समाजातील गरजूंना या वस्तूंचे वाटप करणे किंवा अशासकीय संस्थांना संकलित केलेल्या वस्तू देणे.

७. कचरा कोठे जातो आणि कचरा कसा वर्गीकरण केला जातो या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता परिसरातील कचरा वेचणाऱ्या किंवा कचरा विकत घेणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे आंतरक्रियात्मक सेशन आयोजित करणे.

उर्जा बचत करणे

१. उर्जा बचत संदर्भात कृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे जसे की ट्युब लाईट व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत नसताना बंद करणे. २. इको क्लब अंतर्गत उर्जा समिती / संघांची स्थापना करणे.

उपकरणे बंद असल्याची खात्री करण्यासाठी पाहणी/ तपासणी करणे

३. शाळेत स्थापन केलेल्या उर्जा समिती/संघांमार्फत शालेय वेळेनंतर सर्व विद्युत

४. दैनंदिन तपासणी करण्यासाठी इको क्लब अंतर्गत उर्जा समिती / संघ सदस्यांचे ड्युटी

हजेरीपत्रक तयार करणे.

५. अशासकीय संस्था, उर्जा विभाग यांच्या सहकार्याने अक्षय उर्जा स्रोतांवर मार्गदर्शन देणारे माहितीवजा सत्रांचे आयोजन करणे.
६. उर्जा संवर्धनाचे पोस्टर, बॅनर आणि इतर प्रकारचे साहित्य तयार करणे आणि जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी शाळेच्या सूचना फलकावर लावणे.

७. सौर उर्जा पॅनेलचा शाळेत वापर करणे.

पाण्याची बचत करणे

१. शाळेतील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे. या

अंतर्गत शाळा आणि शाळेच्या परिसरातील फ्लश, नळ आणि पाण्याच्या पाईपलाईनमधील पाणी गळतीची माहिती इको क्लब समिती सदस्य यांना कळविणे.

२. विद्यार्थी आणि शिक्षकांनी परिसरातील पाण्याचे स्रोत किंवा पाणीसाठे मधून संकलित केलेल्या पाण्याची शाळेच्या प्रयोगशाळेत शुद्धता तपासणे.

३. जलसंवर्धनासाठी जाणीवजागृती रॅली आयोजित करणे. विद्यार्थ्याच्या आजी-आजोबा आणि वयस्कर व्यक्तींना यांना शाळेत निमंत्रित करून त्यांनी भूतकाळात अवलंबिलेल्या जल संधारण पद्धती आजच्या परिस्थितीमध्ये पाणी बचतीसाठी कोणत्या प्रकारे वापरता येतील या दृष्टीने संवाद साधणे आणि माहिती मिळविणे.

४. पर्जन्य जल संधारण आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती सत्र आयोजित करणे.

प्लास्टिकचा वापर टाळणे

१. प्लास्टिक न वापरण्याबाबत शिक्षक आणि विद्यार्थी यांनी प्रतिज्ञा घेणे.

२. शाळेच्या परिसरामध्ये प्लास्टिक ऑडीट करणे. एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंची यादी बनविणे आणि त्यांचा वापर करण्या ऐवजी पर्यावरण पूरक पर्याय शोधणे उदा. प्लास्टिक कप, मग, पाण्याची बाटली वापरण्याऐवजी स्टीलच्या वस्तूंचा वापर करण्यास प्राधान्य देणे.

३. पृथ्वीवरील एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकच्या वापरांमुळे होणाऱ्या घातक परिणाम याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पोस्टर मेकिंग, वादविवाद आणि घोषवाक्ये लेखन, निबंध लेखन इ. चे आयोजन करणे.

४. शाळेच्या सूचना फलकावर निवडक आणि उत्कृष्ट पोस्टर प्रदर्शित करणे.

५. शाळेच्या सूचना फलकावर एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकच्या वापरांमुळे होणाऱ्या घातक परिणाम दर्शविणारे पोस्टर आणि इतर दृश्य स्वरुपात माहिती सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे.

६. प्लास्टिक ऐवजी कापडी बॅग वापरणे, एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे आणि स्थानिक व पर्यावरण पूरक वस्तूंची खरेदी करणे इ. पर्यावरण पूरक सवयींचा समाजामार्फत अवलंब करण्यासाठी जन जागृती मोहीम आयोजित करणे.

उपरोक्त प्रमाणे उन्हाळी शिबीर अंतर्गत दिवसनिहाय एक किंवा एकापेक्षा जास्त कृर्तीचे शाळेत आयोजन करावे आणि जिल्ह्यानिहाय सहभागी शाळा, विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील व्यक्ती इ.ची सांख्यिकीय माहिती / अहवाल करण्यासाठी जिल्हा स्तरावर समन्वयक यांची नेमणूक करून त्यांना माहिती संकलनाचे काम द्यावे. सकाळच्या सत्रात वेळापत्रकनुसार एक किंवा एकापेक्षा जास्त उपक्रम घेवून दररोज लिंक वर माहिती अपलोड करण्याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी दिवसनिहाय कृतींचे आयोजन करताना खालील वेळापत्रकाचा वापर करावा.

उन्हाळी शिबीर आयोजित करण्यासाठी वेळापत्रक

सदर परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा


वरील परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा