google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: CCRT Training Registration link 2024 Update - सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत SCERT परिपत्रक लिंक

Wednesday, May 29, 2024

CCRT Training Registration link 2024 Update - सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत SCERT परिपत्रक लिंक

 

CCRT Training Registration link 2024 Update - सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत SCERT परिपत्रक लिंक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ने निर्गमीत केलेल्या दि. 28 मे 2024 रोजी च्या परिपत्रका नुसार सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत 

१. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई. 

२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व, यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 

संदर्भ-

राहुलकुमार, उपसंचालक, सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र (CCRT), नवी दिल्ली यांचे पत्र क्र. सी सी आर टी / १३०११/१/२०२४/ दि.१६ मे २०२४


उपरोक्त विषयानुसार, सी. सी. आर. टी. (CCRT-Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत जून २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात.

https://forms.gle/nYoYUjwMq1peyTkV8

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल. सदरील नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत करण्यात यावे. तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा.

डॉ. माधुरी सावरकर)

 उपसंचालक, 

कला क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ३०


प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तव :

• शिक्षणाधिकारी, प्राथमिक, सर्व जिल्हे. शिक्षणाधिकारी, माध्यमिक, सर्व जिल्हे.




 

No comments:

Post a Comment