google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: केंद्रप्रमुख पदोन्नती अपडेट - केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे दिनांक 11 जून 2024 चे निर्देश

Tuesday, June 11, 2024

केंद्रप्रमुख पदोन्नती अपडेट - केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे दिनांक 11 जून 2024 चे निर्देश

 

केंद्रप्रमुख पदोन्नती अपडेट - केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे दिनांक 11 जून 2024 चे निर्देश.

प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 11 जून 2024 रोजी केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नती बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


संदर्भ: १. शासन निर्णय क्र संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटी-१/दि.२७/९/२०२३

२. शासनाचे पत्र क्र. संकीर्ण २०२२/ प्र.क्र.८१/टिएनटी-१/दि.२४/५/२०२४

उपरोक्त विषयी संदर्भिय शासन निर्णय दि.२७/९/२०२३ नुसार आपणांस कळविण्यात येते की, केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरिता, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणा-या उमेदवारांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल, अशी संदर्भीय शासन निर्णय दि.२७/९/२०२३ अन्वये तरतूद विहित करण्यात आलेली आहे. यास्तव केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीकरिता सेवाजेष्ठता यादी तयार करताना सहायक शिक्षकाची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर झालेली नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे. पंरतु याअनुषंगाने जिल्हा परिषद स्तरावर कार्यवाही होत नसलेबाबत संचालनालय स्तरावर तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी याबाबत शासन निर्णय दि.२७/९/२०२३ मधील तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.


( शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

 प्राथमिक शिक्षण संचालनालय


महाराष्ट्र राज्य पुणे प्रत माहितीस्तव सविनय सादर-मा. कक्ष अधिकारी (टीएनटी-१), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२



No comments:

Post a Comment