google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: राज्यातील कर्मचाऱ्यांना खुशखबर : कर्मचाऱ्यांच्या या 4 मागणीवर पावसाळी अधिवेशांमध्ये घेण्यात येणार सकारात्मक निर्णय !

Sunday, June 16, 2024

राज्यातील कर्मचाऱ्यांना खुशखबर : कर्मचाऱ्यांच्या या 4 मागणीवर पावसाळी अधिवेशांमध्ये घेण्यात येणार सकारात्मक निर्णय !

 राज्यातील कर्मचाऱ्यांना खुशखबर 

: कर्मचाऱ्यांच्या या 4 मागणीवर पावसाळी अधिवेशांमध्ये घेण्यात येणार सकारात्मक निर्णय !



राज्यातील कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी खुशखबर समोर आली आहे . ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या या 4 मागणींवर पावसाळी अधिवेशनांमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत .या संदर्भातील सविस्तर माहीती पुढीप्रमाणे जाणून घेवूयात ..

राज्य शासनांचे दिनांक 27 जुन पासुन पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहेत ,या पार्श्वभुमीवर राज्यातील राजपत्रित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची राज्य शासनांच्या मुख्य सचिव यांच्याशी विविध मागणीवर सविस्तर बैठक संपन्न झाली आहे , या बैठकीमध्ये राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करुन येत्या पावसाळी अधिवेशांमध्ये सदर प्रलंबित प्रश्न मार्गी काढण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहेत .

सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना 

( New National Pension Scheme ) : राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आलेली होती , परंतु याबाबत अद्याप पर्यंत अधिकृत्त शासन निर्णय / अधिसुचना निर्गमित झालेली नाही ,यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी असल्याने  , याबाबत येत्या अधिकवेशनांमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .

वाढीव महागाई भत्ता : 

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे 01 जानेवारी 2024 पासुन वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकुण 50 टक्के दराने डी.ए वाढ लागु आहे , याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासुन 4 टक्के वाढीव डी.ए लागु करणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे .

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे 

( Retirement Age ) :राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार त्याचबरोबर देशातील इतर 25 राज्य सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबतच्या मागणीवर येत्या पावसाळी अधिवेशनांमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे .

 राज्याती शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य येाजना अंतर्गत सुधारित ( New ) Cashless आरोग्य योजना लागु करणेबाबत , येत्या अधिवेशनांमध्ये निर्णय होण्याची माहिती समोर येत आहेत .

No comments:

Post a Comment