सरकारने नवीन सामान्य मान्यता आदेश रद्द करावा
जयंत आसगावकर : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
शिक्षकांची पदे कमी होणार आहेत. याचा मोठा परिणाम मराठी माध्यमाच्या शाळांवर होणार आहे.
कोल्हापूर : राज्य शासनाने दि. १५ मार्च
2024 रोजी काढलेला सर्वसाधारण मान्यता आदेश तात्काळ रद्द करावा, अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांनी शुक्रवारी अधिवेशनादरम्यान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली.
या आदेशामुळे विद्यार्थी संख्या घटणार असून बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही. हा आदेश रद्द करून पूर्वीप्रमाणे मंजूर करण्यात यावा. त्यावर मंत्री केसरकर यांनी हा आदेश रद्द करण्याबाबत शिक्षण आयुक्तांकडून अभिप्राय मागवला असून, लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
आमदार आसगावकर यांनी मंत्री केसरकर यांची भेट घेऊन सखोल चर्चा केली. ते म्हणाले, हा नवा आदेश अनेक शाळांना मारणार आहे. या आदेशामुळे मुख्याध्यापक पद, तसेच शाळेचे
शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे नवीन सर्वसाधारण मान्यता आदेश रद्द करण्याची मागणी शुक्रवारी अधिवेशनात मुंबईत केली.
No comments:
Post a Comment