वेतन सुधार अपडेट - वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे/सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत वित्त विभाग आदेश
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 12 जून 2024 रोजी शुद्धिपत्रकानुसार राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे/सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
वाचा :- १) शासन निर्णय क्रमांक: वेपुर ११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३
२) शासन परिपत्रक क्रमांक: वेपुर-११२३/प्र.क्र.५/सेवा-९, दिनांक २२ फेब्रुवारी, २०२४
शुध्दीपत्रक :-
वाचा येथील क्र.२ येथील दिनांक २२ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या परिपत्रकातील क्र.२ च्या पृष्ठावर तिसऱ्या ओळीत "१.१.२०१६ रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर " या वाक्याऐवजी " १.१.२०१६ रोजी व तद्नंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर असे वाक्य वाचण्यात यावे.
क्र.२ च्या पृष्ठावर पाचव्या ओळीत दि.१.१.२०१६ रोजी च्या पुढे " किंवा तद्नंतर " या शब्दांचा समावेश करण्यात यावा.
सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०६१२१६१४५७७८०५ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संपूर्ण शासन शुद्धिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment