वाढीव महागाई भत्ता ( DA ) :
राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे वाढीव चार टक्के महागाई भत्ता वाढ सत्वर मंजूर करण्यात येईल , असे नमुद करण्यात आलेले आहे .
निवृत्तीचे वय 60 वर्षे :
राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करणेबाबतचा अधिकृत्त प्रस्ताव मा.मंत्री पातळीवर सादर करण्यात आला असल्याचे नमुद करण्यात आला आहे .
सेवानिवृत्ती उपदान :
राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 14 लाख रुपये ऐवजी केंद्र सरकार प्रमाणे 25 लाख रुपये इतकी निश्चित करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे .
शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न :
ज्यातील शिक्षके तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सेवांतर्गत प्रश्न जसे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ( 12 , 24 ) व बक्षी समितीत शिफारस केल्यानुसार तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जुलै 2024 मध्ये शिक्षण सचिव पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करुन योग्य निर्णय घेतले जाणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
No comments:
Post a Comment