आम्ही वचन देतो की महाराष्ट्रातील प्रत्येक मुलासाठी मूलभूत शिक्षण कौशल्ये आत्मसात करण्यासाठी अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.
चला एकत्र मिळून अशी शाळा तयार करूया जी आपल्या मुलांना शुद्ध आनंद, समृद्ध अनुभव, अभिव्यक्तीसाठी मोकळी जागा, मुक्त छंद जोपासण्याची, नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देणारी आणि आत्मसन्मान जोपासण्याची संधी देईल. आपण सर्व मिळून अशी शाळा आणि घर बांधूया. जिथे मुले अर्थपूर्ण चौकशी, उद्देशपूर्ण लेखन आणि गणिताच्या पद्धती खऱ्या आयुष्यात लागू करतील आणि आजीवन शिकतील...
अशा प्रकारे, आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला निरोगी आणि आनंददायक शिक्षण देऊन 'प्रावीण्य बालक' बनविण्याचा संकल्प करतो.
No comments:
Post a Comment