शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत.. दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ सात दिवसांचे सात उपक्रम राबविणे SCERT चे निर्देश
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ने दिनांक 16 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत.. दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक, सर्व प्रशासन अधिकारी, नपा/ नप/मनपा, सर्व शिक्षण निरीक्षक, (दक्षिण, पश्चिम व उत्तर) यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ: १. मा. सचिव, भारत सरकार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.D.O. No. ०२-०५/२०२४-IS.१४, दिनांक ०९ जुलै, २०२४. २. मा. उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२२८/ एस.डी. ४, दिनांक १२ जुलै, २०२४
महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण घोरण२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.
शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम रावण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.
सोमवार, दि. २२ जुलै, २०२४
अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM Day) (परिशिष्ट १)
मंगळवार, दि.२३ जुलै, २०२४
मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस (FLN Day) (परिशिष्ट २)
बुधवार, दि. २४ जुलै, २०२४
क्रीडा दिवस (Sports Day) (परिशिष्ट ३)
गुरुवार, दि. २५ जुलै, २०२४सांस्कृतिक दिवस (Cultural Day) (परिशिष्ट ४)
शुक्रवार, दि. २६ जुलै, २०२४
कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस (Skilling and Digital Initiatives Day) (परिशिष्ट - ५अ ५ व)
शनिवार, दि.२७ जुलै, २०२४
मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम / शालेय पोषण दिवस (Eco Clubs for Mission LIFE/ School Nutrition Day) (परिशिष्ट ६)
रविवार, दि. २८ जुलै, २०२४
समुदाय सहभाग दिवस (Community involvement Day) (परिशिष्ट ७)
संदर्भ क्र. १ तसेच सोबतच्या परिशिष्ट १ ते ७ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षण सप्ताहामधील उपरोक्त तक्त्यातील उपक्रमांची अंमलबजावणी नेमून दिलेल्या कालावधीत आपण पूर्ण करा
No comments:
Post a Comment