PAT 1 Chatbot Online Marks Filling Update - पायाभूत मूल्यमापन चाचणी 2024 (PAT-1) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता सुविधा उपलब्ध SCERT च्या अधिकृत सूचना!
src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjNwvxNnDZai18Rs3yVcsKFsfOIn_SvcrGYLHDqb0QAXqHhaKtlJTa8VbhKhRLkctq3g0hkRVb10bKM1ZiIY-Rg5xuiAqZpK7b_w_H5ReiCc66LWrDaoHcbzi3eRK48EENA3Prq4c8VsyioTtT_gejxrfr6zakFYpETauyRcVn7UzkD1-A8Zmre1KifyUQ/s320/IMG_3200.jpeg" width="243" />
1. ज्या शिक्षकांना Deputation दिले आहे ते शिक्षक मूळ शाळेच्या आस्थापनेवर असतात. त्यामुळे त्यांना नवीन शाळेत गुण भरता येणार नाहीत. याकरिता त्या शाळेतील जुन्या शिक्षकांच्या लॉगिन वरून सर्व वर्गांची माहिती भरावी.
2. यावर्षी दुसरीतील मुले सरल पोर्टलवर तिसरीमध्ये प्रमोशन केल्यास, तिसरी मध्ये विद्यार्थी दिसतील त्याप्रमाणे त्यांची माहिती भरावी.
3. Chat Bot संदर्भात समस्या नोंदविण्यासाठीची लिंक पत्रामध्ये देण्यात आलेली आहे. लिंक : (https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA)
4. इयत्ता नववीचे विद्यार्थी दिसण्याकरिता Swifchat ॲप वरून लॉग आऊट करून पुन्हा रजिस्ट्रेशन करावे. (तांत्रिक अडचण असल्यामुळे)
5. मोबाईल नंबर चेंज झाला असल्यास शालार्थ पोर्टल, यु डायस प्लस व सरल पोर्टलवर नवीन नंबर अपडेट करावा. यानंतर सात ते आठ दिवसात आपला नवीन नंबर Chat Bot वर अपडेट होईल.
6. सद्यस्थितीत सेवार्थ प्रणाली वरील शिक्षकांना माहिती भरता येत नाही. याबाबत राज्यस्तरावर निर्णय झाल्यानंतर आपणास स्वतंत्रपणे पत्राद्वारे कळविण्यात येईल.
----------------
विद्या समीक्षा केंद्र,
SCERT, महाराष्ट्र, पुणे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे कार्यालयातून निर्गमित दिनांक 26 जुलै 2024 रोजी च्या परिपत्रकानुसार पायाभूत मूल्यमापन चाचणी महाराष्ट्र चे गुण चॅटबोट वर नोंदवणे बाबत पुढील प्रमाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना निर्देश देण्यात आले आहे.
STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २(PAT-१ ते ३) चे आयोजन करण्यात येणार आहे. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ चे आयोजन दि. १० ते १२ जुलै २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत. विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना सोबत देण्यात येत आहे. तसेच याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक प्रस्तुत कार्यालयाच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. राज्यातील शिक्षकांना पायाभूत चाचणी (PAT-१) चे गुण दि. २७ जुलै २०२४ ते दि. २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना कालावधी देण्यात येत आहे.
उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ/माध्य., शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-9 घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा.
तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.
१. पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) चाटबॉट मार्गदर्शिका :
२. पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) गुणांची नोंद करणेसाठी लिंक - https://bit.ly/PAT-MH
(डॉ. शोभा खंदारे)
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
No comments:
Post a Comment