स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने "हर घर तिरंगा" २०२४ या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत SCERT चे निर्देश.. सेल्फी अपलोड लिंक.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार १. विभागीय शिक्षण व उपसंचालक, सर्व विभाग, २. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व, ३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व). ४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व) ५. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर) ६. प्रशासन अधिकारी, (मनपा. नपा) सर्व, ७. शिक्षणप्रमुख (मनपा) यांना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने "हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
संदर्भ -१. D.O. No. १७-३०/२०२४-Coord, भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडील पत्र दि.
उपरोक्त संदर्भिय शासनाच्या पत्रानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा" या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२२-२३ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ऑगस्ट २०२३ या महिन्यामध्ये ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.
या वर्षी म्हणजे सन २०२४ मध्ये दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि पालक यांनी आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा, आणि तिरंगा बरोबरचे सेल्फी www.harghartiranga.com
व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करावेत, याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत आपण आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी दि. १५ ऑगस्ट २०२४ या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या अधिनस्त सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमध्ये झेंडा फडकविण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल याबाबत कार्यवाही करावी, सोबत केंद्र शासनाकडील पत्र जोडण्यात येत असून व झेंडा फडकविणे संबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यास सूचित करण्यात यावे
तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल म्हणजे घेतलेले उपक्रम, सहभागी शाळा संख्या, सहभागी विद्यार्थी संख्या, सहभागी नागरिक संख्या, अशा स्वरूपात परिषदेतील कलाक्रीडा विभागाच्या
(डॉ. शोभा खंदारे)
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
No comments:
Post a Comment