राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांत वैद्यकिय आपत्कालिन परिस्थितीत अनुसरावयाच्या कार्यपध्दीतीबाबत शासन निर्णय 29/10/2024
. शाळेमध्ये प्रथमोपचाराकरीता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात.
२. शाळांत संबंधित प्राधिकरणांच्या मानकांनुसार तातडीने प्रथमोपचाराकरीता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी First aid/sick room याकरीता खोली उपलब्ध असावी.
३. शाळेत आवश्यकतेनुसार प्रथमोपचार पेट्या (Frst Aid Kit) ठेवाव्यात. ४. शाळेतील विद्यार्थी / कर्मचाऱ्यांकरीता दरवर्षी कमीत कमी एक वैद्यकीय प्रथमोपचार प्रशिक्षण व वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात यावे.
५. सदर शिबिरामध्ये कृत्रिम श्वासोश्वास (Artificial Respiration), कृत्रिम वायुजिवन (CPR- Cardiopulmonary Resuscitation) व इतर तातडीचे प्रथमोपचार देणेबाबत त्यांना प्रशिक्षिण देण्यात यावे. शाळेच्या नजीक उपलब्ध असलेल्या शासकीय रुग्णालये, शासकीय आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाने आणि शासकीय व सार्वजनिक रूग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्यात यावेत व त्यांचेशी समन्वय ठेवण्यात यावा.
७. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शाळेत आवश्यकतेनुसार समन्वयक नेमण्यात यावेत.
८. आपत्कालीन परिस्थितीत सदर समन्वयकांने रुग्णास तात्काळ उपचार मिळण्याच्या दृष्टीने रुग्णालयांशी संपर्क साधावा व आजारी विद्यार्थ्यांस रुग्णालयात भरती करण्यात मदत करावी. ९. शाळेने नजीकच्या दवाखान्यांशी तसेच जवळपासच्या डॉक्टरांशी On-call सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत सामंजस्य करार करावेत व विद्यार्थ्यांना गरजेनुसार डॉक्टर On-call सुविधा उपलब्ध करुन द्यावी
No comments:
Post a Comment