google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत...

Saturday, October 5, 2024

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत...

 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत...

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत...

                  राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्याधर्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.

१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका)

२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)

४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

प्रस्तुत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पहिल्या टप्प्यात उपरोक्त गट क्र. १ ते ३ साठी जिल्हा स्तरावर व गट क्र. ४ व ५ साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (विभाग) स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी whats app, वर्तमानपत्र यासारख्या प्रसार माध्यमांच्याद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी. यासाठी प्राचार्य, डाएट व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद यांनी एकमेकांशी समन्वय साधावा. आपल्या स्तरावरून स्पर्धेबाबत आणि सोबत दिलेले माहितीपत्रक अवलोकन करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी अधिनस्त कार्यालयातील सर्व गटातील स्पर्धकांना याबाबत अवगत करावे.

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

           Download


No comments:

Post a Comment