शनिवार सकाळ सत्रातील शाळेच्या वेळेतील बदलाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश 21/02/2025
सकाळी ९ पुर्वी भरणा-या राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९.०० किंवा ९.०० नंतर भरविण्याचे निर्देश प्राप्त आहेत.
तथापि, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा शनिवारी सकाळी ९.०० ते १.०० या वेळेत भरविणे विदयार्थी व पालकांसाठी गैरसोयीचे असल्याने, सदरची वेळ पुर्वीप्रमाणेच ठेवण्यात यावी, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक शाळांची शनिवार रोजीची वेळ पुर्वीप्रमाणे सकाळी ७.३० ते ११.०० या वेळेत घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.
तरी याव्दारे सूचीत करण्यात येते की, जिल्हयातील सर्व प्राथमिक शाळांची शनिवारच्या शाळेची वेळ ही सकाळी ७.३० ते ११.०० अशी करण्यात येत आहे. याबाबत आपल्या अधिनस्त सर्व शाळांना सूचीत करण्यात यावे. तसेच बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील शालेय वेळेच्या तरतुदीचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतही सर्व संबंधितांना सूचीत करण्यात यावे.
गुलाब खरात (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद बुलढाणा
प्रतिलीपी-
१. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीकरीता.
2. शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग, अमरावती यांना माहितीकरीता.
3. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशि. संस्था, बुलढाणा यांना यांना माहितीकरीता.
4. शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य. / योजना), जिप बुलढाणा यांना माहिती तथा उचित कार्यवाहीस्तव.
५. मा. अध्यक्ष/सचिव, शिक्षण संघटना, बुलढाणा जिल्हा यांना माहितीकरीता.
No comments:
Post a Comment