google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-२ पदावर २५% पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरीता मार्गदर्शन - ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन

Wednesday, February 19, 2025

विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-२ पदावर २५% पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरीता मार्गदर्शन - ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन

 

विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-२ पदावर २५% पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरीता मार्गदर्शन - ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन

विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-२ पदावर २५% पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरीता मार्गदर्शन बाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.

१) शासन समक्रमांक दि.१६.२.२०२४ रोजीचे पत्र

२) आपले पत्र क्र. जिपना/शिविप्रा/आस्था-२/वि.अ.पदो/प्र.क्र.५७/१२९१/२०२५, दि.१३.२.२०२५.



महोदय,

उपरोक्त विषयाबाबत शासनाच्या संदर्भ क्र. १ येथील दि.१६.२.२०२४ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सूचनांस अनुसरुन संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग ३ श्रेणी २ या पदावरील पदोन्नतीबाबत दि.१०.६.२०१४ रोजीच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार आवश्यक ती नियमोचित कार्यवाही करण्यात यावी.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांनी दि. २७.०६.२०२३ रोजीच्या पत्रान्वये विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-२ पदाच्या पदोन्नती ही ग्रामविकास विभागाच्या दि. ०३.०५.२०१९ च्या मार्गदर्शन पत्र तसेच ग्रामविकास विभागाची दि. १०.६.२०१४ ची अधिसूचनेतील तरतूदी त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने दि. १.८.२०१९ च्या शासन निर्णयातील तरतूदीनूसार पदोन्नतीसंदर्भात एकत्रित मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करुन पदोन्नतीची कार्यवाही करण्यासंदर्भात दिलेले निदेश या सर्व बाबींचा विचार करुन विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-२ पदाच्या पदोन्नतीसंदर्भात मार्गदर्शन मिळण्याची विनंती केलेली आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाचे अभिप्राय घेतले असता, त्या विभागाने खालीलप्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत.

No comments:

Post a Comment