google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: OTT TTMS Online Badali New Update 2025 - जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये संवर्ग दोन बदली नियम बदलणार? शिक्षण मंत्र्यांचे ग्राम विकास मंत्र्यांना पत्र 15/04/2025

Tuesday, April 15, 2025

OTT TTMS Online Badali New Update 2025 - जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये संवर्ग दोन बदली नियम बदलणार? शिक्षण मंत्र्यांचे ग्राम विकास मंत्र्यांना पत्र 15/04/2025

 

OTT TTMS Online Badali New Update 2025 - जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये संवर्ग दोन बदली नियम बदलणार? शिक्षण मंत्र्यांचे ग्राम विकास मंत्र्यांना पत्र 15/04/2025

सन २०२५ मध्ये होणा-या जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे बदल होणेबाबत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्र्यांना पुढील प्रमाणे विनंती पत्र दिले आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे बदल व्हावे असे वाटते.

१. सद्या एकत्र असलेले (३० कि.मी. च्या आतील) बदलीपात्र पती-पत्नी शिक्षक यांना तसेच संवर्ग २ मधील शिक्षकांना बदली प्रक्रिया २०२५ मध्ये संवर्ग १ प्रमाणे नकार देण्याची संधी मिळावी, जेणेकरुन बदल्यांची संख्या कमी होईल ही विनंती.

२. या आधीच ३० कि.मी. च्या आतील सदर पती-पत्नी शिक्षकांचा / संवर्ग २ शिक्षकांचा जोडीदार, यंदाच्या बदल्यांमध्ये बदली पात्र असल्यास, संवर्ग-२ प्रमाणे सर्व रिक्त जागा बदली पात्र सर्व शिक्षकांच्या जागा दाखवल्या जाव्यात ही विनंती.

३. पती-पत्नी यांना प्राधान्य देवून त्यांचे शासन धोरणानुसार एकत्रिकरण अबाधित ठेवावे ही विनंती.

४. अवघड क्षेत्र बदली राऊंडमध्ये पती/पत्नी विस्थापित संख्या मोठ्या संख्येने वाढेल या करिता नकाराची संधी द्यावी.

तरी, वरील प्रमाणे जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत बदल होणेबाबत विनंती आहे.


आपला,

(दादाजी भुसे)

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 28 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे नवीन निर्देश दिले आहेत.

उपरोक्त विषयाबाबत आपणांस खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे :-

(अ) जिल्हांतर्गत बदली :-

१) जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन २०२५ करीता, जे शिक्षक दि.३० जून २०२५ रोजी वयाची ५३ वर्षे पूर्ण करीत असतील, अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग-१ अंतर्गत पात्र ठरविण्यात यावे.

२) सन २०२२ मध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत, अशा शाळांमधील ३ वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करुनही सन २०२२-२३ मध्ये बदली झाली नव्हती, अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील अनु. क्र. १.७.२ येथील तरतुदीनुसार सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी.

तसेच या विभागाच्या पत्र क्र. जिपब-११२५/प्र.क्र.१४/आस्था-१४, दि. २८ फेब्रुवारी, २०२५ मधील अनु.क्र. १ येथे नमुद केल्यानुसार सदर शिक्षक टप्पा क्र.७करीता बदली पात्र होणार नाहीत.

३) सर्व जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करावी.

४) अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत टप्पा क्र. ७ राबविण्यात यावा. तथापि, त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा

निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे विहीत तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.

५) पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग-१ मधून बदलीपात्र ठरविण्यात यावे.

(ब) आंतरजिल्हा बदली :-

१) सन २०२५ या वर्षात नविन शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे विभागाच्या दि.२३.८.२०२३ रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील २.८ मध्ये नमुद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातुन बाहेर जाण्याकरीता रिक्त पदांची टक्केवारी १० टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे, ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया २०२४-२५ करीता शिथील करण्यात येत आहे. तथापि, शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापुर्वी नविन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील.

२) आंतरजिल्हा बदलीसाठी दि.३० सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संचमान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविण्यात याव्यात. तसेच सदर संचमान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील, अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुज्ञेय असणार नाही.


आपली, (नीला रानडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन


शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक कराClick here

No comments:

Post a Comment