google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: HSC SSC Results Maharashtra 2025 Updates - 10 वी 12वी निकाल महाराष्ट्र २०२५ कधी लागणार तारीख जाहिर?

Saturday, May 3, 2025

HSC SSC Results Maharashtra 2025 Updates - 10 वी 12वी निकाल महाराष्ट्र २०२५ कधी लागणार तारीख जाहिर?

 

HSC SSC Results Maharashtra 2025 Updates - 10 वी 12वी निकाल महाराष्ट्र २०२५ कधी लागणार तारीख जाहिर?

सुप्रसिद्ध वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार दहावी बारावीचा निकाल बाबत पुढील प्रमाणे माहिती मिळाली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल दि. १५ मेपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये निकालाबद्दल उत्सुकता वाढली आहे. परीक्षेचा निकाल डीजी लॉकर अॅपमध्ये उपलब्ध केला जाणार आहे. अपार आयडी असलेल्या विद्यार्थ्यांना डीजी लॉकरमधील निकाल कायमस्वरूपी पाहता येणार आहे.

१५ मे पर्यंत दहावी , बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार

गेल्या काही वर्षात बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जात होता. परंतु, यावर्षी दोन्ही परीक्षांचा निकाल दि. १५ मेपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.


निकाल लवकर लागल्यास प्रवेश प्रक्रियाही लवकर! 

दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांची पुढील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होते. यावर्षी दहावी व बारावीचे निकाल दि. १५ मेपर्यंत जाहीर केले जाणार असल्यामुळे प्रवेश प्रक्रियाही वेळेवर सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेचे नुकसान वाचणार आहे. तसेच शाळा, महाविद्यालयही वेळेवर सुरु होण्यास मदत होणार आहे.


HSC & SSC Result: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दहावी व बारावीच्या परीक्षा मागील एक महिन्यामध्येच झालेल्या आहेत. आणि आता विद्यार्थ्यांना आतुरता लागली आहे. की कधी निकाल लागतील. तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगू इच्छितो की निकालाची तारीख जाहीर झालेली आहे. HSC & SSC Result निकाल कोणत्या दिवशी लागणार आहेत. हे आपण सविस्तर आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो जरा सा ही वेळ वाया न घालवता आपण माहिती पाहूयात की दहावी व बारावीचा निकाल कधी लागेल….! HSC & SSC Result

मित्रांनो दहावी व बारावीची परीक्षा झाली की लगेच विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना असे वाटते की निकाल लागावा. परंतु मित्रांनो शैक्षणिक अधिकारी पेपर चेक करूनच निकाल देतात. या कारणामुळे निकालाला थोडा उशीर होतो. (HSC & SSC Result) मित्रांनो निकालाची तारीख जाहीर झालेली आहे. की नाही हे देखील आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो मागील वर्षी कोणत्या तारखेला निकाल लागला होता. यावर्षी किती तारखेला निकाल लागण्याची अपेक्षा आहे हे आपणास सांगणार आहोत.HSC & SSC Result


No comments:

Post a Comment