google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education

Friday, June 14, 2024

राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के डी.ए (महागाई भत्ता) बाबतचा निर्णय येत्या पावसाळी अधिवेशनांमध्ये होणार !

 राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के डी.ए (महागाई भत्ता) बाबतचा निर्णय येत्या पावसाळी अधिवेशनांमध्ये होणार !

राज्यातील शासकीय , निमशासकीय तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ हा येत्या पावसाळी अधिवेशनांमध्ये होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे .

पावसाळी अधिवेशनाला दिनांक 27 जुन पासून सुरुवात

 : महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन हे दिनांक 27 जुन ते दिनांक 12 जुलै 2024 या कालावधीमध्ये होणार आहे . यांमध्ये अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करुन निर्णय घेतले जाणार आहेत . तर राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दिनांक 28 जुन रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडले जाणार आहेत .

यावेळी पावसाळी अधिवेशन हे दिनांक 27 जुन ते 12 जुलै या तेरा दिवस कामकाज चालणार असून दिनांक 29 जुन रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखिल विधीमंडळाचे कामकाज सुरु राहणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . यांमध्ये शेतकरी , कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहेत .

शासकीय कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीवर निर्णय

 :महाराष्ट्र राज्यातील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषद ) तसेच निवृत्तीवेतन धारकांना केंद्र सरकारने दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन लागु करण्यात आलेल्या 4 टक्के डी.ए वाढ लागु करणेबाबत अधिकृत्त निर्णय सदर हिवाळी अधिवेशनांमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे .

जानेवारी पासुनचा मिळणार डी.ए फरक

 : सदरचा वाढीव डी.ए हा जानेवारी पासून लागु करण्यात येणार असल्याने , राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मे या कालावधीतील डी.ए फरक मिळणार आहे . पावसाळी अधिवेशन हे दिनांक 27 जुन ते 12 जुलै या कालावधीत होणार असल्याने , 30 जुन पर्यंत डी.ए वाढीचा निर्णय घेतल्यास , राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुन पेड इन जुलै वेतनासोबत डी.ए लाभ लागु होईल .

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे निर्देश

 

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे निर्देश

प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयातून दिनांक 13 जून 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करणेबाबत  प्राथमिक शिक्षण संचालकांनी १) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग) २) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) सर्व जिल्हे ३) प्रशासन अधिकारी, महानगरपालिका/नगरपालिका - सर्व ४) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक-१५/०६/२०२४ व विदर्भातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक ०१/०७/२०२४ रोजी प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सत्र २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी स्वागत करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पुढील प्रमाणे आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी.

१. शाळेच्या परिसरातील (वयोगट ६ ते १४ वर्ष) वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात यावी.

२. शाळाबाह्य झालेली किंवा असलेल्या बालकांचा शोध शाळापूर्व तयारीच्या कालावधी मध्ये करण्यात यावा.


निदर्शनास आल्यास अशा बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावेत. ३. नजीकच्या परिसरातील दगडखाणी, वीटभट्टी, बांधकामाचे स्थळ, उद्याने बाजारपेठा, पदपथ, सिग्नल, कुटीर उद्योग, कामगार वस्त्या या सारख्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे,

४. शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आपण व आपल्या अधिनस्त प्रत्येक अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे/शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन/प्रबोधन करावे. ५. विद्यार्थ्यांचे स्वागत फुल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य, स्थानिक स्रोत मध्ये उपलब्ध उपयोगी सामुग्री देऊन करण्यात यावे.

६. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, सदस्य, पालक व शिक्षक यांचेशी विचार विमर्श करून अध्ययन निष्पत्ती साठी उपाय योजना, सेतू अभ्यासक्रम, इतर विविध शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उद्बोधन व सहकार्य करावे.


९. शाळा सुरु होण्याच्या दिवशी शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून प्रभातफेरी आयोजन, विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत, मोफत पुस्तक वितरण, मोफत गणवेश इत्यादी कार्यक्रम आयोजित करावेत. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था (युवक मंडळे, क्रीडा मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ) यांचे सहकार्य घ्यावे.

१०. दिनांक १५ जून, २०२४ रोजी राज्यात शाळा प्रारंभ होत आहेत. हा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्यात शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करावा.

११. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधून या दिवशी मिष्ठान भोजन द्यावे.


(नंदकुमार बेडसे)

प्र. शिक्षण संचालक (प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे-०१


प्रत माहितीस्तव सविनय सादर मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, पुणे, महाराष्ट्र राज्य.


७. शाळा प्रवेशोत्सावाच्या कार्यक्रमाची स्थानिक पातळीवरील प्रसार माध्यमाद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी. ८. शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थ्यांचे, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्त इत्यादी यांचे सहकार्य घेण्यात यावे.

वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


Thursday, June 13, 2024

शाळापूर्व तयारी अभियान २०२४-२५ Shala purva Tayari Abhiyan २०२४

 

शाळापूर्व तयारी अभियान २०२४-२५ Shala purva Tayari Abhiyan २०२४

शाळापूर्व तयारी अभियान २०२४-२५ Shala purva Tayari Abhiyan २०२४ #Shalapurva Tayari Abhiyan२०२४, व #शाळापूर्वतयारीअभियान २०२४ 

मागील वर्षी एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीत इयत्ता पहिलीला दखलपात्र बालकांसाठी "शाळापूर्व तयारी अभियान" अंतर्गत "पहिले पाऊल" हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आहे. त्यानुसार संदर्भ १ नुसार STARS २०२४-२५ नुसार या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी "शाळापूर्व तयारी अभियानाची" अंमलबजावणी करण्यात येत आहे.

शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ माहे एप्रिल २०२४ आणि मेळावा क्र. २ माहे जून २०२४ मध्ये आयोजित करण्यात यावे. दोन्ही मेळाव्यादरम्यान १ ते ८ आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालकांकडून करून घ्यावी. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक मदत करावी
क) प्रशिक्षण आयोजनाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

१ राज्यस्तर प्रशिक्षण
राज्यस्तर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दिलेल्या नियोजन / वेळापत्रकानुसार करणे. जिल्हस्तरावरून सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नावे https://tinyurl.com/SRP२०२४ २५Statelevel Training गुगल लिंक द्वारे मागविणे. सदर प्रशिक्षण सकाळी १० ते २ या कालावधीत झुमच्या माध्यमातून ऑनलाईन घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणाची लिंक स्वतंत्रपणे whatsapp गटावर शेअर करण्यात येईल.

२. जिल्हा स्तर प्रशिक्षण: 
प्राचार्य, DIET यांनी जिल्हास्तर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दिलेल्या नियोजन / वेळापत्रकानुसार करावे. जिल्हास्तरावरील प्रशिक्षणासाठी एक दिवसीय कार्यशाळेसाठी प्रति प्रशिक्षणार्थी १०००/- रुपये यामर्यादेत जेवण, चहा, कार्यशाळेसाठी बॅनर व पोस्टर, कार्यशाळेसाठी लागणारी स्टेशनरी, प्रवास भत्ता व सुलभक मानधन यासाठी खर्च करण्यात यावा.

३. तालुकास्तरीय प्रशिक्षण 
तालुकास्तर प्रशिक्षणाचे आयोजन वेळापत्रकाप्रमाणे प्राचार्य, DIET यांनी सबंधित गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयाने करावे. जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती हे तालुकास्तरावर तज्ञ मार्गदर्शक / सुलभक म्हणून काम करावे. तालुकास्तरावरील प्रशिक्षणासाठी एक दिवसीय कार्यशाळेसाठी प्रति प्रशिक्षणार्थी ३००/- रुपये यामर्यादेत जेवण, चहा, कार्यशाळेसाठी बॅनर व पोस्टर, कार्यशाळेसाठी लागणारी स्टेशनरी, प्रवास भत्ता व सुलभक मानधन यासाठी खर्च करण्यात यावा.

४. केंद्र स्तरीय प्रशिक्षण
 दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषेदेचे आयोजन नियोजित तारखेस करण्यात यावे. तालुकास्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती यांनी केंद्रस्तरीय प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक / सुलभक म्हणून काम करावे. केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेसाठी एकूण १५००/- रुपये यामर्यादेत चहा, कार्यशाळेसाठी बॅनर, कार्यशाळेसाठी लागणारी स्टेशनरी यासाठी खर्च करण्यात यावा.

ड) उपरोक्त कार्यवाही करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी. :

१. उपरोक्त सर्व स्तरावरील प्रशिक्षण घेताना प्रशिक्षण उपस्थिती, प्रशिक्षण अभिलेखे, छायाचित्रे, चित्रफिती आपल्या स्तरावर जतन करून ठेवाव्यात.

२. संदर्भ क्र. १ अन्वये STARS २०२४-२५ अंतर्गत मंजूर निधी मा. राज्य प्रकल्प संचालक, MPSP, मुंबई यांचेकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरील एक दिवसीय प्रशिक्षणासाठी आर्थिक निकषांप्रमाणे

झालेला प्रत्यक्ष खर्च संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना वर्ग करण्यात येईल.

३. प्रशिक्षणाचे सुस्पष्ट व्हिडीओ (२ किंवा ३ मिनिटांचे), फोटो इ. माहिती समाजसंपर्क माध्यमांवर (फेसबुक, द्वीटर, इन्स्टाग्राम, इ.) #shalapurvtayari२०२४ या HASHTAG (#) चा वापर करून अपलोड करावेत. समाजसंपर्क माध्यमांवर पोस्ट अपलोड करताना स्थळाचे नाव व जिल्हा नमूद करावा.

४. उपरोक्त सर्व प्रशिक्षणे तसेच शाळास्तरावरील पहिल्या व दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती संकलित करण्यासाठी बालशिक्षण विभाग व प्रथम संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या वेबपोर्टलच्या https://gpconnect.prathaminsights.in/gp/MH वापर करण्यात यावा.


वरील परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक

                           Download

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : महागाई भत्तामध्ये 50 टक्के वाढ करणेबाबत ; मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन !

 

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : महागाई भत्तामध्ये 50 टक्के वाढ करणेबाबत ; मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन 

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्के वाढ करणेबाबत , राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहेत . सदर बैठकीमध्ये राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना वाढीव डी.ए लागु करण्यात येणार आहे .

देशांमध्ये काल दिनांक 09 जुन पासून खऱ्या अर्थाने आचारसंहिता उठली आहे , यामुळे राज्यातील विविध प्रलंबित कामे पुर्ण करण्यासाठी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतले जाणार आहेत . यांमध्ये राज्यातील शेतकरी , कर्मचारी , निवृत्तीवेतनधारक , इतर विविध प्रलंबित असणाऱ्या बाबींवर निर्णय घेतले जाणार आहेत .

महागाई भत्ता वाढीचा होणार निर्णय

: राज्य शासन सेवेतील सरकारी , निमशासकीय ( जिल्हा परिषद ) कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन 4 टक्के डी.ए वाढ लागु करणेबाबत , निर्णय घेतला जाणार आहे , यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना एकुण 50 टक्के प्रमाणे डी.ए वाढ होईल .

माहे जुन पेड जुलै वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार वाढीव डी.ए : माहे जुन पेड इन जुलै वेतन / पेन्शन देयकासोबत कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के डी.ए चा प्रत्यक्ष लाभ दिला जाईल , अशी माहिती समोर येत आहेत , तर माहे जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीमधील डी.ए फरकाची रक्कम जुन वेतनासोबत अदा केली जाईल .

कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठक : 

जुन महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक आयोजित केली जाणार असून , यांमध्ये विविध प्रलंबित बाबींवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे , यांमध्ये कर्मचाऱ्यांचा प्रलंबित डी.ए बाबत अधिकृत्त निर्णय घेतला जाईल .


Wednesday, June 12, 2024

International Day of Yoga on June 21 दि. २१ जून २०२४ हा दिवस दहावा आंतराष्ट्रीय योग दिन मार्गदर्शक सूचना

 

International Day of Yoga on June 21 दि. २१ जून २०२४ हा दिवस दहावा आंतराष्ट्रीय योग दिन मार्गदर्शक सूचना


शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्व विचारात घेऊन प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन दिनांक २१ जून रोजी साजरा करण्यात येतो. सयुंक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून घोषित केला आहे. यानुसार प्रतिवर्षी २१ जून हा दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबत सविस्तर माहिती www.ayush.gov.in या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यानुसार योग विषयक दिलेल्या सुचनाचे पालन करुन जिल्हयामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा च्या संयुक्त विद्यामाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात यावा.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी खालील सुचनाचे पालन करण्यात यावे.

आंतरराष्ट्रीय योग दिन सुचना

१. जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने योग दिनाचे आयोजन करण्यात यावे.
२. शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन सी सी नेहरु युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यामध्ये सदर योग दिन साजरा करण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. 
३. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शाळामध्ये सदर दि नाचे आयोजन करण्यात यावे.
४. योग विषयक प्रचार व प्रसाराचे कार्य करणा-या विविध संस्था यांचे सहकार्य घेण्यात यावे. त्यांची बैठक आयोजित करुन त्यांचे मार्गदर्शक यांचे सहकार्य घेण्यात यावे.
५. मुख्य कार्यक्रमामध्ये मा. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, नामांकित खेळाडू, नागरीक यांना आंमत्रित करण्यात यावे,
६. योग विषयक प्रचार व प्रसार करण्यासाठी सदर दिनाचे महत्व विचारात घेऊन चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात यावे.
७. दिनांक २१ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यशस्वीरित्या आयोजन संपन्न झालेनंतर त्याचा सविस्तर अहवाल क्रीडा संचालनालयास सादर करण्यात यावा. 
पेपर कात्रणे, योगा कार्यक्रमांचे करण्यात आलेले नियोजन, निश्चित केलेली स्थळे, फोटो, सहभागी युवक, युवती, जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिक इत्यांदी संख्या आंतरराष्ट्रीय योग दिनांचे आयोजन पुर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी दु. ३.०० वाजेपर्यंत कार्यासन च्या ईमेल  वर पाठविण्यात यावी.


वेतन सुधार अपडेट - वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे/सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत वित्त विभाग आदेश

 

वेतन सुधार अपडेट - वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे/सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत वित्त विभाग आदेश

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 12 जून 2024 रोजी  शुद्धिपत्रकानुसार राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे/सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


वाचा :- १) शासन निर्णय क्रमांक: वेपुर ११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दिनांक १३ फेब्रुवारी, २०२३

२) शासन परिपत्रक क्रमांक: वेपुर-११२३/प्र.क्र.५/सेवा-९, दिनांक २२ फेब्रुवारी, २०२४


शुध्दीपत्रक :-

वाचा येथील क्र.२ येथील दिनांक २२ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या परिपत्रकातील क्र.२ च्या पृष्ठावर तिसऱ्या ओळीत "१.१.२०१६ रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर " या वाक्याऐवजी " १.१.२०१६ रोजी व तद्नंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर असे वाक्य वाचण्यात यावे.


क्र.२ च्या पृष्ठावर पाचव्या ओळीत दि.१.१.२०१६ रोजी च्या पुढे " किंवा तद्नंतर " या शब्दांचा समावेश करण्यात यावा.


सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०६१२१६१४५७७८०५ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संपूर्ण शासन शुद्धिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शिक्षक बदली अपडेट - जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण शासन शुद्धीपत्रक.

 

शिक्षक बदली अपडेट - जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण शासन शुद्धीपत्रक.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 12 जून 2019 रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतर जिल्हा बदलासाठी सुधारित धोरणामध्ये बदल करण्यासाठी पुढील प्रमाणे शासन शुद्धिपत्रक प्रसिद्ध केली आहे.


वाचा :

जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक: आंजिब-२०२३/प्र.क्र. ११७/आस्था-१४ २५, मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई-४०० ००१, दिनांक : १२ जून, २०२४.


१) शासन निर्णय क्र. आंजिब-२०२३/प्र.क्र. ११७/आस्था-१४, दिनांक २३.०५.२०२३.


शासन शुद्धीपत्रक :

जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण वाचा क्र. १ येथील ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र. आंजिब-२०२३/ प्र.क्र. ११७/ आस्था-१४ नुसार निश्चित करण्यात आलेले आहे.

सदर शासन निर्णयातील मुद्दा क्र. ४ येथील

"वरील प्रकरणांबाबत सर्व कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे निकाली काढण्यात येतील"

या ऐवजी

"वरील प्रकरणांबाबत सर्व कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे प्रकरणपरत्वे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने निकाली काढण्यात येतील." असे वाचावे.

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेताक २०२४०६१२१४२७०७१९२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे