google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education

Friday, August 9, 2024

विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान इयत्ता १ ते ८ अध्ययन निष्पत्ती अभियानातील निरीक्षणाचे मुद्दे निर्देश/सूचना परिपत्रक शाळा भेट प्रपत्र पीडीएफ डाउनलोड .

 

विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान इयत्ता १ ते ८ अध्ययन निष्पत्ती अभियानातील निरीक्षणाचे मुद्दे निर्देश/सूचना परिपत्रक शाळा भेट प्रपत्र पीडीएफ शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी/विद्यार्थीनीस गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देणे हे आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाद्वारा विविध योजना राबविल्या जातात. या ध्येय धोरणांची व विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी. पडताळणी तसेच राबविण्यात आलेल्या योजनांची फलनिष्पत्तीचा विचार करुन सुधारणा करणे आवश्यक असते. या अनुषंगाने माहे ऑगष्ट-२०२४ मध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान" हा उपक्रम दिनांक १.८.२०२४ ते ३१.८.२०२४ या कालावधी दरम्यान राबविण्यात येत आहे. त्यानुसार संदर्भ क्रं.१ व २ नुसार प्राप्त निर्देशानुसार अभियाना दरम्यान आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.


अभियानाची कार्यदिशा -

१. अभियानादरम्यान पहिल्या २० दिवसात प्रत्यक्ष शाळाभेटी करणे. तद्नंतरच्या ०६ दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा/उपाययोजना करणे, तद्नंतरच्या ०४ दिवसामध्ये अनुपालनाची खात्री करणे.

२. आठवडयातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस कार्यालयीन कामकाज करणे, उर्वरित तीन/चार दिवस वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व विषय साधन व्यक्ती यांनी शाळा भेटी करणे. अ.क्रं. १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करणे

३. वरिष्ट अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व विषय साधन व्यक्ती यांनी शाळेला भेट दिल्यानंतर परिशिष्ट-अ नुसार भेटी/निरीक्षण अहवाल सरल पोर्टलवर सदर शाळेच्या लॉगिन आयडी मधून त्याच वेळेस भरणे. व अहवाल अद्ययावत ठेवणे.

४. सदर अभियानातंर्गत जास्तीत जास्त शाळा तपासल्या जातील हे उद्दिष्ट ठेवून त्या अनुषंगाने नियोजन करुन शाळा भेटी करणे.

आपल्या अधिनस्त कर्मचारी यांच्या शाळाभेटींचा दैनंदिन आढावा आपल्या स्तरावरुन घेण्यात घेऊन शाळाभेटी बाबतच्या नोंदी आपल्यास्तरावर ठेवण्यात याव्यात


शिक्षण आयुक्त यांनी दि. २९ जुलै २०२४ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रका नुसार विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४ राबविणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 

भाग एक शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी / विद्यार्थिनीस गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देणे हे आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत गुणवत्ता पूर्ण शिक्षणा करिता विविध योजना राबविल्या जात आहेत. या ध्येय, धोरणांची व विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरांवर प्रभावी अंमलबजावणी, पडताळणी तसेच वेळोवेळी या अभियानांच्या फलनिष्पत्तीचा विचार करून सुधारणा करणे आवश्यक असते. मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २६.०७.२०२४ रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट-२०२४ मध्ये "विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान" राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते काय, तसेच अंमलबजावणीमध्ये येणा-या अडथळयांचा विचार करुन, आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्यास्तव सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी "विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान" अंतर्गत दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४ वा कालावधीदरम्यान परिशिष्ट-अ मध्ये जोडल्याप्रमाणे शाळांचे निरीक्षण करावयाचे आहे व अहवाल सादर करावयाचे आहेत.


अभियानाची कार्यदिशा :-

१. अभियानादरम्यान पहिल्या २० दिवसात प्रत्यक्ष शाळाभेटी करणे, तद्नंतरच्या ०६ दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा / उपायोजना करणे, तदनंतरच्या ०४ दिवसामध्ये अनुपालनाची खात्री करणे.

२. आठवडयातील प्रत्येक सोमवार व शुक्रधार हे दोन दिवस कार्यलयीन कामकाज करणे. उर्वरित तीन/चार दिवस शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांनी शाळा भेटी करणे. अ.क्र.१ मध्ये नमूद प्रमाणे कार्यवाही करणे.

३. सरल पोर्टलवर केंद्रप्रमुख/गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी/प्राचार्य/विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी/निरीक्षण अहवाल लॉगीन मधून दररोज अद्यावत करणे.

वरील मोहिमेसाठी आपल्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपसंचालक यांनी जास्तीत जास्त शाळा तपासल्या जातील अशा प्रकारचे उद्दीष्ट ठरवून द्यावे. संबंधितांनी वरील मुद्दयांवर प्रभावी निरीक्षण करुन बिनचूक माहिती संकलित करावी. त्यांचे लगतचे पर्यवेक्षीय अधिकारी यांनी स्वतःचे उद्दीष्टांव्यतिरिक्त त्यांचे अधिनस्त कर्मचा-यांनी केलेल्या निरीक्षण शाळांची आवश्यकतेनुसार पडताळणी करावी. यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना योग्य प्रकारे पोहचत आहे काय याची खातरजमा होणे आवश्यक आहे.

भाग दोन :-

पालक, विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन तसेच विविध मा. लोकप्रतिनिधी यांच्याकडून आपल्या विभागातील शासकीय कार्यालयांकडे निवेदने/अर्ज प्राप्त होत असतात. अशा अर्जावर / निवेदनांवर वेळेत कार्यवाही होण्यास्तव विभागाने २५० पेक्षा जास्त सेवा "लोकसेवा हमी कायद्यांतर्गत" घोषित केलेल्या आहेत. तसेच या व्यतिरिक्त ब-याच सेवा विभागामार्फत सर्वच स्तरावर देण्यात येतात. या सर्व सेवा लाभार्थ्यांना विहीत वेळेत मिळाव्यात असे अपेक्षीत आहे.

या करीता दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४ या दरम्यान कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात यावा. यासाठी सर्वसाधारण आवक नोंदवही तसेच संबंधित कार्यासनाच्या कार्यविवरण पंजी (वर्कशीट) नोंदीचा संदर्भ घेण्यात यावा. त्यावर निर्णय घेण्याची कार्यवाही करून याबाबतच्या नोंदी परिशिष्ट-ब मध्ये ठेवण्यात याव्यात. वेळोवेळी नजीकच्या संनियंत्रण अधिकारी यांनी सदर नोंदी काळजीपूर्वक तपासाव्यात व तसे साक्षांकन करावे.

वरील दोन मोहिमा विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने सर्व संबंधितांनी गांभीर्यपूर्वक या अभियानात सक्रीय सहभाग घेउन यशस्वीरीत्या सोबत जोडलेल्या दोन्ही परिशिष्टामधील माहिती उपसंचालक संचालक यांनी नियमित संकलित करावी. याबाचत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात मा. मंत्री महोदय (शालेय शिक्षण), मा.प्रधान सचिव (शालेय शिक्षण) व आयुक्त (शालेय शिक्षण) क्षेत्रीय स्तरावर विभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. वरील दोन्ही बाबींची फलनिष्पत्ती तपासणार आहेत, याची नोंद घ्यावी.


आयुक्त,

 शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे


शाळा भेट प्रपत्र पीडीएफ डाउनलोड.

Download


Thursday, August 8, 2024

९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान; अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार

 ९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान; अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार



९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येईल.

यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग नोडल विभाग राहणार असून ग्रामविकास विभाग हा ग्रामीण भागासाठी तर, नगर विकास विभाग हा शहरी भागांसाठी नोडल विभाग राहील.

या काळात तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेला, तिरंगा सेल्फी अशा विविध माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येईल तसेच त्या-त्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतील.  १३, १४ आणि १५ ऑगस्ट असे ३ दिवस घरोघर तिरंगा फडकविण्यात येईल.


Sunday, August 4, 2024

सारथी पुणे द्वारा आयोजित तालुका व महानगरपलिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्याध्यांसाठी "राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४" आयोजन संपूर्ण माहिती

 

सारथी पुणे द्वारा आयोजित तालुका व महानगरपलिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्याध्यांसाठी "राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४" आयोजन संपूर्ण माहिती

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे कार्यालयातून दिनांक 12 जुलै 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे आयोजित तालुका व महानगरपलिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्याध्यांसाठी "राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४" आयोजन करणेबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत. 


संदर्भ:- मा. व्यवस्थापकीय संचालक यांची मान्य टिपणी दिनांक: १०/०७/२०२४

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची कर्तृत्वसंपन्न कारकीर्द ही महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व ठरली आहे. सुख विलासाची सर्व साधने पायी घोटाळत असताना कोल्हापूर संस्थानाच्या शाहू महाराजांनी उपभोगशून्य स्वामित्त्व गाजविले. सत्तेचे साधन हाती ठेवून प्रजेचा उत्कर्ष घडविण्यासाठी त्यांनी महत् प्रयास केले. जनतेच्या सर्वांगीण उन्नत्तीचे त्यांनी स्वप्न पाहिले व ते साकार करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची सर्व विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन विद्याथ्यांनी स्वतःच्या जीवनाची उन्नती करावी, यासाठी सारची संस्थेमार्फत प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्याव्यांसाठी "राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय व महानगरपालिकास्तरीय निबंधस्पर्धा २०२४" आयोजित करण्यात येत आहे. ही निबंध स्पर्धा पुढील ४ वर्ष चालू ठेवण्याचा सारथी संस्थेचा मानस आहे.

सारथी सस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्याध्यांसाठी सदर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. इ. ३ री ते ५ वी तसेच इ. ६ वी ते इ. ७ वी व ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी सदरची स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व तालुका व महानगरपालिका स्तरावर घेण्यात येणार आहे.

तालुकास्तरीय निबंधस्पर्धा विषय, नियम व अटी

गट क्र.१:- इयत्ता ३ री ते इयत्ता ५ वी

विषयः- अ) राजयों शाहू महाराजांची एक आठवण.

ब) राजा शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेला एक प्रसंग.

शब्द मर्यादाः १०० शब्द


गट क्र.२:- इयत्ता ६ वी ते इयत्ता ७ वी विषयः- अ) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे क्रीडाविषयक कार्य.

ब) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य.

शब्द मर्यादाः ३०० शब्द


गट क्र.३:- इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी

विषयः- अ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि वसतीगृह चळवळ,

ब) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य.

शब्द मर्यादा:- ५०० शब्द

१. राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४ आयोजनाची दि. १५ जुलै २०२४ ते १७ सप्टेंबर २०२४ हो आहे. या कालावधीत निबंध स्पर्धेचे आयोजन तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी व म.न.पा स्तरावर प्रशासनाधिकारी यांनी करावे.

२. तालुकास्तरीय निबंध स्पर्धा गट क्रमांक १ ते ३ चे आयोजन संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांनी करावे.


४ . छत्रपती शाहू महाराजांचा विचार व कार्य सर्व विद्यार्थ्यांना आत्मसात व्हावे यासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्याथ्यांना निबंधस्पर्धेत सहभागी करून घ्यावे म्हणून निबंधस्पर्धा तालुका स्तरावर तसेच मनपा स्तरावर घेण्यात येत आहेत. प्रत्येक गटात प्रत्येक तालुक्यातील किमान १००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतील असे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी करावे. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी तसेच प्रशासनाधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करावी.

५. राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४ ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व माध्यमाच्या, सर्व मान्यताप्राप्त शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली आहे.

६ . निबंध लेखन स्पर्धाचे माध्यम मराठी असेल.

७ . विद्यार्थ्यांनी स्वतः शिकत असलेल्या इयत्तानिहाय गटातून एकाच विषयावर स्वतः निबंध लिहावानिबंधावर विद्यार्थ्यांने स्वतःचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव व निबंधाचा विषय नमूद करावा. तसेच निबंधाच्या शेवटी शब्द संख्या नमूद करावी.

८. प्रत्येक शाळेतील निबंध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्याथ्यांचे निबंध शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी एकत्रित करावेत व तद्नंतर सदर निबंध शाळेच्या लेटर हेडवर मुख्याध्यापकांच्या शिफारशीने व सही शिक्क्यानिशी सदर निबंध गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी म.न.पा यांना दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सादर करावेत.

९. निबंध स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक प्राप्त करणाऱ्या १ ते ३ गटातील विजेत्या १ ते १० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे बँक खातेवर बक्षिसाची रक्कम सारची, पुणे मार्फत अदा केली जाणार असल्याने संबंधित विद्याव्यांचे स्वतःचे नावे राष्ट्रीयकृत बँकेच्या खाते असलेल्या पहिल्या पानाची सत्यप्रत निबंधासोबत जमा करणे आवश्यक आहे.

१०. सारथी मार्फत तालुकानिहाय व मनपानिहाय यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात येईल. प्रत्येक तालुका व म.न.पा कार्यालयाकडे प्रशस्तीपत्रे पोस्टाद्वारे पाठविण्यात येतील.


गट क्र.१:- ३ री ते ५ वी

रु.४०० रु.३०० रु.२००

उत्तेजनार्थ ७ पारितोषिक

(प्रत्येकी) रु.१००

 गट क्र.२:- ६ वी ते ७ वी 

रु.५००, रु.३००,रु.२००

उत्तेजनार्थ ७ पारितोषिक

(प्रत्येकी) रु. १००

गट क्र.३:- ८ वी ते १० वी

रु.७०० रु.५०० रु.३००

उत्तेजनार्थ ७ पारितोषिक

(प्रत्येको) रु. १००


११. तालुका स्तरावरील निबंध स्पर्धेच्या प्रत्येक गटासाठी गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी यांनी तीन तज्ञ परीक्षक शेजारच्या तालुक्यातील नियुक्त करावेत. त्यांचेकडून निबंध स्पर्धेचे परीक्षण करून १ ते १० क्रमांक घोषित करावेत, निबंध स्पर्धेचे परीक्षण आशय- २५ गुण, अभिव्यक्ती ५ गुण, भाषाशैली ५ गुण, शुद्धलेखन- ५ गुण, वळणदार हस्ताक्षर व प्रभाव १० गुण एकूण ५० गुणांच्या आधारे मूल्यमापन करावे,

१२. निबंध स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या तिन्ही गटातील प्रत्येकी गुणानुक्रमे १ ते १० विद्याथ्यांची यादी सारथी संस्थेस ३० सप्टेबर २०२४ पर्यंत सादर करावी. (त्यामध्ये विद्यार्थ्यांचे नांव, शाळेचे नांव व पत्ता, ई-मेल, स्पर्धेचा विषय, प्राप्त क्रमांक, विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक, बैंक तपशील, नांव, खाते क्रमांक, IFSC Code, बँकेचे नांव, शाखा इ. माहिती सादर करावी.) तसेच व पारितोषिक प्राप्त असणाऱ्या १ ते ३ गटातील विजेत्या १ ते १० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे निबंध सारथी कार्यालयास सादर करावेत.


१३. निबंधस्पर्धेत विजेत्या ठरलेल्या १ ते ३ गटातील विद्याथ्यांची ऑनलाईन माहिती इंग्रजी भाषेतच खाली दिलेल्या लिंकवर अचूक भरावी. लिंकवर माहिती भरणे आवश्यक आहे.

A) गट क्रमांक १ इयत्ता ३ री ते ५ वी च्या विजेत्या स्पर्धकांसाठी https://forms.gle/NrV2RahgG4f2aTfv8ही लिंक आहे.


B) गट क्रमांक २ इयत्ता ६ वी ते ७ वी च्या विजेत्या स्पर्धकांसाठी https://forms.ee/vYJ3vtv1pF6WMA597हो लिक आहे. 


C) गट क्रमांक ३ इयत्ता ८ वी ते १० वी च्या विजेत्या स्पर्धकांसाठी https://forms.ee/CSJv5kz6fRduAP306 ही लिक आहे.

१४. गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी म.न.पा यांनी निबंधस्पर्धा संपन्न होताच स्पर्धेविषयी आपला संक्षिप्त अहवाल निकाल पत्रकासोबत पुढील नमुन्यात सादर करावा. तसेच सदर स्पर्धेविषयी आपला अभिप्राय सुमारे १० ओळीत सही शिक्क्यासह सादर करावा.

१५. गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी यांनी ३० सप्टेबर २०२४ पर्यंत निबंध स्पर्धेचा निकाल व स्पर्धा सहभाग अहवाल सह व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी उपकेंद्र बचत गंगा इमारत कसबा बावडा रोड, रमणमळा, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क शेजारी कोल्हापूर ४१६००३ या पत्त्यावर खास दूताकरवी समक्ष अगर स्पीड पोस्टाने सादर करावा.

१६. प्रत्येक जिल्ह्यात सर्वाधिक निबंध (गट क्र. १ ते ३) मिळून प्राप्त होणाऱ्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी व मनपा प्रशासनाधिकारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सारथी मार्फत गौरविण्यात येईल.

१७. छत्रपती शाहू महाराज निबंधस्पर्धेविषयी उपरोक्त नमूद केलेल्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक मुख्यालय सारथी पुणे यांनी राखून ठेवलेले आहेत.

शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच खाजगी शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना या निबंधस्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गट शिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी मनपा मार्फत परिपत्रकाद्वारे व आढावा बैठकीद्वारे सर्व शाळांना कळविण्यात यावे. प्रत्येक तालुक्यातून व मनपा स्तरावरून प्रत्येक गटातून किमान १००० निबंध इयत्ता (३ री ते ५वी, ६ वी ते ७ वी, ८ वी ते १० वी) प्राप्त होतील याबाबतचे नियोजन गट शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी यांनी करावे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचा सदर निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घ्यावा व राजर्षी शाहू विचारांची चळवळ गतिमान व्हावी यासाठी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सदर स्पर्धेची माहिती द्यावी. राजर्षी शाहू विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या अधिनस्त सर्व गट शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी (न.पा.म.न.पा.) अधिकाऱ्यांना सदर स्पर्धेविषयी कळविण्यात यावे व सदर राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय व म.न.पा स्तरीय निबंधस्पर्धा यशस्वी करावी.


श्री. अशोक काकडे (भा.प्र.से.) व्यवस्थापकीय संचालक

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे


प्रत

मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे.


माहितीसाठी व कार्यवाहीसाठी प्रत

१. संचालक, प्राथमिक, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे.

२. संचालक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे.

३. शिक्षण संचालक, योजना संचालनालय, महाराष्ट्र राज्य, १७ डॉ. आंबडेकर मार्ग, पुणे

४. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

५. प्रशासनाधिकारी, (शिक्षण) महानगरपालिका (सर्व)

(बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, सोलापूर, मीरा-भाईंदर, धुळे, भिवंडी-निजामपूर, अमरावती, नांदेड-वाघाळा, कोल्हापूर, अकोला, उल्हासनगर, सांगली, मिरज, कुपवाड, मालेगाव, जळगांव, लातूर, अहमदनगर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी, जालना.)


संपूर्ण माहिती पत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा

Download







Saturday, August 3, 2024

शासन निर्णय - नोटबुकचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना - शाळा, पालक आणि सरकार यांनी करावयाच्या उपाययोजना.

 शासन निर्णय - नोटबुकचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना - शाळा, पालक आणि सरकार यांनी करावयाच्या उपाययोजना.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वाढीसोबतच निरोगी व निरोगी शारीरिक वाढ महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांचा ताण हलका करून आनंददायी2शिक्षण व्यवस्था निर्माण व्हावी, इ.इ.1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पेपरचे ओझे कमी करण्यासाठी पुढील सूचना देण्यात येत आहेत. राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांना हे नियम लागू राहतील

.

१) विद्यार्थ्यांच्या वहीबाबत पालकांनी घ्यावयाची काळजी :-

1.1) प्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या पिशवीचे वजन मुलाच्या वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी असल्याची खात्री करावी. त्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलाचे वजन जाणून घेतले पाहिजे. पहिल्या वर्गातील मुलांचे सरासरी वजन 20 किलो आणि आठव्या वर्गातील मुलांचे सरासरी वजन 42 किलो आहे. बाकीच्या वर्गातील मुलांचे वजन या दोघांमध्ये असते. अधिक माहितीसाठी परिशिष्ट "अ" पहा.
म्हणजेच पहिलीच्या वर्गातील मुलांच्या वहीचे वजन 2 किलोपेक्षा जास्त नसावे आणि आठवीच्या वर्गातील मुलांच्या वहीचे वजन 4.2 किलोपेक्षा जास्त नसावे.

1.2) शालेय आहार देणाऱ्या प्रत्येक शाळेत वजनाची सुविधा उपलब्ध आहे. या शाळांमध्ये दर तिमाहीत प्रत्येक मुलाचे वजन केले जाते. पिशवीचे वजन करण्यासाठीही तोच वजनाचा काटा वापरावा. विद्यार्थ्याला त्याचे व वहीचे वजन एकदा काढण्यास सांगा. त्या माहितीच्या आधारे नोटबुकचे वजन आवश्यकतेनुसार कमी करावे.

१.३) नोटबुकचे वजन कमी करण्यासाठी खाली काही उपाय सुचवले आहेत.

1.3.1) राज्य सरकारने विहित केलेली पाठ्यपुस्तके आणि प्रत्येक विषयासाठी 100 पानांचे एक पुस्तक ज्यांचे एकूण वजन त्या वयोगटातील मुलांच्या वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. हे शासनाने तपासले आहे.

1.3.2) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाव्यतिरिक्त इतर शैक्षणिक मंडळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी त्या बोर्डावर विहित केलेली पुस्तके आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या किमान पुस्तकांचे वजन करून ते 10% पेक्षा कमी किंवा जास्त असल्याचे तपासावे. मुलांचे वजन. जर सांगितलेले वजन 10% पेक्षा जास्त असेल तर -

१.३.२.१) पुस्तकांची जाडी कमी केल्याने जास्त वजनाचा प्रश्न सुटू शकतो का हे सर्वप्रथम पाहिले पाहिजे. असे झाल्यास, अतिरिक्त वजनाची समस्या येथे सोडविली जाते.

1.3.2.2) जर हे वजन 10 टक्क्यांच्या आत आणत नसेल

मुख्याध्यापकांशी चर्चा करून वेळापत्रकात शाळेसाठी दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.

1.3.2.3) इतर बोर्डांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण शहरी भागात जास्त आहे. तसेच या पालकांची आर्थिक स्थिती तुलनेने चांगली आहे. त्यामुळे संबंधित मंडळाने ठरवून दिलेल्या पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांच्या वहीत आवश्यकतेपेक्षा जास्त वह्या, जाड कव्हर फुलस्कॅप नोटबुक, प्रयोग नोटबुक, अतिरिक्त पाने असलेली नोटबुक, अनावश्यक लेखन साहित्य, रेखाचित्र साहित्य, शब्दकोश, लेखन पेन, पूरक साहित्य. खाजगी प्रकाशने, मार्गदर्शक, अभ्यास पुस्तके, अभ्यास पुस्तके, शिष्यवृत्ती पुस्तके. , जास्त वजनाचा कंपास बॉक्स, फॅशनेबल आणि जड ब्रीफकेस, पिण्याच्या पाण्याची बाटली, खाण्याचा बॉक्स, स्वेटर, सनकोट, डे-केअरला जाणाऱ्या मुलांसाठी साहित्याची पिशवी, क्रीडा साहित्य, सौंदर्यप्रसाधने ब्रीफकेसमध्ये ठेवली जातात. पिशवीचे वजन मुलाच्या वजनाच्या 10 टक्क्यांच्या आत राहण्यासाठी साहित्य कमी केले पाहिजे. अशा पालकांनी घरी वजनाची व्यवस्था करावी.

१.३.२.१) पुस्तकांची जाडी कमी केल्याने जास्त वजनाचा प्रश्न सुटू शकतो का हे सर्वप्रथम पाहिले पाहिजे. असे झाल्यास, अतिरिक्त वजनाची समस्या येथे सोडविली जाते.

1.3.2.2) जर हे वजन 10 टक्क्यांच्या आत आणत नसेल

मुख्याध्यापकांशी चर्चा करून वेळापत्रकात शाळेसाठी दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.
 

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
                         Download

Friday, August 2, 2024

राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही करणेबाबत शिक्षण संचालक आदेश.

 

राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही करणेबाबत शिक्षण संचालक आदेश.

महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 30 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही करणेबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहे. 


शासन पत्र (शालेय शिक्षण विभाग) क. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.२५५-अ/एस.डी.१, दि. १५/१२/२०२२.

संदर्भ :-

लिमिटेड यांचेसोबत करण्यात आलेला करारनामा दि. २१/०७/२०२२.

२. मे. आयटीआय प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडील निर्देश पत्र क्र. २४२६ दि. २२/१२/२०२२.

३. ४. प्राथमिक शिक्षण संचबालनालयाकडील निर्देश पत्र क्र. २४७६ दि. ३०/१२/२०२२.

५. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य यांचे निर्देश दि. २६/०७/२०२४.

राज्यातील १ ली ते १२ मधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी गटसाधन केंद्र (CRC) ०२ प्रमाणे एकूण ८१६ आधार नोदणी संघ (Aadhar Enrollment Kit) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत (MPSP) गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येऊन सदरचे कामकाज सुरु करण्यात आले होते. शासनाने गटस्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या आधार नोंदणी संच (Aadhar Enrolment Kit) द्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण कामकाज करण्यासाठी ८१६ आधार ऑपरेटरची सेवा उपलब्ध करून घेण्यात आलेली असून, आयटीआय लिमिटेड, मुंबई व बेसिल लिमिटेड या दोन संस्थांना आधार संच हाताळणीकरीता मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.


राज्यामध्ये अद्यापही अनेक विद्यार्थी आधार नोंदणीकृत नसल्याचे निदर्शनास येत आहे तसेच सरल प्रणालीमध्ये आधार नांदीमध्ये त्रुटी असल्यामुळे मिसमॅच होत आहेत. राज्यातील प्रत्येक गटस्तरावर प्रत्येकी दोन आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. उक्त आधार नोंदणी संघ (Aadhar Enrollment Kit) यांचा उचित उपयोग करणेकरीता खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

५. शाळानिहाय आधारबाबतची संख्यात्मक माहिती प्राप्त करुन घेणेत यावीत उदा. आधार नोदंणी न झालेली विद्यार्थी संख्या, आधार मध्ये दुरुस्ती करावयाची विद्यार्थी संख्या इत्यादी प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर कामाच्या व्याप्तीनुसार आधार नोदणी व अद्ययावतीकरणाचे केंद्र निश्चित करण्यात यावे,

२. सदर केंद्र निवडतेवेळी पुढील बाबी विचारात घेण्यात याव्यात, भौतीक सुविधा, सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना येण्याकरीता पक्का रस्ता, शाळेच्या परिसरामध्ये इंटरनेटचे नेटवर्क असणे इत्यादी बाबी विचारात घेऊन शाळेची निवड करण्यात यावी

3. तसेब सदर केंद्रावर नजीकच्या कोण कोणत्या शाळेमधील विद्यार्थी आधार नोदणी व अद्ययावतीकरणाच्या कामक येणार आहेत अशा शाज्जा निश्चित करणे आवश्यक आहे.

४. शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजनांचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे, आधार बाबतची कार्यवाही प्रलंबित राहिल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षण विभागाकडील योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याकरीता उक्त मुद्दा क्रमांक १ ते ३ मध्ये नमूद केलेनुसार उचित कार्यवाही करुन त्वरीत आधार विषयक सर्व प्रलंबित आणि दुरुस्तीविषयक कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.

५. सोबत तालुकानिहाय आधार ऑपरेटर यांची यादी व संपर्क क्रमांकाची माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यानुसार सद्यस्थितीमध्ये कार्यरत आधार ऑपरेटर यांना आधार प्रलंबित आणि दुरुस्तीचे काम असणाऱ्या शाळांचे पुढील १५ दिवसांचे अचूक नियोजन करुन देण्यात यावे तसेच याबाबत संबंधित शाळा आणि पालकांना देखील अवगत करणेबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात यावेत.

६. दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पूर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार विषयक नोंदी अद्यावत करुन सर्व विद्यार्थी सरल प्रणालीमध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री मुख्याध्यापकांची करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा प्रमुखांना लेखी निर्देश निर्गमित करण्यात यावेत.

७. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाबाबत संचालनालय स्तरावरुन वेळोवेळी मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले जातील. त्याप्रमाणे कार्यवाही करणे सर्व क्षेत्रीय अधिका-यांवर बंधनकारक आहे.

शिक्षण संचालनालय माध्यमिक मधून दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार मिस मॅच अवैध व आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.


संदर्भिय शिक्षण आयुक्तालयाचे पत्रान्वये मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित आढावा बैठक दि.१५.०९.२०२३ मध्ये विषयांकित प्रकरणी झालेल्या चर्चेमधील सूचनानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यातील टॉप १० शाळांची निश्चिती करावी. सदर शाळांना दोन वेळा भेटी देवून पडताळणी करुन शाळेत उपस्थित नसलेले व आधार नसलेले विद्यार्थी वगळणेबाबतची कार्यवाही आपल्यास्तरावरून करावी. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दि.१४.१०.२०२३ अखेर शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या पडताळणीसह सादर करावा. सदर कार्यवाही करतांना विद्यार्थी शाळाबाहय होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.


(दिपक चवणे)

शिक्षण उपसंचालक,

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

Thursday, August 1, 2024

YCMOU Admission 2024-25 Update - सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ वेळापत्रक ऑनलाइन अर्ज लिंक सूचना

 

YCMOU Admission 2024-25 Update - सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ वेळापत्रक ऑनलाइन अर्ज लिंक सूचना



दिनांक : 31 जुलै 2024


सूचनापत्रक क्र. 2/2024-25


१) विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बी.एड.. बी.एड. (विशेष), शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये खालील तक्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मुदतवाढ करण्यात येत आहे.


ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत


दिनांक 01.08.2024 ते दिनांक 15.08.2024 पर्यंत (संध्याकाळी 11.59 वाजेपर्यंत)


२) विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत.

३) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांने वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल.

४) विद्याथ्यर्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.


उपकुलसचिव नोंदणी कक्ष



Yashwantrao Chavan Maharashtra Open University,

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दिनांक : 31 मे 2024 च्या सूचनापत्रक क्र. 1/2024-25 नुसार.. 

१) विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बी.एड., बी.एड. (विशेष), शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील तक्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होत आहे.


ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत


दिनांक 01.06.2024 ते दिनांक 31.07.2024 पर्यंत (संध्याकाळी 11.59 वाजेपर्यंत)

https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1303