Hello friends Welcome on my new blog Iam Gajanan Punde Teacher z.p.m.u.p.school Kajegaon , Jalgaon Jamod , iam a tech Teacher And successful Youtubers
Sunday, September 22, 2024
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता बाबत
Friday, September 13, 2024
सन २०२४-२५ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान वितरीत!
सन २०२४-२५ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान वितरीत!
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२४-२५ च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकास भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ (PAB) च्या दि. ०५/०३/२०२४ रोजीच्या बैठकीत संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजूरी मिळाली आहे. सन २०२४-२५ मध्ये सर्वात वरची इयत्ता ८वी पर्यंतचे वर्ग असलेल्या एकूण ६३०१० शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी एकूण रु.१६३०७.२५ लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे. तसेच सर्वांत वरची इयत्ता १०वी किंवा १२वीचा वर्ग असलेल्या एकूण १७७१ शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांसाठी एकूण रु. १०३१.४० लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे.
उपरोक्त नमूद PM SHRI (३११) शाळा वगळून मंजूर निधीपैकी उपलब्ध तरतूदीतून तुर्तास प्राथमिक शाळांसाठी ५०% निधी म्हणजे रु. ८०७४.७५ लक्ष व माध्यमिक शाळांकरीता ५०% निधी म्हणजे रु.४९१.२० लक्ष इतका निधी संबंधित जिल्हा परिषद महानगरपालिका यांना उपलब्ध करन देण्याचे प्रस्तावित आहे.
उपरोक्त निधी हा केवळ समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असणाऱ्या शाळांकरीता (PM SHRI शाळा वगळून) वितरीत करण्यात यावा. जिल्हा परिषद महानगरपालिका निहाय भौतिक व आर्थिक तरतूदीबाबतचा तक्ता (अ) व (ब) सोबत जोडण्यात आलेला आहे. जिल्ह्यांना / महानगरपालिकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी हा ज्या शाळाचा खर्च होईल अशाच शाळांना प्राधान्याने निधी वितरीत करण्यात यावा. तथापि, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या एकूण मंजूर तरतूदीच्या मर्यादित आणि शाळांना मंजूर असलेल्या तरतूदीच्या मर्यादित खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी. समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व जिल्हा व महानगरपालिका यांनी सदरचा निधी प्राप्त होताच तात्काळ खर्च करुन प्रबंध पोर्टलवर माहिती अद्यावत करण्यात यावी.
सोबत :- मार्गदर्शक सूचना आणि तक्ता अ व ब
राज्य प्रकल्प संचालक
म.प्रा.शि.प
परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
Saturday, September 7, 2024
राज्यातील सर्व शाळांसाठी व शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट । निबंध स्पर्धा
राज्यातील सर्व शाळांसाठी व शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट । निबंध स्पर्धा
निबंध स्पर्धेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे-*
१) ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरांवरील शिक्षकांसाठी आहे.
२) आपले निबंध मराठी किंवा इंग्रजी या भाषेत असावेत.
३) शब्दमर्यादा कमीत कमी आठशे आणि जास्तीत जास्त बाराशे इतकी आहे.
४) हस्ताक्षरात किंवा टाईप केलेले निबंध पीडीएफ स्वरूपात खालील मेल आयडीवर पाठवावेत.
*education@chavancentre.org*
*महत्त्वाचे:-*
i) ईमेलचा विषय (Subject) या रकान्यात *शिक्षकांसाठी भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२४* लिहावे.
ii) ईमेलच्या मजकुरात( compose email) खालील बाबींचा समावेश असावा.
स्वतःचे नाव
शाळेचे नाव
संपर्कासाठी पत्ता आणि फोन नंबर
निबंधाचे शीर्षक
निबंधाची शब्दसंख्या
५) निबंधाच्या पीडीएफ मध्ये कुठेही स्वतःचे नाव लिहू नये अथवा आपली ओळख उघड होईल असा कुठलाही मजकूर त्यात असू नये.
६) निबंध स्पर्धेचा निकाल ११ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या दिवशी घोषित करण्यात येईल.
७) गुणानुक्रमे दोन्ही विषयांच्या प्रत्येकी पहिल्या पाच अशा एकूण दहा निबंधांना पारितोषिक, गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येईल.
८) नियुक्त केलेल्या परीक्षक समितीचा निर्णय स्पर्धकांना बंधनकारक राहील.
अधिक माहितीसाठी-
संजना पवार- 8291416216
*डाॅ. वसंत काळपांडे,*
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण सेंटर.
Friday, September 6, 2024
पुन्हा एक नवीन उपक्रम! राज्यातील सर्व शाळांमध्ये दि.०१ सप्टेंबर, २०२४ ते दि. १५, सप्टेंबर, २०२४ या कालावधीत "स्वच्छता पंधरवडा" उपक्रम!
पुन्हा एक नवीन उपक्रम! राज्यातील सर्व शाळांमध्ये दि.०१ सप्टेंबर, २०२४ ते दि. १५, सप्टेंबर, २०२४ या कालावधीत "स्वच्छता पंधरवडा" उपक्रम!
केंद्रीय शिक्षा मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये दि.०१ सप्टेंबर, २०२४ ते दि. १५, सप्टेंबर, २०२४ या कालावधीत "स्वच्छता पंधरवडा" उपक्रम राबविणे बाबत शिक्षण आयुक्तालयाने दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, माननीय शिक्षण संचालक प्राथमिक व माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
सर्व शाळांमध्ये दि.०१ सप्टेंबर, २०२४ ते दि.१५, सप्टेंबर, २०२४ या कालावधीत "स्वच्छता पंधरवडा" उपक्रम राबविण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये सदर उपक्रमाचे दिनदर्शिका व कृती आराखडा देण्यात आला आहे. या पंधरवड्या दरम्यान करण्यात आलेल्या उपक्रमांची छायाचित्रे आणि व्हिडीओज सदर पत्रात देण्यात आलेल्या Google लिंकवर पाठविण्यात याव्यात.
संदर्भीय पत्रामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचना आपल्यास्तरावरुन राज्यातील सर्व शाळांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. आपण केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास व या कार्यालयास अवगत करावे, ही विनंती.
(डॉ. श्रीराम पानझाडे)
शिक्षण उपसंचालक (प्रशासन)
आयुक्त (शिक्षण) कार्यालय, म.रा., पुणे
प्रत माहिती व पुढील कार्यवाहीस्तव
१. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), सर्व जिल्हा परिषदा
२. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, उत्तर, दक्षिण), बृहन्मुंबई महानगरपालिका
३. शिक्षणाधिकारी/प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिका/नगरपालिका सर्व
प्रत माहितीस्तव
मा.आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे स्वीय सहाय्यक
राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि स्वायत्त संस्थांसाठी स्वच्छता पखवाडा गुगल ट्रॅकर आणि ड्राइव्ह 2024 मध्ये प्रवेश करण्यासाठी पायऱ्या
1. वापरकर्त्याकडे Gmail खाते असणे आवश्यक आहे.
2. प्रत्येक राज्य / केंद्रशासित प्रदेशात दोन यूजर आयडी (Gmail id) ला प्रवेश दिला जाईल ज्यातून डेटा स्वच्छता पखवाडा ट्रॅकरवर अपलोड केला जाईल.
3. Google ट्रॅकर आणि ड्राईव्हमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी '
4. उच्च रिझोल्यूशन छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर प्रसिद्धी सामग्रीसह दिवसाच्या विशिष्ट क्रियाकलापांसाठी डेटा दररोज रात्री 8.00 पर्यंत अद्यतनित करणे आवश्यक आहे.
5. ट्रॅकरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळाल्यानंतर:
(a) वापरकर्ता फक्त त्यांच्या नोंदणीकृत Gmail खात्यात लॉग इन करू शकतो,
(b) ट्रॅकरची उपलब्ध लिंक कॉपी करा आणि ब्राउझरमध्ये पेस्ट करा (गुगल क्रोम),
(c) स्वच्छता ट्रॅकर उघडेल,
स्वच्छता पखवाडा गुगल ट्रॅकर लिंक:-
https://docs.google.com/spreadsheets/d/1ksRS_BGjujF_2gEjiZZcJLLKG_nabdhfAsKtfXA_kz8/edit?gid=0#gid=0
स्वच्छता पखवाडा गुगल ड्राइव्ह लिंक:-
https://drive.google.com/drive/u/1/folders/1XXY_Xokver_nhrBWci_XgCWwd2VoCdh6
सर्व परिपत्रके पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
PM-Poshan - शालेय पोषण आहार मेनू कार्ड सन २०२४-२५ धान्यादी मालाचे प्रमाण इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी
PM-Poshan - शालेय पोषण आहार मेनू कार्ड सन २०२४-२५ धान्यादी मालाचे प्रमाण इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहार साठी वर्ष 2024 25 पाककृती व मेनू कार्ड पुढील प्रमाणे.
शालेय पोषण आहार (मेनू कार्ड) सन २०२३ २०२४
१
सोमवार
उसळ / भाजी-आमटी (वाटणा)
२
मंगळवार
आमटी भात/ डाळतांदळाची खिचडी (मुगडाळ)
3
बुधवार
वरणभात/ सांबरभात / आमटी भात (तुरडाळ)
४
गुरुवार
कडधान्याची उसळ/भाजी आमटी/ (मटकी)
५
शुक्रवार
उसळ / भाजी आमटी (वाटणा)
६
शनिवार
आमटी भात/ डाळतांदळाची खिचडी (मुगडाळ)
वरील वरील वारानुसार असलेल्या मेनू हा जिल्हा नुसार बदलू शकतो परंतु त्याखाली असलेले धान्यादी मालाचे प्रमाण मात्र सर्व जिल्ह्यांसाठी सारखे आहेत.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२" अभियान - शाळा मूल्यांकन सुधारित व अंतिम वेळापत्रक दि ०६/०९/२०२४
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२" अभियान - शाळा मूल्यांकन सुधारित व अंतिम वेळापत्रक दि ०६/०९/२०२४
शिक्षण आयुक्तांनी दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन राबविणे बाबत शाळा मूल्यांकनाचे सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे निश्चित केले आहे.
शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ मध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. या कार्यालयाच्या संदर्भ क्र.२ व ३ वरील पत्रान्वये या बाबतच्या सविस्तर सूचना व शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरील मूल्यांकन यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे.
२/- सदर अभियानांतर्गत सदयस्थिती शाळास्तरावरुन माहिती भरण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले होते. तथापि, या बाबत अनेकवेळा सूचना देऊनही अदयापही शाळांकडून माहिती भरुन तो अंतिम केलेली नाही. त्याअनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
अ) सदर अभियानात भाग घेणाऱ्या ज्या शाळांनी आपली माहिती अपूर्ण भरलेली असेल, त्या सर्व शाळांची माहिती राज्यस्तरावरून दि.
ब) या अभियानात शाळांचा मागील वर्षी (सन २०२३-२४ मध्ये) प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा निम्न क्रमांकासाठी या वर्षीच्या अभियानात विचार केला जाणार नाही. या वर्षीच्या मूल्यांकनात मागील वर्षातील स्तरापेक्षा (क्रमांक) वरच्या स्तरावरील क्रमांक मिळविण्यास या वर्षीच्या निकषाप्रमाणे शाळा पात्र होत असल्यास त्या क्रमांकास शाळा पात्र असतील.
३/- मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे सुधारित वेळापत्रक (अंतिम) :
अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा दिनांक ०६/०९/२०२४
ब) प्रत्येक स्तरावरील मूल्यांकनांचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे राहील.
मूल्यांकनाचा अंतिम दिनांक
केंद्रस्तर
सोमवार, दि.
तालुकास्तर
दि.
मनपा/जिल्हास्तर
सोमवार, दि. १६/०९/२०२४, सायं.०५.०० वा. पर्यंत
विभागस्तर
गुरुवार, दि. १९/०९/२०२४, सायं.०५.०० वा. पर्यंत
राज्यस्तर
सोमवार, दि. २३/०९/२०२४, सायं.०५.०० वा. पर्वत
४/- वरील सुधारित वेळापत्रक हे अंतिम असून यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तरी, उक्त सूचना व सुधारित वळापत्रकानुसार सर्व शाळांची वेळेत माहिती भरली जाईल व प्रत्येक स्तरावर शाळांचे योग्य पध्दतीने मूल्यांकन पादृष्टीने कार्यवाहो करण्याची दक्षता घ्यावी. जाईल
अस्पचन (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिकThursday, September 5, 2024
जिल्हा परिषद शाळांचे नाव बदलणार
जिल्हा परिषद शाळांचे नाव बदलणार
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
तारीख: ०४ सप्टें २०२४
Ja.No.Mpraship/Sashi/U-Dice/Computer/2024-25/2638
प्रति,
1) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
2) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
विषय: U-DICE Plus ऑनलाइन प्रणालीमध्ये PM SHRI योजनेंतर्गत मंजूर शाळेच्या नावापुढे "PM SHRI" हा उपसर्ग लावण्याबाबत.
संदर्भ: केंद्र सरकार पत्र क्र. D.O.No. 1-14/2022-9-19 दि. 30 ऑगस्ट 2024.
केंद्र सरकारने सन 2023-24 पासून पंतप्रधान श्री योजना लागू केली आहे. योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यात एकूण ८२७ आणि दुसऱ्या टप्प्यात ३११ शाळांची निवड करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीने PM SHRI योजना लागू करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त दिनांक 30/08/2024 च्या पत्रानुसार PM SHRI योजनेंतर्गत मान्यता दिलेल्या शाळेच्या नावापुढे PM SHRI हे नाव जोडावे आणि त्यानुसार U-DICE Plus प्रणालीमध्ये शाळेचे नाव बदलावे.
U-DICE Plus प्रणालीमध्ये PM SHRI जोडलेल्या शाळेचे नाव, प्रमाणपत्र आणि
मार्कशीटवर ठळक अक्षरात दिसण्यासाठी सूचित केले आहे. पण याविषयी
U-DICE Plus प्रणालीमध्ये शाळेचे नाव संबंधित स्तरावरून अपडेट करा
आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करावी
X:\computer doc U-DISE 2024-25\Letter_4 Dt. 04.09.2024.docx
जवाहर बाल भवन, पाहिलेला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प), मुंबई ४०० ००४.
दूरध्वनी क्रमांक: ०२२-२३६३ ६३१४, २३६७९२६७, २३६७ १८०८, २३६७ १८०९, २३६७ ९२७४
परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
12 वी चा निकाल . HSC result-2025 दि. ५ मे २०२५ , दुपारी १:०० महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)पुणे, यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या HSC 2025 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या.
12 वी चा निकाल . HSC result-2025 दि. ५ मे २०२५ , दुपारी १:०० महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (...
-
वार्षिक नियोजन 2024 25 वर्ग पहिली ते दहावी सर्व शैक्षणिक पीडीएफ डाउनलोड एकाच ठिकाणी वर्ग एक ते आठ वेळापत्रक पीडीएफ डाउनलोड. ...
-
PAT परीक्षा answer key । शिक्षक मार्गदर्शिका खालील लिंक वर क्लिक करा आणि डाऊनलोड करा . https://drive.google.com/drive/folders/1ba7Y4piSpG-...
-
मंथन परीक्षेचा निकाल जाहीर मंथन वेलफेयर फौंडेशन कडून निकालाबाबत सूचना : 1) Manthan General Knowledge Examination 2025 निकाल Uploading जिल...