google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education

Friday, October 18, 2024

YCMOU B. Ed Admission Process Update - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी एड शिक्षणक्रम साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू

 

YCMOU B. Ed Admission Process Update - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी एड शिक्षणक्रम साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू

प्रवेश सूचना : शैक्षणिक वर्ष २०२४-२६


प्रवेश-पात्रतेच्या अटी

(१) डी.एड./डी.टी.एड./डी.एल.एड. डिप्लोमा पूर्ण केलेले आणि महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक.

(२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान ५०% गुण व राखीव प्रवर्गासाठी ४५% गुण

प्रवेश-अर्ज व माहितीपुस्तिका ऑनलाईन विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- व राखीव प्रवर्गासाठी रु. ५००/- ऑनलाईन भरून अर्ज ऑनलाईन सादर करावा.

अंतिम दिनांकः १८ ते २२ ऑक्टोबर २०२४ (रात्री ११.५९ मि.) अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी.


• http://ycmou.digitaluniversity.ac






Thursday, October 17, 2024

विषय :- पूर्व-उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (सं. 5 वी) आणि पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (सं. 8) फेब्रुवारी - 2025 साठी अधिसूचना प्रसिद्ध करण्याबाबत..

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालयाची इमारत


(दुसरा व चौथा मजला) सर्व्हे क्र. 832 ए, शिवाजीनगर, पुणे 411 004.


दूरध्वनी क्र. ०२०-२९७०९६१७


वेबसाइट: www.mscepune.in


ईमेल: mscescholarship@gmail.com


महत्वाचे


जा.ना. मारापाप/शिष्यवृत्ती/2024/4511 दिनांक :- 17/10/2024


प्रति,


मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.


विषय :- पूर्व-उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (सं. 5 वी) आणि पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (सं. 8) फेब्रुवारी - 2025 साठी अधिसूचना प्रसिद्ध करण्याबाबत...


सर,


वरील विषयानुसार, आपणास याद्वारे कळविण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (सं. 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (सं. 8 वी) दि. 09 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचना या पत्रासोबत जोडलेली आहे. सदर अधिसूचनेची राज्यातील प्रमुख वृत्तपत्रे, हवाई आणि कॉल सेंटरमध्ये मोफत प्रसिद्धी द्यावी ही विनंती. सोबत :- सूचना


तुझा विश्वासू,


(अनुराधा ओक) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 04.


कॉपी माहिती आणि आवश्यक कारवाईसाठी


जिल्हा माहिती अधिकारी, पुणे.


१.


2. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका. . शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.


3 4. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (पश्चिम दक्षिण/उत्तर).


5. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व.


6. प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिका, सर्व.


माहिती कॉपी करा :-


1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई - 32.


2. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे- ०१. . मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे - ०१. ३


4. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे- 01.


5. मा. शिक्षण संचालक (नियोजन), महाराष्ट्र राज्य, पुणे - 01.


6. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग), महाराष्ट्र राज्य.

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

                       Download

Sunday, October 6, 2024

सन २०२४-२५ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान वितरीत!

 

सन २०२४-२५ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान वितरीत!

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२४-२५ च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकास भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ (PAB) च्या दि. ०५/०३/२०२४ रोजीच्या बैठकीत संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजूरी मिळाली आहे. सन २०२४-२५ मध्ये सर्वात वरची इयत्ता ८वी पर्यंतचे वर्ग असलेल्या एकूण ६३०१० शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी एकूण रु.१६३०७.२५ लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे. तसेच सर्वांत वरची इयत्ता १०वी किंवा १२वीचा वर्ग असलेल्या एकूण १७७१ शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांसाठी एकूण रु. १०३१.४० लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे.


उपरोक्त नमूद PM SHRI (३११) शाळा वगळून मंजूर निधीपैकी उपलब्ध तरतूदीतून तुर्तास प्राथमिक शाळांसाठी ५०% निधी म्हणजे रु. ८०७४.७५ लक्ष व माध्यमिक शाळांकरीता ५०% निधी म्हणजे रु.४९१.२० लक्ष इतका निधी संबंधित जिल्हा परिषद महानगरपालिका यांना उपलब्ध करन देण्याचे प्रस्तावित आहे.

अ) सर्वात वरची इयत्ता ८वी पर्यंत वर्ग असलेल्या प्राथमिक शाळांसाठी मंजूर निधी व ५०% वितरीत करावयाच्या निधीचा तक्ता खालीलप्रमाणे

उपरोक्त निधी हा केवळ समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असणाऱ्या शाळांकरीता (PM SHRI शाळा वगळून) वितरीत करण्यात यावा. जिल्हा परिषद महानगरपालिका निहाय भौतिक व आर्थिक तरतूदीबाबतचा तक्ता (अ) व (ब) सोबत जोडण्यात आलेला आहे. जिल्ह्यांना / महानगरपालिकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी हा ज्या शाळाचा खर्च होईल अशाच शाळांना प्राधान्याने निधी वितरीत करण्यात यावा. तथापि, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या एकूण मंजूर तरतूदीच्या मर्यादित आणि शाळांना मंजूर असलेल्या तरतूदीच्या मर्यादित खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी. समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व जिल्हा व महानगरपालिका यांनी सदरचा निधी प्राप्त होताच तात्काळ खर्च करुन प्रबंध पोर्टलवर माहिती अद्यावत करण्यात यावी.

सोबत :- मार्गदर्शक सूचना आणि तक्ता अ व ब 

परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



 

Saturday, October 5, 2024

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत...

 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत...

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत...

                  राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्याधर्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.

१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका)

२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)

४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

प्रस्तुत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पहिल्या टप्प्यात उपरोक्त गट क्र. १ ते ३ साठी जिल्हा स्तरावर व गट क्र. ४ व ५ साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (विभाग) स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी whats app, वर्तमानपत्र यासारख्या प्रसार माध्यमांच्याद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी. यासाठी प्राचार्य, डाएट व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद यांनी एकमेकांशी समन्वय साधावा. आपल्या स्तरावरून स्पर्धेबाबत आणि सोबत दिलेले माहितीपत्रक अवलोकन करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी अधिनस्त कार्यालयातील सर्व गटातील स्पर्धकांना याबाबत अवगत करावे.

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

           Download


वरिष्ठ व निवडश्रेणी ऑफलाईन पध्दतीने जिल्हा शिक्षण संस्थांमध्ये आयोजित करणे.

 महाराष्ट्र शालेय शिक्षण व विभाग राज्य शैक्षणिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०, ईमेल-preservicedopt@maa.ac.in


क्र. राशेसंप्रम/सेवा पूर्व शिक्षण/एस.बी.टी.ई/२०२४/२७०५


दिनांक ०३/०६/२०२४.


प्रति, सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था


विषय :- वरिष्ठ व निवडश्रेणी ऑफलाईन पध्दतीने जिल्हा शिक्षण संस्थांमध्ये आयोजित करणे.


संदर्भ:


१) शासन निर्णय. शिप्रथो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण दि.२३/१०/२०१७.


२) शासन निर्णय. शिप्रो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण दि.२०/०७/२०२१.


३) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) रिपोर्ट दि.२१/०२/२०२४ चे निवेदन


४) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाय) जळगाव गाव पत्र क्र. जिशिप्रसं/जळगाव/ व.नि.श्रेणी प्र./२०२३-२४/६६, दि.२३/०२/२०२४.


५) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाय) धुळे पत्र क्र. जिशिवप्रसंधु/बवेनिश्रेप/२०८, दि.२३/०२/२०२४.


६) विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती अहवाल क्र.जा.क्र. जिशिपसं/अम/ ववेश्रेवनिश्रे प्रशिक्षण/१५३/२४, दि.०१/०३/२०२४.


उपरोक्त विषयानुसार संदर्भ क्र.१ अन्वये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण सोपस्कार प्रशासनाची राज्य शासनाची लोकशाही पंचनामा आली आहे. संदर्भ क्र.२ नुसार १० दिवसांचे किंवा ५० घडामोडी तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. कोल्हारविका १९ प्रादुर्भाव पार्श्व सर्वोच्च मूळ प्रशिक्षण हे सत्यात दिसून आले होते. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने बाह्य संदर्भ पत्र क्र.३.अण्वये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) उपलब्ध तसेच संदर्भ पत्र क्र. ४ ते ६ अन्वये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने स्वतंत्र क्षेत्रीय कार्यालयासाठी विनंती करण्यात आली आहे.


प्रत्यक्ष वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाते, प्रशिक्षणार्थी तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणार्थी परस्परांमधील संभाषणात्मक अनुभूती व विचारांची देवाण-घेवा सहजगत्या व्हावी तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग उद्देश संवत अनुभवी शिक्षक आंधक सक्षम व्हावा याने वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण सन २०२४-२५ पासून ऑफलाइन. पध्दतीने जिल्हा स्तरावर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) सुरुवातीचे नियोजित आहे. यार्य्य, जिल्हा जिल्हा संस्था यांनी ५ विशेषज्ञ अभ्यासक/तज्ञ निर्देशक सर्व प्रकरणाचा तपास अहवाल दि.५ जून २०२४ पर्यंत preservicedept@maa मध्ये या ई-मेल आयवर सादर करा. जिल्हा जिल्हा व प्रशिक्षणार्थी वरिष्ठ आंधव्याख्याता/अव्याख्याता इतर ३ तसेच आपल्या जिल्ह्य़ातील इतर २ शिक्षकांचे नाव सुचविले.


(डॉ. माधुरी सावरकर)


उपसंचालक (सेवा पूर्व शिक्षण) राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

                              Download

NMMS Examination Dec 2024 Update - एन एम एम एस परीक्षा डिसेंबर 2024 ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात अधिकृत सूचना व लिंक

 

NMMS Examination Dec 2024 Update - एन एम एम एस परीक्षा डिसेंबर 2024 ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात अधिकृत सूचना व लिंक

राष्ट्रीय आर्थिहोतील घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ. ८ वी साठी परीक्षा दि. २२ डिसेंबर, २०२४ होणार असल्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रसिध्दी निवेदन राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ. ८ वी साठी

सन २००७- ०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.

१. अर्ज करण्याची पध्दत दिनांक ०५/१०/२०२४ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.inव https://mscenmms.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.

२. पात्रता :-

a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठ्यांचा सन २०२३-२४ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.

विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.) व

d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.

• विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.

• केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

• शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.

• सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

३. विद्यार्थ्यांची निवड : विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

४. परीक्षेचे वेळापत्रक :- महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. दर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

५. परीक्षेसाठी विषय सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT): ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

b) शालेय क्षमता चाचणी (SAT) ही सामान्यतः इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण-३५) ३. गणित (एकूण गुण २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.

> उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

a. सामान्य विज्ञान ३५ गुण भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.

संपूर्ण माहिती पत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download




Friday, September 27, 2024

शुद्धिपत्रक Sankalit Mulyamapan Chachani 1 (2024-25) Timetable - संकलित मूल्यमापन चाचणी 1 2024-25 साठी वेळापत्रक व सुधारित सूचना!

 

शुद्धिपत्रक Sankalit Mulyamapan Chachani 1 (2024-25) Timetable - संकलित मूल्यमापन चाचणी 1 2024-25 साठी वेळापत्रक व सुधारित सूचना!

शुद्धिपत्रक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 26 सप्टेंबर 2019 रोजी नियतकालिक मूल्यमापन चाचणी अंतर्गत संकलित चाचणी क्रमांक एक बाबत पुढील प्रमाणे सुधारित सूचना दिल्या आहेत.

या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी-१ (PAT-२) दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी, यात कोणताही बदल करण्यात येवू नये. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/स्वाध्याय ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.

इयत्ता ३ री ते ९ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) यगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी, तोंडी, स्वाध्याय य प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळास्तरावरून नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे. कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-१ घेण्याची आवश्यकता नाही.


(रमाकांत काठमोरे)

सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषद, महाराष्ट्र, पुणे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र च्या संचालकांनी दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT-२) 2024-25 अंतर्गत संकलित चाचणी-१ आयोजनाबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.

संदर्भ: १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.

२. राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्र पुरस्कृत प्रकल्प राज्य अनुदान वितरण वित्तीय नियमावली मार्गदर्शक तत्वे.

३. STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, दि. ३१ मार्च २०२४

४. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पा.चा. जिल्हा पत्र/२०२४-२५/०२९२६ दि.१९/०६/२०२४ उपरोक्त विषयान्चये या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अतर्गत संकलित चाचणी-१ (PAT-२) दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा

दि. २४/०९/२०२४

(इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.


* संकलित मूल्यमापन चाचणी उद्देश :-

१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे.

२) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे. ३) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत करणे,

जेणेकरून अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल,

४) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे 

५) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत मिळणे,

संकलित चाचण्यांचे माध्यम व विषयः सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात (मराठी, उर्दू, इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलगु, सिंधी, बंगाली) होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.


* चाचणीचा अभ्यासक्रम :

१. इयत्ता ३ री ते ८ वी एकात्मिक पाठ्यपुस्तकातील भाग १ व भाग २ (प्रथम सत्रांत अभ्यासक्रम) यावर आधारित असेल.

२. इयत्ता ९ वी -

प्रचलित पद्धतीनुसार भाषा, गणित व इंग्रजी करिता खालील अभ्यासक्रम असेल. 

भाषा (सर्व माध्यम) - प्रथम सत्रांत अभ्यासक्रम यावर आधारित असेल.

गणित (सर्व माध्यम) भाग-१ (१ ते ३ घटक) भाग-२ (१ ते ४ घटक)

इंग्रजी (प्रथम व तृतीय भाषा) प्रथम सत्रांत अभ्यासक्रम यावर आधारित असेल.

इयत्ता ९ वी साठी अध्ययन निष्पत्ती ऐवजी क्षमता विधाने असून संबंधित सर्व माध्यमाच्या

यावी, यात कोणताही बदल करण्यात येवू नये. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम) गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/स्वाध्याय ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.

इयत्ता ३ री ते ९ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी, तोंडी, स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळास्तरावरून नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे. कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-१ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

संकलित मूल्यमापन चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना:

१. संकलित मूल्यमापन चाचणी-१ ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.

२. संकलित मूल्यमापन चाचणी १ करिता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत.

३. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी. ४. संकलित मूल्यमापन चाचणी-१ ध्या चाचणी पत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येत आहेत. 

५. तालुकास्तरावर पोहचविण्यात येणाऱ्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त चाचणी पत्रिका ठेवाव्यात. तसेच चाचणी पत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने मिजणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. 

६. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर थेट शाळास्तरावर पोहचवाव्यात. 

७. चाचणी पत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.

अ. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व तालुका समन्वयकांनी यानी इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून आवश्यक पुरवठा झाला असल्याची खातरजमा करूनच विषय, माध्यम व इयत्तानिहाय गड्ढे मोजूनच गड्ढे / प्रती कमी किंवा जास्त असतील तर तसे पोहोच पावतीवर स्पष्टपणे नमूद करून पोहोच द्यावी.

आ. तालुका समन्वयकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढधा मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत, तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही चाचणी पत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

इ. शाळा स्तरावरील चाचणी पत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता

८. चाचणी पत्रिकाचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. प्रश्नपत्रिकांची गोपनियता काटेकोरपणे पाळण्यात यावी. गोपनीयता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

९. तालुका स्तरावर चाचणी पत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.

१०. जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) यांची संकलित चाचणी-१ आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल,

११. शिक्षणाधिकारी यांचेकडून प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे संभाव्य दि. १ ऑक्टोबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यात चाचणी पत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा XEROX काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य. शिक्षण निरीक्षक /प्रशासन अधिकारी (मनपा/नपा) यांची असेल याची नोंद घ्यावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षणाधिकारी/प्राचार्य DIET यांची वैयक्तिकरित्या राहील.

१२. संकलित चाचणी-१ कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.

१३. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.

१४. प्रस्तुत संकलित चाचणी-१ बाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचना www.maa.ac.in या वेबसाईटवर परीक्षेपूर्वी उपलब्ध असेल. उत्तरसूची परीक्षेदिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात. १५. शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे, ती विद्यार्थ्यांना देऊ नये. विद्यार्थ्यांना फक्त चाचणी पत्रिका देण्यात याव्यात. १६. संकलित चाचणी-१ ची गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात भरावी.

१७. संकलित चाचणी १ मधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.

चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत -

१) जिल्ह्यातील सर्व अधिका-यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे. २) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबंधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे, चाचणी-१ कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित

३) संकलित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिकाव पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.

४) तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची Randomly तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे.

उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. तथापि, अपवादात्मक किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल करायचे असल्यास संबधित शिक्षणाधिकारी यांनी या कार्यालयाची परवानगी घेवूनच वेळापत्रकात बदल करावा.

वरीलप्रमाणे आपल्या अधिनस्त संबंधित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचेपर्यंत संकलित चाचणी -१ च्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात.

संकलित चाचणी -१ चे गुण हे विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदवण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर विहित कालावधीत भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.


संचालक

राज्य क्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक

                                Download