google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education

Friday, December 20, 2024

जनगणना २०२१ | Census 2021 update

जनगणना २०२१ | Census 2021 update

जनगणना २०२१ महोदय/ महोदया,सर्व जिल्हे / तहसिल/शहरे/गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक ०१ जानेवारी, २०२५ पासून गोठविण्याबाबत.

संदर्भ : क्रमांक: जनग १२२०/८६/प्र.क्र.१८/५, दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२४.

उपरोक्त विषयायावत संदर्भाधिन दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२५ ची अधिसूचना आवश्यक कार्यवाहीस्तव

सोबत जोडली आहे. सदर अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर

अधिसूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व संबंधित कार्यालयांच्या निदर्शनास आणण्यात यावी, ही विनंती.

                      “शुध्दिपत्रक”

जनगणनेकरिता प्रशासकीय सीमा गोठविण्याची सामान्य प्रशासन विभागाची दि. २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेमध्ये महारजिस्ट्रार कार्यालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. ९-७-२०१९- CD (Cen), दिनांक ८ ऑक्टोबर, २०२४ नुसार खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

“सर्व जिल्हे/तहसील/शहरे / गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक ०१ जुलै, २०२४ ऐवजी

दिनांक ०१ जानेवारी, २०२५ पासून गोठविण्यात येतील."

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

उर्मिला सावंत,

शासनाचे अवर सचिव.

शासनाचे अधिकृत परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड बटन वर क्लिक करा. 

                 Download

Monday, December 16, 2024

celebration of Minority Day...|अल्पसंख्यांक दिवस साजरा करणे बाबत...

 अल्पसंख्यांक दिवस साजरा करणे बाबत...

प्रस्तावना-

संयुक्त राष्ट्र संघटनेने दि. १८ डिसेंबर, १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तृत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतचे वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिल्या आहेत. दि. १८ डिसेंबर हा दिवस “अल्पसंख्याक हक्क दिवस" म्हणून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत राबविण्यात येतो.

शासन परिपत्रक -

दिनांक १८ डिसेंबर हा दिवस राज्यपातळीवर प्रतिवर्षी “अल्पसंख्याक हक्क दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा. 

यादृष्टीने या दिनांकास खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत:-

अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव/माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.सर्व जिल्हयात शाळा व महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्याकरिता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. 

यामध्ये खालील बाबींचा समावेश असावा :-

अ) भित्तीपत्र स्पर्धा

ब) वक्तृत्व स्पर्धा

क) निबंध स्पर्धा

ड) उपरोक्त कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके

इ) व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद इ.

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात

येणाऱ्या योजनांना मेळावे, चर्चासत्रे इत्यादीद्वारे प्रसिध्दी देण्यात यावी.

४. राज्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी सर्व जिल्हयात सूचना देणे

कार्यक्रमाची रुपरेषा ठरविणे, कार्यक्रमांचे आयोजन मार्गदर्शन करणे इत्यादी जबाबदारी महाराष्ट्र राज्य

अल्पसंख्याक आयोगाची राहील. तसेच जिल्हयात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याची जबाबदारी

सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास शासनाकडून, “मागणी क्र. झेड ई-१, मुख्य लेखाशीर्ष २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण ०२ समाज कल्याण २०० व इतर कार्यक्रम २०० इतर कार्यक्रम, राज्य योजनेंतर्गत योजना (०१) अल्पसंख्याकांना

सहाय्य (०१) (१२) संशोधन, प्रशिक्षण व योजनांना प्रसिध्दी याकरिता सहायक अनुदान (२२३५-ए-१८७)

३१, सहायक अनुदान” या लेखाशिर्षाखाली प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या अनुदानातून रु.१०.०० लक्ष

इतक्या मर्यादेत खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

५.उपरोक्त सूचनांआधारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा अहवाल सचिव, महाराष्ट्र

राज्य अल्पसंख्याक आयोग व जिल्हाधिकारी यांनी शासनास प्रतिवर्षी सादर करावा.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर

उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक २०२४१२१६१२२६३८२३१४ असा आहे. हे परिपत्रक

डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासनाचे अधिकृत परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड बटन वर क्लिक करा. 

                 Download

शालेय पोषण आहार योजने बाबत अत्यंत महत्वाचे परिपत्रक

 स्वातंत्र्याचा अमृत उत्सव

महाराष्ट्र शासन

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (स्वतंत्र कक्ष)

प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

सेंट्रल बिल्डिंग, डॉ. ॲनी बेझंट मार्ग, पुणे 411001

दूरध्वनी क्र. (०२०) २६१२८१५७

ई-मेल :- mdmdep@gmail.com

जा नं. Prasisan/PMposhan/2024/07739

प्रति,

d /12/2024. १३ डिसेंबर २०२४

1. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका

2. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व

विषय :- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत अंडी आणि केळीसाठी शाळा/केंद्रीय किचन संस्थेला अनुदान वाटपासाठी अनुदान मागणीची नोंदणी करणे..

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना ही राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेंतर्गत शालेय स्तरावर नाविन्यपूर्ण उपक्रमांचा एक भाग म्हणून 2023-24 या नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना अंड्याचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच, 2024-25 या कालावधीत त्रिस्तरीय आहार योजनेनुसार दोन आठवड्यांतून एकदा अंड्यांचा लाभ विद्यार्थ्यांना अंडी कॅसरोलच्या स्वरूपात देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील अनेक जिल्हे व मध्यवर्ती स्वयंपाक संस्थांकडे अंडी व केळीचे अनुदान प्रलंबित असून त्यासाठी संचालनालयाकडे वेळोवेळी अनुदानाची मागणी करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांना पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

1. 2023-24 आणि 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत, योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांनी अंडी/केळीचे लाभ दिल्याचे संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित केले पाहिजे. .

2. मुद्दा क्रमांक 1 मध्ये नमूद केल्यानुसार नोव्हेंबर, 2023 ते एप्रिल, 2024 या कालावधीसाठी अदा करावयाच्या रकमेची गणना, शाळा किंवा केंद्रीय स्वयंपाकघरासाठी आवश्यक अनुदान आणि यापूर्वी शाळांना वितरित केलेली आगाऊ रक्कम आणि फरक अदा करावयाच्या रकमेचा अहवाल अनुदान मागणी संचालनालयाला द्यावा.

3. शाळांनी अंड्यांचा प्रत्यक्षात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फरकाची रक्कम मागितली पाहिजे, केळी किंवा इतर फळांचा फायदा झाला असेल तर अंड्यांसाठी निश्चित फरकाची रक्कम मागू नये.

4. मध्यवर्ती स्वयंपाकघर संस्थांमधील शाळांमधील लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात अनुदानाची मागणी बाब क्र. मधील दरांनुसार करण्यात यावी.

5. 2024-25 या कालावधीसाठी, त्रिस्तरीय आहाराचा लाभ संबंधित शाळांद्वारे तसेच केंद्रीय स्वयंपाकघर संस्थांद्वारे विद्यार्थ्यांना दिला जात असल्याची खात्री करावी आणि मुख्याध्यापकांमार्फत ते प्रमाणित केले जावे. जिल्हास्तरावर केंद्रीय किचन संस्थांकडील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची प्रमाणपत्र पुस्तके ठेवावीत व आवश्यकतेनुसार सदर माहिती संचालनालयास सादर करावी.

6. शाळांद्वारे विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या नियमित आहाराची माहिती MDM पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. फरकाची रक्कम वितरीत करताना, ज्या शाळांसाठी अनुदानाची विनंती केली जाते त्या सर्व शाळांनी नियमितपणे MDM पोर्टलवर दैनंदिन उपस्थितीची माहिती नोंदविण्याची खात्री तालुक्याने करावी.

सोशन-परिषद १ ते २

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१

कॉपी माहितीसाठी कृपया येथे सबमिट करा:

1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

2. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

                     Download

Saturday, December 14, 2024

प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम (सन २०२४-२५) आयोजन करणे बाबत SCERT चे निर्देश

प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम (सन २०२४-२५) आयोजन करणे बाबत SCERT चे निर्देश

प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम (सन २०२४-२५) आयोजन करणे बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

शाळांतील इयत्ता ३री ते इयत्ता ८वी च्या विद्यार्थी/शिक्षकांसाठी राज्यस्तर रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अनुभवात्मक शिक्षणाच्या द्वारे (Experiential Learning) शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग, स्वयं-पुढाकार, स्वयं-दिशा, स्वयं-शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

तसेच समृद्धी कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येत असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ९वी ते इयत्ता १२वी च्या शाळांसाठी खुला आहे.

तदनुषंगाने रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत अनुभवात्मक अध्ययन (Experiential Learning) आधारित उत्कृष्ट कृती राज्यस्तरावर सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थी व शिक्षकांना प्राप्त होणार आहे. शाळांनी Arts Integration, Sports Integration, Toy Based Pedagogy, व Story Telling या चार मुद्द्यांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांनाचे विविध उत्कृष्ट कृर्तीचा समावेश असलेले व्हिडीओची लिंक व आवश्यक माहिती 

या लिंकमध्ये भरून पाठविणे आवश्यक आहे. तसेच तयार केलेल्या व्हिडीओबी लिंक दिलेल्या गुगल फॉर्मवर

https://forms.gle/nPyWRFzDqsBKpWBC

पेस्ट करावयाचे आहे.

तसेच माध्यमिक स्तरावर समृद्धी स्पर्धा हा राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सव कार्यक्रमचाच विस्तारीत कार्यक्रम आहे की जो राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने सन २०२४-२५ मध्ये प्रथमच आयोजित केला आहे. या अंतर्गत शिक्षकांना माध्यमिक स्तरावरील (इयत्ता नववी ते बारावी) अभ्यासक्रमाच्या क्षेत्रांवर सर्वोत्तम कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धती (best art integrated pedagogical practices) यावर आधारित सर्वोत्तम अध्ययन अध्यापन कृतींच्या सादरीकरणाची संधी मिळते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP- २०२०) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-२०२३) या नुसार अभ्यासक्रमीय अध्ययनामध्ये कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणाऱ्या शिक्षकांचे योगदान ओळखणे आणि प्रोत्साहित करणे हा आहे.

कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये -

१. वर्गातील उपक्रम, कृती यांचा थेट संबंध अध्ययनाशी असला पाहिजे.

२. अध्ययन अनुभवांमध्ये आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन असावा ज्याद्वारे एका अध्ययन अनुभवाचा सहसंबंध दुसऱ्या अध्ययन अनुभवाशी सहज जोडता येईल.

३. अध्ययन अनुभवांमध्ये चिकित्सक विचार व २१ व्या शतकातील कौशल्ये याचाही विचार असावा.

४. अभ्यासक्रमीय ध्येये साध्य करण्यासाठी अध्यापनात स्वदेशी हस्तकला, कला, खेळणी आणि स्थानिक संसाधने यांचे एकीकरण करून अध्ययन अनुभव दिले पाहिजे.

५. सुलभक विविध सर्जनशील अध्यापनशास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यासाठी विविध वर्ग एकत्र करून व वर्गात विविध संघ तयार करून विविध अध्ययन अनुभवांची योजना करू शकतात.

६. सुलभक आनंददायी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रवृत्त करू शकतात.

७. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये कलेचा उत्पादन म्हणून नव्हे तर अध्ययनाची एक प्रक्रिया म्हणून विचार केला जावा.

८. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये सर्वसमावेशक शिक्षणासाठी वातावरण तयार करणे अपेक्षित आहे.

९. वर्गातील विविध अध्ययन अनुभव, कृती व उपक्रमांमध्ये स्थानिक संसाधनांच्या वापरास प्रोत्साहन दिले पाहिजे.

१०. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीनुसार विद्यार्थ्यांमध्ये एकात्मिक कला प्रकार आणि शिकवले जाणारे विषय किंवा संकल्पना या दोन्हीमध्ये अध्ययन उद्दिष्टांची संपादणूक झाली असली पाहिजे,

समृद्धी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची पात्रताः-

१. शासकीय, शासकीय अनुदानित किंवा केंद्रीय अथवा राज्य बोर्डाची संलग्न अशा कोणत्याही खाजगी शाळेतील इयत्ता नववी ते बारावी या इयत्ताना अध्यापन करणारे शिक्षक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

२. अन्य शासकीय संस्थांचे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उदाहरणार्थ तिबेटियन शाळा व्यवस्थापन, NCERT, Railways schools, KGBV किंवा Cantonment Board Schools सदर समृद्धी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

माध्यमिक स्तरावर समृद्धी कार्यक्रमासाठी कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांनाचे विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओची ड्राईव लिंक व आवश्यक माहिती 

 https://forms.gle/BLXY23hUQW3uirNQ8

या लिंकमध्ये भरून पाठविणे आवश्यक आहे. तसेच तयार केलेल्या व्हिडीओची लिंक दिलेल्या गुगल फॉर्मवर https://forms.gle/BLXY23hUQW3uirNQ8 पेस्ट करावयाचे आहे.

रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासंदर्भात करावयाची कार्यवाही :-

सदर रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमाच्या सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर मुंबई यांनी आपले कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना निर्गमित करावेत. रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत सादरीकरणाच्या व्हिडीओची गुगल ड्राईव वरील लिंक, https://forms.gle/nPiyWRFzD9sBKpWB८या गुगल लिंकवर पेस्ट करणे आवश्यक आहे, तसेच आवश्यक माहिती सदर लिंक वर भरणे बाबतही शाळांना सूचित करावे. तसेच समृद्धी कार्यक्रमासाठी २० मिनिटांचा व्हिडीओ व पाठाचा ५०० शब्दांच्या मर्यादेत प्रकल्प आराखडा https://forms.gle/BLXY23hUQW3uirNQ8 या गुगल लिंक वर अपलोड करावा, तसेच समृद्धी कार्यक्रमाची माहिती ही या https://forms.gle/BLXY23hUQW3uirNO8 

लिंकवर भरावी, असेही आपल्या कार्य क्षेत्रातील शाळा व शिक्षक यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांनी सूचित करावे. सदर प्रकल्प आराखडा NCERT, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये अपलोड करायचा आहे. रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम मुदत दि.२९ डिसेंबर २०२४ सायंकाळी ठीक ६.०० वाजे पर्यंत असेल, हे सुद्धा सूचित करण्यात यावे. तथापि सदर कार्यक्रमांत सहभाग घेणाऱ्या शिक्षकांनी सादर केलेल्या व्हिडीओला अक्सेस देणे आवश्यक आहे, असेही आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.

वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

Wednesday, December 11, 2024

संच मान्यता सन २०२३-२४ नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे समायोजन करण्याबाबत आदेश!

संच मान्यता सन २०२३-२४ नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे समायोजन करण्याबाबत आदेश!

शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांनी दिनांक दहा डिसेंबर 2024 ला निर्गमित केलेल्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक अमरावती विभाग यांना संच मान्यता सन २०२३-२४ नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे समायोजन करण्याबाबत  सुचित केले आहे की अतिरिक्त शिक्षक व  व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही व सदर बाबतचा अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग यांना दिनांक वीस डिसेंबर 2024 पूर्वी सादर करावा.

आदेश पुढीलप्रमाणे.

सन 2022-23 संचमान्यता या कार्यालयाकडून वाटप करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आपल्या संस्थेत / शाळेमध्ये अतिरिक्त होणा-या शिक्षकाचे प्रथम संस्थाअंतर्गत समायोजन करणेबाबत आपणास यापुर्वीच कळविणेत आलेले होते. संस्था अंतर्गत समायोजन करुण देखील आपलेकडे शिक्षक अतिरिक्त होत असल्यास अशा शिक्षकांची माहिती हे कार्यालय व वेतनपथक अधिक्षक यांचे मार्फत देखील मागविणेत आलेली होती. परंतु माहितीचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, काही संस्थानी / शाळानी अतिरिक्त पदाची माहिती अदयाप दिलेली नाही.

सोबतच्या यादीचे अवलोकन करुन अतिरिक्त शिक्षकांची माहिती दिलेली नसेल तर त्यांनी ती सोबतच्या प्रपत्र व मध्ये दि. 17/11/2023 पर्यंत या कार्यालयास संबंधित लिपिक यांचे निदर्शनास आणून कार्यालयीन टपाल शाखेकडे सादर करणेत यावी. तसेच रिक्त जागाची माहिती देखील काही संस्था/शाळा अचुक देत नसलेचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रिक्त पदाची माहिती प्रपत्र अ मध्ये बिंदुनामावलीसह या कार्यालयास सादर करावी.

अतिरिक्त व रिक्त पदाची माहिती या कार्यालयास वेळेत सादर न केलेस व आपल्या शाळेत अतिरिक्त शिक्षक राहिलेस त्यांचे वेतनाची सर्वस्वी जबाबदारी संस्था/शाळा यांची राहिल यांची नोंद घ्यावी. तसेच सदर शाळेने शिक्षक पद रिक्त असताना देखील रिक्त पदाची माहिती न कळविलेस अश्या संस्था / शाळा यांना रिक्त पद पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीस परवानगी मिळणार नाही याची नोंद घ्यावी. त्यामुळे चुकीची अथवा अपुर्ण माहिती देणेत येऊ नये.

Friday, December 6, 2024

सन २०२४-२५ मधील सुट्ट्या

 सन २०२४ - २५ मधील सुट्ट्या 

सुट्ट्याचे वेळापत्रक जाहीर

जाणून घेऊया

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

         Download

Wednesday, December 4, 2024

६ डिसेंबर २०२४ । महापरिनिर्वाण दिनानिमित्त शास्कीय सुट्टी जाहीर

 ६ डिसेंबर २०२४ । महापरिनिर्वाण दिनानिमित्त शास्कीय सुट्टी जाहीर 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत...

महाराष्ट्र राज्य

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्रमांकः स्थानिसु-१३२४/प्र.क्र. ३२/जपुक (२९)

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगरु चौक,

मुंबई- ४०० ०३२.

दिनांक: ०४ डिसेंबर, २०२४

राज्य परिपत्रकः

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सार्वसु-११९६/ प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी “अनंत चतुर्दशी” या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. आता सन २०२४ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना याद्वारे खालीलप्रमाणे तिसरी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.

सुट्टीचा दिवस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

इंग्रजी तारीख ०६ डिसेंबर, २०२४

भारतीय सौर दिनांक १५ मार्गशीर्ष शके १९४६

वार शुक्रवार

२. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.

३. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी-१३/।।/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे.

४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१२०४१११८२६७३०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार