६ डिसेंबर २०२४ । महापरिनिर्वाण दिनानिमित्त शास्कीय सुट्टी जाहीर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत...
महाराष्ट्र राज्य
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः स्थानिसु-१३२४/प्र.क्र. ३२/जपुक (२९)
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगरु चौक,
मुंबई- ४०० ०३२.
दिनांक: ०४ डिसेंबर, २०२४
राज्य परिपत्रकः
शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सार्वसु-११९६/ प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी “अनंत चतुर्दशी” या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. आता सन २०२४ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना याद्वारे खालीलप्रमाणे तिसरी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.
सुट्टीचा दिवस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
इंग्रजी तारीख ०६ डिसेंबर, २०२४
भारतीय सौर दिनांक १५ मार्गशीर्ष शके १९४६
वार शुक्रवार
२. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.
३. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी-१३/।।/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे.
४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१२०४१११८२६७३०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार
No comments:
Post a Comment