तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विज्ञान विज्ञान गणित व पर्यावरण २०२४-२५ प्रदर्शन आयोजित करणे बाबत राज्य विज्ञान व गणित संस्थेचा आदेश
५२ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन २०२४-२५ च्या आयोजनाबाबत प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था) कार्यालयातून निर्गमित दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
संदर्भ :- १. रा.वि.शि.स. (प्राविप्रा) / ५२ वेराविप्र/२०२४-२५/५४०/२०२४ दिनांक २७.०९.२०२४
२. रा.वि.शि.स. (प्राविप्रा)/५२ वेराविप्र/२०२४-२५/६२५/२०२४ दिनांक ०६.११.२०२४
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये सन २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षातील ५२ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाची पुर्वतयारी म्हणून आपल्या स्तरावर तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय प्रदर्शनी आयोजित करण्याबाबत सुचित करण्यात आलेले आहे. तरी आपल्या जिल्हयातील जिल्हास्तरीय प्रदर्शनी लवकरात लवकर आयोजित करून विहित प्रपत्रात माहिती दिनांक ०५.०१.२०२५ पुर्वी या कार्यालयात सादर करावी.
राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२४-२५ चे आयोजन माहे जानेवारी २०२५ च्या दुस-या आठवडयात करण्यात येणार आहे. त्याबाबत शासन स्तरावर तयारी सुरू करण्यात आलेली आहे. आयोजन स्थळ व दिनांक लवकरच आपल्याला कळविण्यात येईल.
सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, यांनी आपल्या अधिनस्त यंत्रणेकडून तालुकास्तर व जिल्हास्तर प्रदर्शनी बाबत आढावा घ्यावा व तसा अहवाल या कार्यालयाला कळविण्यात यावा.
(डॉ. हर्षलता बुराडे)
संचालक
राज्य विज्ञान शिक्षण संस्था
(प्रादेशिक विद्या प्राधिकरण) • रविनगर नागपुर
प्रादेशिक विद्या प्राधिकरण तथा राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर कार्यालयातील निर्गमित दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी च्या आदेशानुसार ५२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण २०२४-२५ आयोजित करणेबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
संदर्भ :- १) एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली, भारत सरकार यांचे दिशानिर्देश २०२४-२५
उपरोक्त संदर्भाकित विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे ५२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक ०१ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ (अंदाजित कालावधी) या दरम्यान ५ दिवस कालावधीचे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे.
यावर्षी एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली यांच्या संदर्भीय दिशानिर्देशान्वये विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान " (SCIENCE AND TECHNOLOGY FOR SUSTAINABLE FUTURE) असा निश्चित केला आहे. सामाजिक, पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून पुढीलप्रमाणे एकूण सहा उपविषय निर्धारित केलेले आहेत.by
१ अन्न, आरोग्य आणि स्वच्छता (A Food, Health and Hygiene.)
२ वाहतुक आणि दळणवळन (Transport And Communication.)
३ नैर्सगिक शेती (Natural Farming.)
४ आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management.)
५ गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार (Mathematical Modelling and Computational Thinking.)
६ कचरा व्यवस्थापन (Waste Management)
७ संसाधन व्यवस्थापन (Resource Management)
No comments:
Post a Comment