google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: शैक्षणिक दौऱ्यांबाबत नवीन नियमावली

Wednesday, November 27, 2024

शैक्षणिक दौऱ्यांबाबत नवीन नियमावली

 शैक्षणिक दौऱ्यांबाबत नवीन नियमावली


खाजगी वाहनाने प्रवास करण्यास बंदी


लोकप्रतिनिधी


नागपूर : जिल्ह्यातील सर्व


माध्यमातील तसेच सर्व मंडळाशी संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयांचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रथमदर्शनी पाहता याव्यात यासाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते.


शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार वर्षातून एकच शैक्षणिक सहल आयोजित करावी, सहलीसाठी विद्यार्थ्यांना येण्याची सक्ती करू नये, विद्यार्थी व पालकांकडून संमतीपत्र घेण्यात यावे, तसेच सहभागी विद्यार्थ्यांची यादी व संपर्क क्रमांक जोडण्यात यावेत, सहलीचे शालेय व्यवस्थापन समितीच्या संमतीनेच आयोजित केले जाईल. ,


सहलीसाठी शिक्षकांची संख्या 10 विद्यार्थ्यांमागे एक असावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी मुख्याध्यापकांची तसेच सहलीवरील सर्व शिक्षकांची असेल, सहलीमध्ये महिला विद्यार्थिनी सहभागी होत असतील तर ते अत्यावश्यक असेल. महिला शिक्षिकेसोबत सहलीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जावे, शैक्षणिक सहलीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये. अशी अट घालण्यात आली आहे.



No comments:

Post a Comment