google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education

Monday, September 23, 2024

20 किंवा 20 पेक्षा कमी ऐवजी आता 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंखेच्या शाळांवर डीएड किंवा बीएड धारक कंत्राटी शिक्षक! शासन आदेश.

 

20 किंवा 20 पेक्षा कमी ऐवजी आता 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंखेच्या शाळांवर डीएड किंवा बीएड धारक कंत्राटी शिक्षक! शासन आदेश.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड, बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक यांमधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त वाचा क्र.४ येथील शासन निर्णय दि.०५.०९.२०२४ या निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे.

०२. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पर्टसख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डीएड, बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी. याबाबतच्या सर्वसाधारण तरतूदो पुढीलप्रमाणे विहीत करण्यात येत आहेतः-

१. सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील.

२. डी.एड, बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पध्दतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे / सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार / हक्क नसेल, ३. सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल. परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरीता दरवर्षी नुतनीकरण करता येईल.

४. मानधन रु. १५,०००/- प्रतिमाह (कोणत्याही इतर लाभांव्यतिरीक्त)

५. एकूण १२ रजा देय (एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा ह्या विनावेतन असतील).

६. कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील.

७. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.

८. बंधपत्र/हमीपत्रः नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने शिक्षकीय पदाचे विहीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील, या आशयाचे बंधपत्र/हमीपत्र घेण्यात यावे. बंधपत्र/हमीपत्रामध्ये करार पध्दतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पध्दतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत/आक्षेप राहणार नाही, याचा देखील उल्लेख करण्यात यावा.

अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील.

१०. प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावेत.

११. सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त (शिक्षण) यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात,

१२. नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थीतीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.

१३. करार पध्दतीने नियुक्त करावयाचा शिक्षक शारिरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी.

१४. करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीनी त्यांना प्राप्त होणान्या कागदपत्रे/माहिती व आधारसामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील.

१५. करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मुल्यमापन करतील. सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल.

१६. शाळेची पटसंख्या १० पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डी.एड व बीएड अर्हताधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरु राहील. नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल.

१७. करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती, सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल, अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी.

१८. करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील.

१९. ज्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात यावी. यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी. जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवाज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे. तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलौने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी. तथापि, कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये.

२०. कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्रप्रमुखांचे असेल. त्यानंतर गट शिक्षण अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे नियंत्रण असेल.

२१. संदर्भीय शासन पत्र, दि.०७.०७.२०२३ व शासन पत्र, दि.१५.०७.२०२४ अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे १० पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील. यासाठी देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून रु. १५,०००/- एवढे राहील.

२२. सदर बाबीवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

                  Download


स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी आधार व्हॅलिड नसेल तरीही संचमान्यतेसाठी तो विद्यार्थी ग्राह्य धरणार शिक्षण संचालक यांचे निर्देश

 

स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी आधार व्हॅलिड नसेल तरीही संचमान्यतेसाठी तो विद्यार्थी ग्राह्य धरणार शिक्षण संचालक यांचे निर्देश

प्राथमिक शिक्षण संचालनायातून निर्गमित दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजीच्या आदेशानुसार शाळेतील दिनांक सप्टेंबर 2023 रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करून संचमान्यता विचारात घेणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. 


संदर्भ : मा. मंत्री महोदय शालेय शिक्षण यांनी दिनांक १९.०९.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

सरल प्रणालीतर्गत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑनलाईन पध्दतीने करण्यात येतात. मा. मंत्री महोदय यांच्या समवेत दिनांक १९.०९.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार ३०.०९.२०२३ रोजी स्टुडंट पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी आधार वैध असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेवून सन २०२३-२०२४ ची संच मान्यता अंतिम करण्यात आलेली आहे.

२/- तथापि, विद्यार्थाच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा काही विद्यार्थ्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यामुळे शाळेतील सन २०२३-२०२४ च्या मंजुर पदावर विपरित परिणाम होत असेल तर अशा शाळा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या विद्यार्थ्याच्या नावाचा यादीसह अर्ज करतील व शाळांच्या बाबतीत संबंधित गटशिक्षणाधिकारी हे अशा विद्याथ्यर्थ्यांपैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील तर अशा विद्याथ्यर्थ्यांची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्याकडून याबाबतची योग्य ती खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील. विद्यार्थ्यांची पडताळणी करताना खालील बाबींची खात्री करावी. (प्रमाणपत्र, पडताळणी प्रपत्र १ ते ३ सोबत जोडले आहे.)

१. नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करुन व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत यांची शहानिशा करुन असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संच मान्यतेकरीता ग्राहय धरण्यात यावेत.

२. ज्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांकासाठी नोंद केली आहे अथवा आधार कार्ड उपलब्ध नाहीत असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखल केले नाहीत याची तसेच त्यांचे आधार कार्ड तयार होवू शकले नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संच मान्यतेत ग्राहय धरण्यात यावेत.

३. शाळेतील विद्यार्थी डुप्लिकेट (Duplicate) असल्याचे स्टुंडट पोर्टलवर दर्शवित असेल तर असा विद्यार्थी नेमका कोणत्या शाळेत शिकत आहे, याची क्षेत्रीय यंत्रणेकडून खात्री करुन योग्य त्या शाळेत सदर विद्यार्थ्यांची नोंद करणे.

४. शाळेकडून अर्ज प्राप्त झालेल्या प्रत्येक शाळेत संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी समक्ष भेट देवून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तपासण्यात यावी व मुख्याध्यापकांनी अर्ज केलेल प्रत्येक विद्यार्थी संच मान्यतेत धरण्यासाठी पात्र आहे किंवा नाही याची खात्री करावी.

५. ज्या शाळांची किमान ९० टक्के विद्यार्थी शाळांनी आधार वैध केलेले आहेत. त्याच शाळांतील उर्वरित विद्यार्थ्यांबाबतची त्यांच्या अडचणी लक्षात घेवून पडताळणी करण्यात यावी.

वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 


Sunday, September 22, 2024

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता बाबत

 २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता बाबत 

महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ. ॲनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे-411 001.

प्यत्तात्रियांचा अमृत महोतराव

depmah2@gmail.com वर ई-मेल करा

दूरध्वनी (०२०) २६१२५६९२/९४

दिनांक: 08.2024 23 ऑगस्ट 2024

क्रमांक : प्रसिसम/सँकिन/24/TE-500/5653

प्रति,

1. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

2. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद (सर्व)

विषय: 2024-2025 या संदर्भात एकमत वर्ष...

संदर्भ: सरकारी पत्र क्रमांक न्यायप्र-२०२४/प्र.सं.१६७/टीएनटी-२, दिनांक १२.०७.२०२४

वरील बाबत मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद यांच्या दिनांक 12.06.2024 च्या रिट याचिका क्र. 2822/2024 आणि रिट याचिका क्र. 5472/2024 मधील दिनांक 12.06.2024 च्या आदेशानुसार. न्यायालयाच्या दिनांक 15.03.2024 च्या रिट याचिका क्रमांक 2896/2024 मधील आदेशाच्या परिच्छेद 5 मधील निर्देशानुसार, सरकारने संदर्भ पत्राद्वारे निर्देश जारी केले आहेत.

2/- 15.03.2024 च्या शासन निर्णयानुसार मान्यताप्राप्तीसाठी सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत.

तसेच, दिनांक 15.03.2024 च्या शासन निर्णयानुसार, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक,

अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील समायोजनाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 3/- दिनांक 30.09.2024 च्या उक्त शासन निर्णयानुसार, वैध आधार गुणाकार विचारात घेण्यासाठी आणि सर्वसाधारण मान्यता आणि समायोजनाची कार्यवाही करण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तथापि, सर्व शाळांना सन 2024-2025 या वर्षासाठीची संयुक्त मान्यता विहित कालावधीत आयोजित करण्यासाठी 30.09.2024 पूर्वी 'सरलीकृत' प्रणालीमध्ये आवश्यक माहिती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात यावेत. 'सरल' प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची जाहिरात शाळेच्या प्रोफाइलची माहिती, कार्यरत पदांची माहिती, 'सरल' प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या स्थलांतराची माहिती, विद्यार्थ्यांची आधार वैधता आणि इतर आवश्यक क्रिया विहित कालावधीत पूर्ण कराव्यात. यामध्ये विलंब झाला तर

संबंधितांची जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी.

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
 
परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक

                        Download


Friday, September 13, 2024

सन २०२४-२५ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान वितरीत!

 

सन २०२४-२५ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान वितरीत!

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२४-२५ च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकास भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ (PAB) च्या दि. ०५/०३/२०२४ रोजीच्या बैठकीत संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजूरी मिळाली आहे. सन २०२४-२५ मध्ये सर्वात वरची इयत्ता ८वी पर्यंतचे वर्ग असलेल्या एकूण ६३०१० शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी एकूण रु.१६३०७.२५ लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे. तसेच सर्वांत वरची इयत्ता १०वी किंवा १२वीचा वर्ग असलेल्या एकूण १७७१ शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांसाठी एकूण रु. १०३१.४० लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

उपरोक्त नमूद PM SHRI (३११) शाळा वगळून मंजूर निधीपैकी उपलब्ध तरतूदीतून तुर्तास प्राथमिक शाळांसाठी ५०% निधी म्हणजे रु. ८०७४.७५ लक्ष व माध्यमिक शाळांकरीता ५०% निधी म्हणजे रु.४९१.२० लक्ष इतका निधी संबंधित जिल्हा परिषद महानगरपालिका यांना उपलब्ध करन देण्याचे प्रस्तावित आहे.


उपरोक्त निधी हा केवळ समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असणाऱ्या शाळांकरीता (PM SHRI शाळा वगळून) वितरीत करण्यात यावा. जिल्हा परिषद महानगरपालिका निहाय भौतिक व आर्थिक तरतूदीबाबतचा तक्ता (अ) व (ब) सोबत जोडण्यात आलेला आहे. जिल्ह्यांना / महानगरपालिकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी हा ज्या शाळाचा खर्च होईल अशाच शाळांना प्राधान्याने निधी वितरीत करण्यात यावा. तथापि, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या एकूण मंजूर तरतूदीच्या मर्यादित आणि शाळांना मंजूर असलेल्या तरतूदीच्या मर्यादित खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी. समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व जिल्हा व महानगरपालिका यांनी सदरचा निधी प्राप्त होताच तात्काळ खर्च करुन प्रबंध पोर्टलवर माहिती अद्यावत करण्यात यावी.

सोबत :- मार्गदर्शक सूचना आणि तक्ता अ व ब


राज्य प्रकल्प संचालक

म.प्रा.शि.प


परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

                    Download




Saturday, September 7, 2024

राज्यातील सर्व शाळांसाठी व शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट । निबंध स्पर्धा

 राज्यातील सर्व शाळांसाठी व शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट । निबंध स्पर्धा 





निबंध स्पर्धेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे-*


१) ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरांवरील शिक्षकांसाठी आहे.


२) आपले निबंध मराठी किंवा इंग्रजी या भाषेत असावेत.


३) शब्दमर्यादा कमीत कमी आठशे आणि जास्तीत जास्त बाराशे इतकी आहे.


४) हस्ताक्षरात किंवा टाईप केलेले निबंध  पीडीएफ स्वरूपात खालील मेल आयडीवर पाठवावेत. 

*education@chavancentre.org*


*महत्त्वाचे:-*

       i) ईमेलचा विषय (Subject) या रकान्यात *शिक्षकांसाठी भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२४* लिहावे.

       ii) ईमेलच्या मजकुरात( compose email) खालील बाबींचा समावेश असावा.

        स्वतःचे नाव

        शाळेचे नाव

        संपर्कासाठी पत्ता आणि फोन नंबर

        निबंधाचे शीर्षक 

        निबंधाची शब्दसंख्या      


५) निबंधाच्या पीडीएफ मध्ये कुठेही स्वतःचे नाव लिहू नये अथवा आपली ओळख उघड होईल असा कुठलाही मजकूर त्यात असू नये.


६) निबंध स्पर्धेचा निकाल ११ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या दिवशी घोषित करण्यात येईल. 


७) गुणानुक्रमे दोन्ही विषयांच्या प्रत्येकी पहिल्या पाच अशा एकूण दहा निबंधांना पारितोषिक, गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येईल.


८) नियुक्त केलेल्या परीक्षक समितीचा निर्णय स्पर्धकांना बंधनकारक राहील.


अधिक माहितीसाठी-

संजना पवार- 8291416216


*डाॅ. वसंत काळपांडे,*

मुख्य संयोजक,

शिक्षण विकास मंच,

यशवंतराव चव्हाण सेंटर.

Friday, September 6, 2024

पुन्हा एक नवीन उपक्रम! राज्यातील सर्व शाळांमध्ये दि.०१ सप्टेंबर, २०२४ ते दि. १५, सप्टेंबर, २०२४ या कालावधीत "स्वच्छता पंधरवडा" उपक्रम!

 

पुन्हा एक नवीन उपक्रम! राज्यातील सर्व शाळांमध्ये दि.०१ सप्टेंबर, २०२४ ते दि. १५, सप्टेंबर, २०२४ या कालावधीत "स्वच्छता पंधरवडा" उपक्रम!


केंद्रीय शिक्षा मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये दि.०१ सप्टेंबर, २०२४ ते दि. १५, सप्टेंबर, २०२४ या कालावधीत "स्वच्छता पंधरवडा" उपक्रम राबविणे बाबत शिक्षण आयुक्तालयाने दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, माननीय शिक्षण संचालक प्राथमिक व माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.

सर्व शाळांमध्ये दि.०१ सप्टेंबर, २०२४ ते दि.१५, सप्टेंबर, २०२४ या कालावधीत "स्वच्छता पंधरवडा" उपक्रम राबविण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये सदर उपक्रमाचे दिनदर्शिका व कृती आराखडा देण्यात आला आहे. या पंधरवड्या दरम्यान करण्यात आलेल्या उपक्रमांची छायाचित्रे आणि व्हिडीओज सदर पत्रात देण्यात आलेल्या Google लिंकवर पाठविण्यात याव्यात.

संदर्भीय पत्रामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचना आपल्यास्तरावरुन राज्यातील सर्व शाळांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. आपण केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास व या कार्यालयास अवगत करावे, ही विनंती.


(डॉ. श्रीराम पानझाडे)

शिक्षण उपसंचालक (प्रशासन) 

आयुक्त (शिक्षण) कार्यालय, म.रा., पुणे


प्रत माहिती व पुढील कार्यवाहीस्तव

१. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), सर्व जिल्हा परिषदा

२. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, उत्तर, दक्षिण), बृहन्मुंबई महानगरपालिका

३. शिक्षणाधिकारी/प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिका/नगरपालिका सर्व

प्रत माहितीस्तव

मा.आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे स्वीय सहाय्यक

राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि स्वायत्त संस्थांसाठी स्वच्छता पखवाडा गुगल ट्रॅकर आणि ड्राइव्ह 2024 मध्ये प्रवेश करण्यासाठी पायऱ्या

1. वापरकर्त्याकडे Gmail खाते असणे आवश्यक आहे.

2. प्रत्येक राज्य / केंद्रशासित प्रदेशात दोन यूजर आयडी (Gmail id) ला प्रवेश दिला जाईल ज्यातून डेटा स्वच्छता पखवाडा ट्रॅकरवर अपलोड केला जाईल.

3. Google ट्रॅकर आणि ड्राईव्हमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 'swachhatapakhwada2024@gmail.com' वर विनंती पाठवा.

4. उच्च रिझोल्यूशन छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर प्रसिद्धी सामग्रीसह दिवसाच्या विशिष्ट क्रियाकलापांसाठी डेटा दररोज रात्री 8.00 पर्यंत अद्यतनित करणे आवश्यक आहे.

5. ट्रॅकरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळाल्यानंतर:

(a) वापरकर्ता फक्त त्यांच्या नोंदणीकृत Gmail खात्यात लॉग इन करू शकतो,

(b) ट्रॅकरची उपलब्ध लिंक कॉपी करा आणि ब्राउझरमध्ये पेस्ट करा (गुगल क्रोम),

(c) स्वच्छता ट्रॅकर उघडेल,

स्वच्छता पखवाडा गुगल ट्रॅकर लिंक:-

https://docs.google.com/spreadsheets/d/1ksRS_BGjujF_2gEjiZZcJLLKG_nabdhfAsKtfXA_kz8/edit?gid=0#gid=0

स्वच्छता पखवाडा गुगल ड्राइव्ह लिंक:-

https://drive.google.com/drive/u/1/folders/1XXY_Xokver_nhrBWci_XgCWwd2VoCdh6

सर्व परिपत्रके पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

                            Download

PM-Poshan - शालेय पोषण आहार मेनू कार्ड सन २०२४-२५ धान्यादी मालाचे प्रमाण इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी

 

PM-Poshan - शालेय पोषण आहार मेनू कार्ड सन २०२४-२५ धान्यादी मालाचे प्रमाण इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहार साठी वर्ष 2024 25 पाककृती व मेनू कार्ड पुढील प्रमाणे.



शालेय पोषण आहार (मेनू कार्ड) सन २०२३ २०२४


सोमवार

उसळ / भाजी-आमटी (वाटणा)

मंगळवार

आमटी भात/ डाळतांदळाची खिचडी (मुगडाळ)

3

बुधवार

वरणभात/ सांबरभात / आमटी भात (तुरडाळ)

गुरुवार

कडधान्याची उसळ/भाजी आमटी/ (मटकी)

शुक्रवार

उसळ / भाजी आमटी (वाटणा)

शनिवार

आमटी भात/ डाळतांदळाची खिचडी (मुगडाळ)

वरील वरील वारानुसार असलेल्या मेनू हा जिल्हा नुसार बदलू शकतो परंतु त्याखाली असलेले धान्यादी मालाचे प्रमाण मात्र सर्व जिल्ह्यांसाठी सारखे आहेत.