google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education

Tuesday, April 29, 2025

राज्यातील सर्व शाळांसाठी उन्हाळी सुट्टी बाबत

 महाराष्ट्र शासन


शिक्षण संचालनालय


माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे 411 001


ई-मेल- doesecondary1@gmail.com


फोन क्र. ०२०-२६१२६४६३


महत्वाचे परिपत्रक


दिनांक-25/(O-01)/उन्हाळी सुट्टी/S-1/2237 दि.


29 एप्रिल 2025


प्रति,


1. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.


2. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.


3. शिक्षण निरीक्षक (उत्तर/पश्चिम/दक्षिण), बृहन्मुंबई.


विषय: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या 2025 च्या उन्हाळी सुट्या आणि 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाबाबत.


संदर्भ : शासन परिपत्रक क्र. नॅरो-२०२३/पी.नं.१०५/एस.डी.४, दि. 20/04/2023.


वरील संदर्भ परिपत्रकानुसार राज्यभरातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत एकसमानता व सातत्य आणण्याच्या सूचना शासनाने जारी केल्या आहेत. या अनुषंगाने राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सन 2025 आणि शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या उन्हाळी सुट्या सुरू होण्याबाबत पुढील सूचना जारी करण्यात येत आहेत.


1. शुक्रवार, 02 मे 2025 पासून राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


2. राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार चालू असल्यास किंवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविले जात असल्यास, विद्यार्थ्यांना सूट देण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा.


3. पुढील शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवारी बंद राहणार आहेत. 16 जून 2025 रोजी लॉन्च होणार आहे.


4. विदर्भातील जून महिन्यातील तापमान लक्षात घेता, उन्हाळ्याच्या काजळीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, 23 जून 2025 ते 28 जून 2025 या कालावधीत सकाळच्या सत्रात सकाळी 7.00 ते 11.45 या वेळेत सुरू कराव्यात. सोमवार 30.06.2025 पासून नियमित वेळेत सुरू होणार आहे.


वरील सूचना तुमच्या अखत्यारीतील सर्व मान्यताप्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.


पंज


(डॉ. धरम पानझाड)


शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, पुणे.


(शरद गोसावी)


पुणे येथील शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण संचालनालय) एम.आर.


कॉपी:


1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सादर केलेली माहिती.


2. मा.आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, मध्यवर्ती इमारत, पुणे-01 यांना सादर केलेल्या माहितीसाठी.


3. कक्ष अधिकारी (SD-4), शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-32. त्यांना माहितीसाठी सिव्हिल सबमिशन.




Wednesday, April 16, 2025

राज्यात एनसीईआरटी अभ्यासक्रम यावर्षी फक्त १ ल्या वर्गाला! नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन २०२५-२६ पासून टप्प्या-टप्याने! शासन निर्णय.

 

राज्यात एनसीईआरटी अभ्यासक्रम यावर्षी फक्त १ ल्या वर्गाला! नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन २०२५-२६ पासून टप्प्या-टप्याने! शासन निर्णय.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन २०२५-२६ पासून टप्प्या-टप्याने करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय केला आहे. 


राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे एकविसाव्या शतकातील पहिले शिक्षण धोरण आहे. स्वातंत्र्योत्तर काळात १९६४-१९६६ मध्ये कोठारी आयोग व १९८६ मध्ये आलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण यामुळे राज्य व देशातील शिक्षणामध्ये अनेक सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. आता जवळपास ३४ वर्षांनंतर केंद्रिय मंत्रिमंडळाच्या दिनांक २९ जुलै, २०२० रोजीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० ला मंजुरी देण्यात आलेली आहे. या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पूर्वीच्या १०+२+३ या रचनेमध्ये बदल करून ५+३+३+४ याप्रमाणे रचनात्मक बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरांपर्यंतच्या शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. सदर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी सुरु आहे. सर्वांना सहज शिक्षण, समता, गुणवत्ता, परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच मूलभूत स्तंभांवर उभारलेले हे धोरण संविधानिक मूल्यांवर आधारित आहे. तसेच सन २०३० पर्यंत साध्य करावयाच्या शाश्वत विकासाच्या ध्येयांशी हे धोरण जोडले गेलेले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या अंमलबजावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या कार्याच्या अनुषंगाने संदर्भ क्र. ३ येथील दिनांक २४ जून, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. तसेच या शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबलावणी करण्यासाठी संदर्भ क्र. ४ येथील दिनांक १६ जानेवारी, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अ. मु. स. / प्रधान सचिव / सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आंतरविभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे.


राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अनुसार ५+३+३+४ आकृतीबंधातील शिक्षणाचे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षण (ECCE) यावर आधारित पायाभूत स्तर तसेच शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षण या घटकांचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली संदर्भ क्र. ५ येथील दिनांक २४ मे, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीमध्ये संदर्भ क्र. ६ व ७ येथील शासन निर्णयान्वये नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.


राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२२ आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२३ आधारित तयार केलेल्या पुस्तकांचा देशातील २३ राज्यांकडून वापर करण्यात येत आहे. या पाठ्यपुस्तकांची निर्मिती देशभरातील विविध क्षेत्रातील नामवंत, अनुभवी तज्ञ यांच्याकडून करण्यात आली आहे. या पाठ्यपुस्तकांवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाते. देशभरात ही पाठ्यपुस्तके विविध मंडळांच्या शाळांमधून वापरण्यात येतात. मा. मंत्री (शालेय शिक्षण), महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समिती, शिक्षण क्षेत्रातील नामवंत व अनुभवी तज्ञ यांनी साकल्याने विचार करून, महाराष्ट्र राज्यातही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेली इयत्तानिहाय त्या त्या विषयाची पाठ्यपुस्तके टप्प्या-टप्प्याने आवश्यक त्या बदलासह व संदर्भीकरणासह वापरण्याचे निश्चित केले आहे.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२२ वर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४ व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (State Council of Educational Research and Training, Maharashtra), पुणे यांचेमार्फत तयार करण्यात आले आहेत. तसेच, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२३ वर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ तयार करण्यात आला आहे. शालेय शिक्षण अभ्यासक्रम २०२५ ची निर्मिती सुरु आहे.

मा. मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली गठित राज्यस्तरीय सुकाणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४, पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ यांना मान्यता प्रदान केलेली आहे. या दृष्टिने पायाभूत स्तर व शालेय शिक्षण स्तराच्या सर्व उपस्तरांसाठी या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

शासन निर्णय :-

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (State Council of Educational Research And Training. Maharashtra), पुणे यांचेमार्फत तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४, तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ मधील तरतुदी योग्य त्या बदलांसह टप्प्या-टप्प्याने लागू करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

१.

 आकृतीबंध :-

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० प्रमाणे नव्याने तयार झालेले स्तर (५+३+३+४) खालीलप्रमाणे आहेत. राज्यामध्ये या स्तरांची रचना खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.

१. पायाभूत स्तर

(वय वर्षे ३ ते ८)

बालवाटिका-१. २. ३ तसेच इयत्ता १ ली व २ रौ

२. पूर्वतयारी स्तर

(वय वर्ष ८ ते ११)

इयत्ता ३ री, ४ थी व ५ वी

३.

 पूर्व माध्यमिक स्तर

(वय वर्ष ११ ते १४)

इयत्ता ६ वी, ७ वी व ८ वी

४. माध्यमिक स्तर

(वय वर्ष १४ ते १८)

इयत्ता ९ वी, १० वी, ११ वी व १२ वी

यापुढे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या स्तराऐवजी वरीलप्रमाणे पायाभूत स्तर, पूर्वतयारी 

स्तर, पूर्व माध्यमिक स्तर, माध्यमिक स्तर हे शब्द वापरण्यात यावेत.

२. नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी :-

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागांमार्फत सन २०२५-२६ पासून टप्प्या-टप्प्याने पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे.

अंमलबजावणी वर्ष

इयत्ता

सन २०२५-२६

इयत्ता १ ली

सन २०२६-२७

इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ६ वी

सन २०२७-२८

इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी व ११ वी

सन २०२८-२९

इयत्ता ८ वी, १० वी व १२ वी

बालवाटिका १, २, ३ राबविण्याविषयी महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन

 निर्णय निर्गमित करण्यात येईल.

३. भाषाविषयक धोरण :-

सद्यस्थितीत मराठी व इंग्रजी माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत केवळ दोन भाषा अभ्यासल्या जात आहेत. उर्वरित माध्यमांच्या शाळांमध्ये त्रिभाषा सुत्रानुसार मराठी व इंग्रजी भाषा बंधनकारक असल्यामुळे माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जात आहेत.

राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ नुसार यापुढे इयत्ता १ ली ते ५ वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी हो तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता ६ वी ते १० वी करिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल. ४.

अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती व सेतू अभ्यास :-

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० व राज्य अभ्यासक्रम आराखड्यांच्या आधारे राज्याच्या गरजा लक्षात घेऊन राज्यासाठीचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहे. संबंधित स्तराचे अंतिम पाठ्यसाहित्य निर्मितीसाठी बालभारतीस विहित वेळेत उपलब्ध करून देण्यात यावे.

५. 

पाठ्यपुस्तके व पाठ्यसाहित्य :-

राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ मधील तरतुदीनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली पाठ्यपुस्तके, महाराष्ट्र राज्यासाठी आवश्यक असे सर्व बदल करून स्वीकारण्यात यावीत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत नमूद पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असणे, आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारसरणी वाढविण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे, अनुभवात्मक शिक्षण, इत्यादी बाबीचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये असणे आवश्यक आहे.

तसेच मूल्यमापन, अध्यापन पद्धती, वेळापत्रक, निरीक्षण व सनियंत्रण, शिक्षकांचे प्रशिक्षण, इ. सर्वांगीण बाबींमध्ये आवश्यक त्या सुधारणा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत निर्गमित करण्यात याव्यात.

बालभारतीची पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये वेळोवेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संबंधित विभाग प्रमुख व विषय तज्ञ यांचा सहभाग असावा, सदर पाठ्यपुस्तके ही निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्तींची पूर्तता करणारी व अंमलबजावणीसाठी योग्य आहेत किंवा कसे याची पडताळणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी करावी. त्यानंतर सदर अंतिम पाठ्यपुस्तकांना आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समन्वय समितीची मान्यता घ्यावी. राज्यस्तरीय समन्वय समितीचे मान्यतेनंतरच पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करता येईल.

अंमलबजावणी वेळापत्रकानुसार, इयत्तानिहाय पाठ्यपुस्तके आवश्यक सर्व माध्यमांत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांची राहील.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


                         Click here

Tuesday, April 15, 2025

OTT TTMS Online Badali New Update 2025 - जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये संवर्ग दोन बदली नियम बदलणार? शिक्षण मंत्र्यांचे ग्राम विकास मंत्र्यांना पत्र 15/04/2025

 

OTT TTMS Online Badali New Update 2025 - जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये संवर्ग दोन बदली नियम बदलणार? शिक्षण मंत्र्यांचे ग्राम विकास मंत्र्यांना पत्र 15/04/2025

सन २०२५ मध्ये होणा-या जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे बदल होणेबाबत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्र्यांना पुढील प्रमाणे विनंती पत्र दिले आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे बदल व्हावे असे वाटते.

१. सद्या एकत्र असलेले (३० कि.मी. च्या आतील) बदलीपात्र पती-पत्नी शिक्षक यांना तसेच संवर्ग २ मधील शिक्षकांना बदली प्रक्रिया २०२५ मध्ये संवर्ग १ प्रमाणे नकार देण्याची संधी मिळावी, जेणेकरुन बदल्यांची संख्या कमी होईल ही विनंती.

२. या आधीच ३० कि.मी. च्या आतील सदर पती-पत्नी शिक्षकांचा / संवर्ग २ शिक्षकांचा जोडीदार, यंदाच्या बदल्यांमध्ये बदली पात्र असल्यास, संवर्ग-२ प्रमाणे सर्व रिक्त जागा बदली पात्र सर्व शिक्षकांच्या जागा दाखवल्या जाव्यात ही विनंती.

३. पती-पत्नी यांना प्राधान्य देवून त्यांचे शासन धोरणानुसार एकत्रिकरण अबाधित ठेवावे ही विनंती.

४. अवघड क्षेत्र बदली राऊंडमध्ये पती/पत्नी विस्थापित संख्या मोठ्या संख्येने वाढेल या करिता नकाराची संधी द्यावी.

तरी, वरील प्रमाणे जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत बदल होणेबाबत विनंती आहे.


आपला,

(दादाजी भुसे)

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 28 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे नवीन निर्देश दिले आहेत.

उपरोक्त विषयाबाबत आपणांस खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे :-

(अ) जिल्हांतर्गत बदली :-

१) जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन २०२५ करीता, जे शिक्षक दि.३० जून २०२५ रोजी वयाची ५३ वर्षे पूर्ण करीत असतील, अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग-१ अंतर्गत पात्र ठरविण्यात यावे.

२) सन २०२२ मध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत, अशा शाळांमधील ३ वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करुनही सन २०२२-२३ मध्ये बदली झाली नव्हती, अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील अनु. क्र. १.७.२ येथील तरतुदीनुसार सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी.

तसेच या विभागाच्या पत्र क्र. जिपब-११२५/प्र.क्र.१४/आस्था-१४, दि. २८ फेब्रुवारी, २०२५ मधील अनु.क्र. १ येथे नमुद केल्यानुसार सदर शिक्षक टप्पा क्र.७करीता बदली पात्र होणार नाहीत.

३) सर्व जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करावी.

४) अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत टप्पा क्र. ७ राबविण्यात यावा. तथापि, त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा

निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे विहीत तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.

५) पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग-१ मधून बदलीपात्र ठरविण्यात यावे.

(ब) आंतरजिल्हा बदली :-

१) सन २०२५ या वर्षात नविन शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे विभागाच्या दि.२३.८.२०२३ रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील २.८ मध्ये नमुद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातुन बाहेर जाण्याकरीता रिक्त पदांची टक्केवारी १० टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे, ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया २०२४-२५ करीता शिथील करण्यात येत आहे. तथापि, शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापुर्वी नविन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील.

२) आंतरजिल्हा बदलीसाठी दि.३० सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संचमान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविण्यात याव्यात. तसेच सदर संचमान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील, अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुज्ञेय असणार नाही.


आपली, (नीला रानडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन


शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक कराClick here

२०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात दाखल पात्र विद्यार्थी वय किती

 २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात दाखल पात्र विद्यार्थी  वय किती

महाराष्ट्र शासन


प्राथमिक शिक्षण संचालनालय


स्वरित श्री राज्याभिषेक 21 350


सेंट्रल बिल्डिंग, डॉ. ॲनी बेझंटमार्ग, पुणे-411001. फोन-02026125692ई-मेल:- depmah2@gmail.com


जा क्रमांक RTE 25%/2025/801/113


d 10-01-2025


प्रति,


श्री अदिती एकबोटे वरिष्ठ तांत्रिक संचालक, NIC पुणे


विषय :- शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये RTE 25 टक्के ऑनलाइन प्रवेशासाठी मुलाचे वय निश्चित करण्याबाबत.


संदर्भ:- 1. शासन निर्णय क्रमांक RTE-2019/P.No.119/SD-1, दि. 25-07-2019


2. शासन निर्णय क्रमांक RTE-2018/Pro.No.180/SD-1, दि. 18-09-2020.


वरील संदर्भ क्र. 01 च्या शासन निर्णयानुसार सन 2025-26 या शैक्षणिक सत्रातील RTE 25 टक्के शाळा प्रवेशासाठी मुलाचे वय निश्चित करण्याबाबत पुढील सूचना देण्यात येत आहे.


शाळेत प्रवेशासाठी मुलाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दि. दिनांक 18-09-2020 च्या शासन निर्णयानुसार मानविन यांना 31 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. सरकारने किमान वयोमर्यादा निश्चित केली आहे. संबंधित शासनाच्या निर्णयानुसार, पूर्व प्राथमिक आणि इयत्ता 1 च्या शाळा प्रवेशाचे किमान वय खालीलप्रमाणे निश्चित केले आहे.


A.No.



2


प्रवेशाचा वर्ग


किमान वय वर्षे आहे


वय संबंधित अनिवार्य तारीख


प्ले ग्रुप / नर्सरी (इ. 1 ली ते 3री इयत्ता)


3+


31 डिसेंबर


इयत्ता 1ली


६+


31 डिसेंबर


शासन निर्णय दि. 25-07-2019 रोजी शाळा प्रवेशासाठी किमान वयात कमाल 15 दिवसांची सूट देण्यात आली आहे. तथापि, वर नमूद केल्याप्रमाणे, सन 2025-26 साठी RTE 25 टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत त्यानुसार सुधारणा करावी.


(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-01.


माहितीसाठी एक प्रत सादर केली आहे


1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई


2. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे


RTE 25% पत्र

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

           Click here

Monday, April 14, 2025

इयत्ता आठवी व इयत्ता पाचवीच्या निकालाबाबत नवीन नियमावली! शासन निर्णयानुसार इयत्ता पाचवी व आठवीचा निकाल कसा तयार करावा?

 

इयत्ता आठवी व इयत्ता पाचवीच्या निकालाबाबत नवीन नियमावली! शासन निर्णयानुसार इयत्ता पाचवी व आठवीचा निकाल कसा तयार करावा?

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 29 मे 2023 व शासन निर्णय दिनांक 7 डिसेंबर 2023 नुसार इयत्ता पाचवी व आठवीसाठी नापास करण्याचे धोरण जाहीर केले आहे सदर आदेशानुसार इयत्ता पाचवी व आठवी साठी निकालासाठी नवीन नियमावली पुढील प्रमाणे.


> इ. ५ वी ८ वी प्रथम सत्र सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन.


> द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन. वार्षिक परीक्षा द्वितीय सत्र अभ्यासक्रमावर आधारित.


> इ. ५ वी - मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित व परिसर अभ्यास १-२ लेखी परीक्षा ४० गुण तोंडी परीक्षा १० गुण एकूण ५० गुण


> इ.८ वी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र लेखी परीक्षा ५० गुण तोंडी १० गुण एकूण ६० गुण


> इयत्ता ५ वी व ८ वी कार्यानुभव, चित्रकला, शारीरिक शिक्षण प्रचलित सर्वकाश मूल्यमापन श्रेणी देणे


> इयत्ता ५ वी सर्व विषय ५० प्रमाणे एकूण २५० गुण.


> उत्तीर्ण गुण प्रत्येक विषय ३५% प्रमाणे १८ गुण.


> सवलतीचे गुण १० तीन विषयात सवलत. ५ गुण जास्तीत जास्त एका विषयात


> इ. ८ वी सर्व विषय मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र

> एकूण गुण ६०×६ = ३६०


> सवलतीचे गुण १० तीन विषयात ५ गुण जास्तीत जास्त एका विषयात


> प्रगती पुस्तक नाही- कार्ड देणे


> वर्णनात्मक नोंदी करू नये.


> शेरे- उत्तीर्ण / उत्तारीत / अनुत्तीर्ण / पुनर्रपरीक्षेक पात्र.


> परीक्षेस गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल.


> पुनर्रपरीक्षा अनुत्तीर्ण विषयाची पुनर्रपरीक्षा कार्या, शा. शि, चित्रकला पुनर्रपरीक्षा नाही. पुनर्रपरीक्षा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३ दिवस आधी जाहीर करणे. पुनर्रपरीक्षेस सवलतीचे गुण ग्राह्य धरणे. फेरपरीक्षेक गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यास येईल.


वर्ग पाचवी व आठवीच्या सुधारित नवीन निर्देशानुसार नमुना गुणपत्रिका.

Click here

Click here

Click here