google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना इयत्ता १० वी मध्ये ९०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी

Tuesday, May 21, 2024

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना इयत्ता १० वी मध्ये ९०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना इयत्ता १० वी मध्ये ९०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना (शैक्षणिक वर्ष मार्च २०२१ पासून लागू)


इयत्ता १० वी मध्ये ९०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी

पुरस्काराची रक्कम रु.२,००,०००/-

(पुढील दोन वर्षांसाठी प्रती वर्ष रु. १ लक्ष याप्रमाणे)

अधिक माहितीसाठी :

बार्टीच्या https://barti.maharashtra.gov.in/संकेतस्थळावर भेट द्या.

संपर्क : ०२०-२६३३३३३००२०-२६३३३३३९

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे 0. (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) मुख्यालय : २८ क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे ४११००१.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना

सदर योजना शैक्षणिक वर्ष मार्च-२०२१ पासून लागू करण्यात येईल

योजनेचे उद्दिष्ट :-

MH-CET,NEET, JEE, मेडिकल, इ. सारख्या परीक्षेच्या पूर्व तयारी साठी अनुसूचित जातीतील गुणवंत तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे.

शिष्यवृत्तीसाठी अवलंबिण्यात येणारी पद्धत :-

१. इयत्ता १० वी च्या निकालानंतर जाहिरात देऊन विद्यार्थ्यांकडून बार्टी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात चेतील. २. महाराष्ट्र राज्य शिक्षण, CBSE, ICSE विभागाकडून इयत्ता १० वी मध्ये ९०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनुसूचित जातीतील

विद्यार्थ्यांची यादी घेण्यात येईल. ३. संबंधीत पुरस्काराठी निवड झालेल्या विद्यार्थाच्या शाळेच्या मुख्याधापकांना बार्टी मार्फत प्रपत्र पाठवून कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात येईल.


राज्यातील अनुसूचित जातीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य, पुणे, CBSE, ICSE बोर्ड मधून इयत्ता १० वी पास झालेल्या मेरीट लिस्ट मधील बार्टी च्या पुरस्कारसाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील गुणवत्ताधास्क विद्यार्थ्यांना त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करून त्यांच्या बँक खातेबर पुरस्कार रकम RTGS द्वारे अदा करण्यात येईल.

५. सदर योजनेची अंमलबजावणी करताना पालकांना करियर समुपदेशन द्वारे मार्गदर्शन देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्र :-

• विद्यार्थ्यांचा SSC बोर्ड (इ. १०) चे मार्कशीट (प्रमाणित




विद्यार्थ्यांचा SSC बोर्ड (इ.१०) चे शाळा सोडण्याचा दावल (प्रमाणित)
• विद्यार्थ्यांचा / पालकाचा जातीचा दाखला (प्रमाणित) • विद्यार्थ्यांचा रहिवासी दाखला (प्रमाणित)

• विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँक खाते झेरॉक्स प्रत (प्रमाणित)

• विद्यार्थ्यांच्या पालकाचा उत्पन्नाचा दारवला (चालू आर्थिक वर्षातील)  पिवळे शिधापत्रिका धारक (वैकल्पिक) असल्यास प्राधान्य

प्रोत्साहनपर पुरस्कार शिष्यवृत्ती चे निकष :-

• विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी तसेच अनुसूचित जातीतील प्रवर्गातील असणे अनिवार्य.

• सदर प्रोत्साहनपर पुरस्कार शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थीचे पालक दारिद्र्य रेषेखालील किंवा वार्षिक उत्पन्न रकम २,५०,०००/-

(अक्षरी दोन लाख पन्नास हजार रुपये) पर्यंत असणे बंधनकारक आहे.

• सदर योजनेचा लाभ हा मुख्यता त्याच विद्यार्थ्यांसाठी असेल ज्यांचे पालक असंघटीत क्षेत्रात, कमी पगारावर, कंत्राटी पद्धतीने कामे करतात.
SSC बोर्ड, महाराष्ट्र राज्य पुणे (इयत्ता १० वी) मध्ये ९०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे बंधनकारक.

• आई वडील शासकीय नोकरीत असल्यास विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती करीता पात्र राहणार नाही.

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात व यापुढे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हा लाभ देय असेल.

• उत्पन्नाच्या दास्वल्यावर योग्य ती चौकशी करून लाभ देय राहील. उत्पन्नाचा दास्वला खोटा आठळ्यास पुरस्कार रद्द करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क: ०२०-२६३३३३३०/ २६३३३३३९ Website: https://barti.maharashtra.gov.in 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) मुख्यालय : २८ क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे ४११००१






No comments:

Post a Comment