शिक्षकच नव्हे हो, आता तर मुख्याध्यापकही होणार अतिरिक्त
१५० पेक्षा पटसंख्या कमी असू नये : संच मान्यतेच्या नवीन निकषात तरतूद
म्हणजेच जून २०२४-२५ पासून या
तर अतिरिक्त मुख्याध्यापकाचे असे होणार समायोजन
लोकमत न्यूज नेटवर्क तिरोडा : आतापर्यंत आपण शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होतात, हे पाहिले आहे. पण आता शाळेतील मुख्याध्यापक सुद्धा अतिरिक्त झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. संच मान्यतेच्या नवीन निकषात तशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी शासनाने शिक्षण क्षेत्राला वेटीस धरू नये, अशी अपेक्षाही मुख्याध्यापक व शिक्षण तज्ज्ञ करीत आहेत.
शासन निर्णयानुसार पद निश्चिती
■ या आदेशानुसार अतिरिक्त मुख्याध्यापकाचे त्यांच्या संस्थेच्या इतर शाळा असतील व तेथे मुख्याध्यापक पद रिक्त असेल, तर त्याच संस्थेच्या शाळेत समायोजन होईल, जागा रिक्त नसेल तर जिल्ह्यात ज्या शाळेत मुख्याध्यापक पद रिक्त असेल, त्या शाळेत समायोजन होईल. तेथेही जागा रिक्त नसेल तर त्या अतिरिक्त मुख्याध्यापकाला शिक्षक म्हणून समायोजित केले जाईल. म्हणजेच दहा-पंधरा वर्षे जी व्यक्ती मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होती, ती व्यक्ती आता शिक्षक म्हणून आपला उर्वरित
होईल. त्यातील तरतुदीनुसार आता माध्यमिक शाळेतील सर्व वर्गाची विद्यार्थी संख्या जर १५० पेक्षा कमी झाली, तर त्या शाळेतील मुख्याध्यापक अतिरिक्त ठरेल. एका अर्थाने त्या शाळेत मुख्याध्यापक असणार नाही. इंजिनविना ही शैक्षणिक गाडी धावणार. विशेष म्हणजे या शासन निर्णयात यापूर्वीचे या विषयाशी संबंधित म्हणजेच शाळातील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पद मान्यता ठरविणारे म्हणजे २८ ऑगस्ट २०१५, ८ जानेवारी २०१६, २ जुलै २०१६ व १ जानेवारी २०१८ हे चारही शासन निर्णय या नव्या आदेशानुसार अधिक्रमित केले आहेत. अतिरिक्त ठरविण्यासाठी आता सन २०२४-२५ पासून हाच, म्हणजे १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय ग्राह्य धरला जाणार आहे.
१५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संच मान्यतेचा सुधारित निकष या गोंडस नावाचा एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्याच शासन आदेशात मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय होण्यासाठी सुद्धा कलम ४ आणि ४.१ मध्ये काही निकष दिलेले आहेत. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून,
कार्यकाळ घालवेल, ही एक प्रकारची पदावन्नतीच ठरणार आहे.
वेतन मात्र तेच कायम राहणार
मुख्याध्यापक अतिरिक्त ठरेल आणि त्यांच्यावर शिक्षक म्हणून काम करण्याची जवाबदारी आली तरी त्याच्या वेतनास संरक्षण असेल. म्हणजेच शिक्षक म्हणून कार्यरत राहिले तरी त्याला पूर्वी मुख्याध्यापक म्हणून जे वेतन मिळत होते तेच कायम राहील. मात्र, शाळा मुख्याध्यापकाविना कशी चालवायची ही एक तारेवरची कसरतच ठरेल, यात शंका नाही.
No comments:
Post a Comment