Maharashtra Board 10th Result 2024 Date : अखेर प्रतिक्षा संपली, ‘या’ दिवशी लागणार दहावीचा निकाल, अत्यंत मोठी अपडेट
Maharashtra Board 10th Result 2024 Date : नुकताच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जातंय. 27 मे लादहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. यंदाही दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा २७ मे ला केला जाईल. आता विद्यार्थ्यांसह पालकांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागली.
mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
No comments:
Post a Comment