राज्यात पुन्हा आचारसंहिता! मुंबई आणि नासिक शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर!
भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक 24 मे 2024 रोजी जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार मुंबई व नाशिक विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू झाली आहे.
मुंबई आणि नासिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर
निवडणूक कार्यक्रम—
1) उमेदवारी अर्ज भरणे -
31 मे 2024 ते 07 जून 2024
2) अर्ज छाननी - 10 जून 2024
3) उमेदवारी माघारीची अंतिम तारीख - 12 जून 2024
4) मतदान दिनांक - 26 जून 2024
वेळ - सकाळी 8.00 ते सायं. 4.00
5) मतमोजणी - 1 जुलै 2024
सदर परिपत्रकानुसार आजपासून पुन्हा आचारसंहिता लागू झाली असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही कोविड-19 साठीची नियमावली वापरून पूर्ण पाडली जाणार आहे.
परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
No comments:
Post a Comment