राज्य कर्मचारी वेतनत्रुटी निवारण समितीकडे सादर करावयाच्या प्रस्तावाबाबत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.25.06.2024
राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी निवारण करण्यासाठी गठीत समिती 2024 कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित राहण्याबाबत , शासन परिपत्रकांमध्ये नमुद कर्मचारी संघटनांना निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर ग्रामविकास विभागाच्या दिनांक 25 जुन 2024 रोजीच्या शासन परिपत्रकांमध्ये नमुद 08 कर्मचारी संघटनांच्या अध्यक्षांना परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत . या पत्रानुसार राज्य वेतन त्रुटी निवारण समिती 2024 कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अध्यक्ष , वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत विभाग प्रमुख व अधिकारी / कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारित वेळापत्रक देण्यात आले आहे .
सदर पत्रात ग्राम विकास विभागाकरीता दिनांक 02 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 अशी वेळ देण्यात आलेली आहे . तसेच सदर बैठकीच्या वेळी प्रस्तावांच्या अनुषंगाने प्रतिनिधींचे काही म्हणणे समितीच्या समोर मांडायचे असल्यास , योग्य त्या माहितीसह दिनांक 02 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 वाजता मंत्रालय , विस्तार इमारत दुसरा मजला क्र.241 हुतात्मा राजगुरु चौक , मादाम कामा मार्ग , मुंबई 400032 येथे ( यांमध्ये सादरीकरण करायचे असल्यास , आगाऊ कळविण्याचे नमुद करण्यात आले आहेत ) बैठकीस जास्तीत जास्त 4 प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे .
ग्राम विकास विभागांस ज्या संघटनांनी वेतनत्रुटी बाबत निवेदने सादर करण्यात आलेली होती , अशा 08 संघटनांच्या अध्यक्षांना सदर परिपत्रक सादर करुन आपले म्हणणे राज्य वेतन त्रुटी निवारण समिती 2024 कडे सादर करण्यासाठी पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 25 जुन 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
No comments:
Post a Comment