google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: जुनी पेन्शन योजना बाबतची कार्यपद्धती विहित करणेबाबत सा.प्र.विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.27.06.2024

Thursday, June 27, 2024

जुनी पेन्शन योजना बाबतची कार्यपद्धती विहित करणेबाबत सा.प्र.विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.27.06.2024

 

जुनी पेन्शन योजना बाबतची कार्यपद्धती विहित करणेबाबत सा.प्र.विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.27.06.2024





जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागु केलेल्या प्रकरणी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील रक्कमा भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये जमा करण्याची कार्यपद्धती विहीत करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 27 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

दिनांक 05.02.2024 च्या परिपत्रकातील मुद्दा क्र.06 नुसार भा.प्र.सेवा अधिकाऱ्यांच्या प्रान खात्यावरील संचित निधी मागविण्याच्या प्रस्तावास राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने मंजूरी दिल्याच्या नंतर भा.प्र.से.अधिकाऱ्यांच्या केंद्र शासनाकडील सेवेतील नियोक्त्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ तसेच भा.प्र.से अधिकाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ त्यानंतर राज्याच्या सेवेतील नियोक्त्याचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ ..

तसेच भा.प्र.से अधिकाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ अशी तपशिलवार माहिती संबंधित आहरण व संवितरण अधिकारी आणि महालेखापाल कार्यालयास उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच दिनांक 05 फेब्रुवारी 2024 च्या परिपत्रकातील अनु क्र.09 नुसार संबंधित भा.प्र.से.अधिकाऱ्यांचे स्वत : चे अंशदान व त्यावरील लाभ महालेखापाल कार्यालयाने भा.प्र.से अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक , लोकतक्रारी व सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे पत्र क्र.25011 दिनांक 13 जुलै 2023 मधील परिच्छेत 8 अ a व c येथे विहीत केल्याप्रमाणे महालेखापाल कार्यालयाने…

 संबंधित भा.प्र.से अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर जमा रक्कमा व त्यावरील अद्ययावत व्याज याची यथास्थिती पुनर्रचना करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .या संदर्भातील सा.प्र.विभागांकडून दिनांक 27.06.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..


                               Download

No comments:

Post a Comment