केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दि. १. ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविणेबाबत...
केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दि. १. ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविणेबाबत...
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे-४११००१.
E-mail Id:-
directorscheme.mh@gmail.com दूरध्वनी क्रमांक :-०२०/२६१२६७२६/२६१२३५१५
शिसंयो/योजना-३/नभासा/साक्षरता सप्ताह/२०२४-२५/1850 प्रति,
दिनांक-२७/०८/२०२४
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
२. प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व
३. शिक्षणाधिकारी (प्रामिक/माध्यमिक/योजना) सर्व
४. प्रशासन अधिकारी (म.न.पा./न.पा) सर्व
५. शिक्षण निरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर)
विषयः- केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दि. १. ते ८सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविणेबाबत...
संदर्भ:- १. मा. सहसचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक १६/०८/२०२३
२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुबई दि.
१४/१०/२०२२
उपरोक्त संदभर्भीय विषयान्वये, देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्याअनुषंगाने संदर्भ क २ अन्वये, केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत "उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम" सन २०२२-२०२७ या कालावधीसाठी अंमलबजावाणी सुरु करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाकडून "जन-जन साक्षर व राज्य शासनाकडून "साक्षरतेकडून समृध्दीकडे" ही घोषवाक्ये देण्यात आलेली आहेत.
संदर्भ क्र.१ नुसार दि. ८ सप्टेबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात दि. १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये "साक्षरता सप्ताह" रावणिबाबत निर्णय केंद्रशासनाने घेतलेले आहे. त्याअनुषंगाने राज्यामध्ये या निर्णयाची प्रभावी अमंलबजावणी करणेबाबत सूचित करण्यात आलेले आहे. सदर साक्षरता सप्ताह दरम्यान उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा लोगो, घोषवाक्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवावेत. विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्फूतीने भाग घेण्यासाठी उत्पनास नवभारत साक्षरता कार्यक्रम mobile app वर स्व- नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. सदरच्या "साक्षरता सप्ताह" कालावधी मध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वार्ड/गाव/शाळा/महाविद्यालय स्तरावर आयोजित करावयाचे उपक्रम या पत्रासोबत संलग्न करण्यात आलेल्या केंद्रशासनाच्या पत्रामध्ये सविस्तरपणे नमूद करण्यात आलेले आहेत.
उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदरच्या "साक्षरता सप्ताह" कार्यक्रमाची आपल्या व आपल्या अधिनस्त यंत्राणाकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. ज्या गावांमध्ये अद्यापही साक्षरता वर्ग चालू झालेले नाहीत. अशा गावांमध्ये प्राधान्याने क्षेत्रिय यंत्रणांमार्फत भेटी देऊन ८ सप्टेबर २०२४ या साक्षरता दिनी वर्ग सुरु करावेत व असाक्षरांचे अध्ययन-अध्यापन प्रभावीपणे चालू ठेवण्यात यावे. तसेच असाक्षरांच्या FLNT परीक्षेसाठी सराव चाचणीद्वारे तयारी करुन घ्यावी. साक्षरता सप्ताहामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचा प्रचार- प्रसार करावा. साक्षरता वर्गातील अध्ययन-अध्यापनासाठी निपुण भारत अंतर्गत साधरणपणे १००० उपलब्ध FLN व्हिडीओ, दिक्षा पोर्टलवर अपलोड केलेल्या FLN संबंधित व्हिडीओ व उज्जास भाग- १.२.३.४ ची मदत घेण्यात यावी.
शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. सर्व यांनी आपल्या जिल्हयामध्ये दिनाक १ सप्टेबर ते ८ सप्टेबर वा कालावधीत घेण्यात येणा-या विविध उपक्रमाची माहिती निवडक फोटो यासह अहवाल दिनांक १०/९/२०२४ रोजी सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील प्रपत्रामध्ये
directorscheme.mh@gmail.com या email वर न चूकता सादर करावा, जेणेकरुन केंद्रशासनास सदरची माहिती फोटो सादर करणे सोयीचे होईल.
साक्षरता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमांचा दैनंदिन अहवाल खाली दिलेल्या लिंक मध्ये अचूक नांदवावा.
https://forms.ale/CYEpAiY46FJ5shy77
सहपत्र १) संदर्भीय पत्र क्र.
२) अहवाल प्रपत्र
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे,
प्रत माहितीस्तव सादर.
१. मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई,
२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
No comments:
Post a Comment