शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी शिक्षण सेवा पंधरवडा अभियान राबविणेबाबत आदेश
शिक्षण संचालनालय योजना कार्यालयातून निर्गमित दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार राज्यात शिक्षण सेवा पंधरवडा अभियान राबविणे बाबत पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
संदर्भ १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-२०२३/ प्रकर४५/टीएनटी-४, दि.८/९/२०२३. २. या संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंयो/२०२३/शि से.पंधरवडा/ आस्था-कार्या-१/२०६५, दि.६/१०/२०२३
परिपत्रक
शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वच स्तरातील जसे की विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी यांचे तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढणे, शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे, तसेच प्रगत तंत्रज्ञानाच्या वापर करुन गतीमान व पारदर्शक पध्दतीने सेवा विहित कालमर्यादित देणे या उद्देश्याने दिनांक ५ सप्टेंबर पासून पुढील १५ दिवस "शिक्षण सेवा पंधरवडा" या पुढे दरवषी राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संदभांतील संदर्भ १ वरील परिपत्रकान्वये शासनाने दिलेल्या सूचना पहाव्यात.
२/ या सूचनांनुरूप शिक्षण सेवा पंधरवडा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अभियानात अंतर्भुत विविध विदयार्थी-पालकाभिमुख व प्रशासकीय घटकांशी संबंधित कामाच्या निपटा-यासाठी कालबध्द मांहिम आरजून प्रलंबित कामांचा निपटारा शासन निर्देशानुरुप करावयाचा आहे. संचालनालयाच्या स्तरावरुन या संदर्भात संदर्भ २ वरील परिपत्रकानुसार सर्व शिक्षणाधिकारी (योजना) यांना तसेच संबंधित घटकांना सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून यावधी देखील त्याची अंमलबजावणी करावयाची आहे.
या अभियानाच्या यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी करिता आगाऊ व व्यापक अशी प्रसिध्दी सर्व स्तरावर देण्यात यावी. जेणेकरुन या अभियानाचा सर्व घटकांना लाभ घेता येईल,
२. कार्यालयास प्राप्त अर्ज/निवेदने/तक्रारी यावर नियमानुसार कार्यवाही करुन ते निकाली काढावेत ३. सुनावणी ठेवावयाच्या प्रकरणांमध्ये तात्काळ सुनावणीचे आयोजन करण्यात यावे प्रकरण शक्यतो त्याच दिवशी निर्णित करावे,
४. शिक्षण सेवा पंधरवाड़ा अभियान कालावधीत व दर महिन्याच्या ५ तारखेला आयोजित करण्यात येणा- या दिनी प्राप्त अर्ज व निवेदने यावर त्याच दिवशी नियमांचित कार्यवाही करावी व ती निकाली काढावीत. ज्या प्रकरणी सुनावणी घेणे आवश्यक आहे त्या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणीचे आयोजन करावे. तसेच पुढील महिन्याच्या ५ तारखेच्या अगोदर सदर प्रकरण निकाली काढावे,
५. चिविध न्यायालयांमध्ये विभागाची प्रलंबित असलेली प्रकरणे पहाता न्यायालयीन प्रकरणांचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक आहे. ज्या प्रकरणांमध्ये अदयाप शासनाच्या वतीने शपथपत्र दाखल करण्यात आलेले नाही वा न्यायालयात उपस्थित राहीले नाहीत अशा प्रकरणी प्राधान्याने आवश्यक व उचित कार्यवाही कालमयदित करण्याची दक्षता घ्यावी, न्यायालयीन प्रकरणांकरीता नियमन तक्ता तयार करण्यात यावा.
६. सक्षम नियुक्ती प्राधिकारी यांनी अनुकंपा नियुक्ती प्रकरणांचा नियमित आढावा घ्यावा, प्रचलित शासन धोरण व तरतूदी विचारात घेवून वेळीच प्रकरणं निर्णित करावीत. त्याकरिता बिंदुनामावल्या अद्यावत करणे, प्रतिक्षा यादी अद्यावत करणे इत्यादी कार्यवाही प्राधान्याने करण्यात यावी.
७. कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी पांना आपली सेवा च कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यकते नुरुप राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत प्रशिक्षण आयोजित करावे, याबाबतचे कालबध्द नियोजन करुन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे.
८. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार विभागीय चौकशी प्रकरणी विहित कार्यपध्दती अवलंबून कालमर्यादेत कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्याच अनुसरुन विभागीय चौकशी सुरु करण्याचा निर्णय झाल्यानंतर बौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांची नियुक्ती करणे, चौकशी अधिकारी यांचे कडून चौकशी अहवाल प्राप्त करुन घेणे, चौकशी अहवालावर निर्णय घेवून अनुषंगिक आदेश निर्गमित करणणे वा गरजेनुरुप प्रकरण वरिष्ठ कार्यालयास सादर करणे बाबतची कार्यवाही करावी,
१. प्रशासकीय घटक-
(अ) कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळ सेवापुस्तकातील नोंदी अद्यावत ठेवाव्यात. सेवापुस्तकाच्या दुष्यम प्रती साक्षांकित करुन देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच आवश्यकता भासल्यास त्या करिता शिबिराचे आयोजन करण्यात यावे. (ब) नियुक्ती प्राधिकारी/सक्षम प्राधिका-याने आपल्या अधिनस्त मंजूर पदांच्या बिंदु नामावल्या सक्षम प्राधिकारी यांचेकडून प्रमाणित करुन घ्याव्यात. या बाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा.
(क) कार्यालयातील अभिलेख्यांची वर्गवारी करुन अभिलेख कक्षात जतन करण्यासाठी पाठवावयाचे अभिलेख, अभिलेख कक्षात पाठविण्यात यावेत, तसेच अभिलेख कक्षामध्ये असलेल्या अभिलेखाचा जतन कालावधी पूर्ण झाला असाल्यास विहित कार्यपध्दतीनुसार ते निलेखित करण्यात यावेत.
(ड) सर्व कार्यालयामध्ये अभिलेख्यांसंदर्भात सहा गड्डा पध्दतीचा अवलंब करण्यात यावा. सदर कार्यवाही विशेष मोहिम स्वरुपात राबविण्यात यावी पुढील १ महिन्यांमध्ये कार्यवाही पूर्ण करावी. कार्यालय प्रमुखांनी या बाबत नियोजन करुन दैनंदिन आढावा घ्यावा.
(इ) जड वस्तू संग्रह नोंदवहीचे अद्यावतीकरण करणे. कार्यालयातील जडवस्तु संग्रह नोंदवहीतील नोंदी अदयावत करण्यात याव्यात. याबाबतचे आवश्यक ते पडताळणीचे दाखले वरिष्ठ कार्यालयास सादर करावेत. (ई) तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर कार्यक्षेत्रांमध्ये विद्यार्थी, पालक, अधिकारी-कर्मचारी यांचे उपयोगी इतर कोणताही उपक्रम राबवावयाचा असल्यास तो अभियान कालावधीत हाती घेवून राबविण्यात यावा. या बाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयांमार्फत शासनास सादर करण्यात यावा. प्रभावी अंमलबजावणीसाठी बाचनिहाय कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात यावा.
१०. सदर अभियानाच्या यावा. विभाग व जिल्हा स्तरावर अंमलबजावणीचे संनियंत्रण करुन या अभियानाचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. त्याबाबतचा एकत्रित अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे मार्फत शासनास व या संचालनालयास सादर करावा.
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक
शिक्षण संचालनालय (योजना)
महाराष्ट्र राज्य, पुणे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करणे साठी शिक्षण सेवा पंधरवाडा अभियान राबवणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक तत्वज्ञ, आदर्श शिक्षक आणि विचारवंत होते. त्यांचा शिक्षण व राजनितीच्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान व त्यांच्या विद्वत्तेबद्दल त्यांना सन १९५४ साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला होता. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस सन १९६२ पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे आणि या दिवशी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मा. मंत्री (शालेय शिक्षण) महोदयांच्या संकल्पनेस अनुसरुन "शिक्षण सेवा पंधरवडा आयोजित करावयाचा आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वच स्तरातील जसे की विद्यार्थी, पालक, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी यांचे अनेक प्रश्न तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रलंबित आहेत. या कारणासाठी त्यांना संबंधित कार्यालयात वारंवार भेटी द्याव्या लागत आहेत आणि या कारणामुळे त्यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे. त्यांच्या वेळेची बचत व्हावी आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या सेवा विहित कालमर्यादेमध्ये उपलब्ध होणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment