आपल्याला आपल्या शाळेसाठी लोकसहभाग मिळवायचा आहे मग त्वरित नोंदणी करा विद्यांजली पोर्टलवर!!
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था बुलढाणा दिनांक 29 जुलै 2022 रोजी काढलेल्या एका पत्रानुसार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या मध्ये त्यातील लक्ष साध्यतेच्या दृष्टिकोनातून लोक सहभागाचा तसेच खाजगी क्षेत्राचा सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केली आहे. याकरिता विद्यांजली 2.0 पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यांजली 2.0 अ वॉलेंटियर मॅनेजमेंट प्रोग्राम हा कार्यक्रम शाळांकरिता साह्यभूत असून या दृष्टीने शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली द्वारा सदर कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आले आहेत शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी लोकसहभागाची अत्यावश्यक भूमिका आहे विद्यांजली 2.0 हे देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनाचे एकत्रीकरण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुद्धा शालेय शिक्षण प्रणाली मध्ये लोकसहभागाचे महत्त्व देखील नमूद केले आहे.
शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकसभा आणि स्वयंसेवी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालयाने एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली विद्यांजली 2.0 विकसित केली असून या कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला मानधन न घेता सेवा प्रदान करू शकतात तसेच शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात.
कृतिशील जेष्ठ नागरिक माजी विद्यार्थी स्थानिक समुदायातील व्यक्ती शिक्षित स्वयंसेवक निवृत्त वैज्ञानिक शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी सशस्त्र दलातील व्यक्ती गृहिणी साक्षर व्यक्ती हे शाळेच्या विनंतीनुसार स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात तज्ञता क्षेत्र योगदान सेवा कृती मालमत्ता साहित्य उपकरणे प्रशासक या क्षेत्रामध्ये आपली सेवा प्रदान करू शकतात.
तद अनुषंगाने आपल्या अधिनिस्त असणाऱ्या पर्यवेक्षेयंत्रणेतील क्षेत्रीय अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व कार्यक्षेत्रात तीन स्वयंसेवी संस्था यांना..

https://vidyanjali.education.gov.in
या वरील विद्यांजली कार्यक्रमाच्या पोर्टलवर जाऊन शाळांची नोंदणी करणे बाबत अवगत करण्यात यावी या संदर्भात अधिक माहितीसाठी पत्रासोबत जोडलेल्या मसुदाचे सखोल अवलोकन करण्यात यावे.
असे निर्देश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.
विद्यांजली वेब पोर्टल बद्दल सविस्तर माहिती.
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन इ पी 2020 मध्ये त्यातील लक्ष साध्यतेच्या दृष्टिकोनातून लोकसहभागाच्या तसेच खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केली आहे. विद्यांजली टू पॉईंट झिरो हॉलांड इयर मॅनेजमेंट प्रोग्राम हा कार्यक्रम शाळांकरिता सहाय्यभूत असून यादृष्टीने शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली द्वारा सदरील कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आले आहेत.
शालेय शिक्षणाचा दर्जा वाढण्यासाठी लोकसभागाची अत्यावश्यक भूमिका आहे. विद्यांजली 2.0 हे देशभरातील दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांची एकत्रीकरण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुद्धा शालेय शिक्षण प्रणालीमध्ये लोकसहभागाचे महत्त्व देखील नमूद केले आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकसभा आणि स्वयंसेवी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालयाने एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली विद्यार्थ्यांनी 2.0 विकसित केली असून या कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला मानधन न घेता सेवा प्रदान करू शकतात तसेच शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात.
कृतिशील जेष्ठ नागरिक माजी विद्यार्थी स्थानिक समुदायातील व्यक्ती शिक्षित स्वयंसेवक निवृत्त वैज्ञानिक शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी सशस्त्र दलातील व्यक्ती गृहिणी साक्षर व्यक्ती हे शाळांच्या विनंतीनुसार स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात. तज्ञता क्षेत्र योगदान सेवा कृती मालमत्ता साहित्य उपकरणे प्रशासक या क्षेत्रातील आपली सेवा प्रदान करू शकतात.
योगदानाच्या अटी व शर्ती.
सेवा व कृती योगदान:
सामान्य स्तरावरील सेवा कृती (जेनेरिक लेवल सर्विसेस अँड ऍक्टिव्हिटीज)
विषय अध्यापनात सहकार्य, कला, कार्यानुभव, योग, क्रीडा, भाषा, व्यवसायिक कौशल्य यांच्या अध्यापन करणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापनास सहकार्य करणे, योग शिक्षणात सहभाग, व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पौष्टिक आहार मार्गदर्शन.
प्रायोजकत्व स्वरूपातील सेवा कृती (स्पॉन्सरशिप सर्विसेस अँड ऍक्टिव्हिटी)
प्रशिक्षित समुपदेशक विशेष शिक्षण तज्ञ शारीरिक मानसिक स्वास्थ्य यातील समुद्रदेशक वैद्यकीय शिबिरे कला क्रीडा उपक्रम आरोग्य आणि स्वच्छता स्त्रोत शालेय भौतिक कामकाजासाठी अतिरिक्त मनुष्यबळ विद्यार्थ्यांसाठी तज्ञ शिक्षकांद्वारे उपचारात्मक अध्यापन दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिबिरे मुलांसाठी संरक्षण प्रशिक्षण इत्यादी बाबींचे प्रायोजकत्व स्वीकारणे.
मालमत्ता साहित्य उपकरणे योगदान:-
खाजगी साहित्य, वीज साहित्य, डिजिटल साहित्य, वर्गातील साहित्य, खेळ, योगा, आरोग्य व सुरक्षा साहित्य, अध्ययन अध्यापन साहित्य, देखभाल दुरुस्ती, कार्यालयीन स्टेशनरी, सेवा सहाय्य, गरजा नुरूप साहित्य, विज्ञान प्रयोगशाळा, कला व कार्यानुभव कक्ष, माहिती तंत्रज्ञान कक्ष, व्यवसाय मार्गदर्शन कक्ष, संरक्षण भिंती व प्रवेशद्वार, पिण्याच्या पाण्याची सुविधा व पाण्याची टाकी, स्वच्छतागृहे, खेळाच्या साहित्याने सुसज्ज मैदानी, रॅम, ग्रंथालय, आधुनिक स्वयंपाक गृहे, निवासी वस्तीगृहे, निवासी खोल्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग रचना तसेच स्थानिक कार्यालयीन गरजा.
रोख रकमेच्या स्वरूपात कोणतीही आर्थिक सहाय्य शाळांना स्वीकारता येणार नाही.
मागणी केलेली सेवा साहित्य प्राप्त झाल्यास शाळा त्यांची विनंती क्लोज करू शकतात.
मागणी केलेल्या सेवा साहित्यापेक्षा अतिरिक्त साहित्य किंवा सेवा देण्यास स्वयंसेवक किंवा संस्था तयार असल्यास सदर शाळा दुसऱ्या शाळेची शिफारस करू शकतात किंवा सेवा साहित्य मागणीपेक्षा कमी प्राप्त झाल्यास सदर शाळा ही इतर स्वयंसेवक किंवा संस्था यांना मागणी करू शकतात.
विविध घटकांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या:
1) शाळा:
विद्यांजली 2.0 पोर्टलवर शाळा यु-डायस व नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरून नोंदणी करू शकतात.
शाळांना आवश्यक असणाऱ्या सेवा साहित्य सुविधा यांची पोर्टलवर यादी अपलोड करावी लागेल.
इच्छुक स्वयंसेवक संस्था यांची निवड करताना त्यांचा अनुभव पात्रता साधनांचा दर्जा या गोष्टी विचारात घेण्यात याव्या.
स्वयंसेवक संस्था यांची ऑनलाइन किंवा समक्ष सभा घेऊन त्यांच्या उपलब्ध वेळ व साह्याबद्दल निर्णय घ्यावा.
शाळांनी संबंधित स्वयंसेवक संस्था यांचे कागदपत्रे पार्श्वभूमी तज्ञत्व हे तपासून घेणे आवश्यक आहे उपरोक्त बाबींची पूर्तता केल्यानंतर शाळांनी स्वयंसेवक संस्था यांचे बरोबर करार करावा तथापि सदर करार विद्यांजली 2.0 पोर्टलचा भाग असणार नाही.
संबंधित स्वयंसेवक संस्था यांनी कोणत्याही प्रकारचे मानधन निधी वेतन देय असणार नाही फक्त शाळा त्यांना योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊ शकते मात्र या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी अथवा अन्य कोणत्याही प्रयोजनात याचा लाभ घेता येणार नाही याची दक्षता घ्यावी.
शाळा अथवा शालेय प्रशासन आणि संबंधित स्वयंसेवक संस्था यांच्या पार्श्वभूमीची पडताळणी करून त्यांच्या क्षमतांचे मूल्यांकन अवलंबून करावे भविष्यात याबाबतीत काही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शाळा अथवा शालेय प्रशासनाची राहील.
2) स्वयंसेवक/स्वयंसेवी संस्था:
स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्थांनी विद्यांजली 2.0 वेब पोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणी करत असताना मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी प्रोफाइल मध्ये नमूद करणे अनिवार्य आहे.
स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्था पोर्टलवरून शाळांच्या गरजांची माहिती घेऊ शकतात त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या सेवा व योगदानुसार राज्य जिल्हा तालुका पातळीवरील शाळा ते पोर्टलवरून निवडू शकतात.
स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्था यांनी योगदान देण्यासाठी शाळांची निवड केल्यानंतर संबंधित शाळेकडे सेवा देण्यासंदर्भात सहमती दर्शवू शकतात.
स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्था यांना शाळांनी चर्चेसाठी बोलावल्यास उपस्थित राहून आवश्यक प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्था त्यांच्या योगदाना संदर्भात त्यांना आलेल्या अनुभवाबाबत शाळेला आदान प्रदान करू शकतात तसेच शाळा सुद्धा त्यांच्या सेवा व योगदानाच्या दर्जाबाबत स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्था यांना अभिप्राय देऊ शकतात.
सेवा घेऊ इच्छिणाऱ्या शाळांनी संपूर्ण प्रक्रियेदरम्यान नोंदणी सभेची पूर्व सूचना सेवेची निश्चिती याबाबत वेळोवेळी अद्यावत सूचना संबंधित स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्था यांना देणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment