google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: October 2024

Wednesday, October 30, 2024

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची गरज नाही! अधिकृत आदेश

 

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची गरज नाही! अधिकृत आदेश

नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक  महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयात निर्गमित दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजीच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त सर्व व जिल्हाधिकारी सर्व यांना शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.

१) मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचे जनहित याचिका क्रमांक ५८/२०२१ वरील न्यायालयीन आदेश.

२) महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभागाकडील अधिसूचना क्र. मुद्रांक २००४/१६६३/प्र.क्र४३६/म-१ दि.०१/०७/२००४.

३) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक ७२ दि.१४/१०/२०२४.

उपरोक्त संदर्भ क्र.१ च्या आदेशान्वये जनहित याचिका ५८/२०२१ मध्ये मा. उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांनी खालीलप्रमाणे सुचना केलेल्या आहेत. संदर्भ क्र.३ अन्वये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे परिशिष्ठ एक मधील अनुच्छेदामध्ये सुधारणा करण्यात आली असून अनुच्छेद क्रमांक ४, ५, ८, ९, २७, ३०, ३८, ४४, ५०, ५२, ५८ मध्ये रु.१००/- किंवा रु. २००/- ऐवजी रु.५००/- मुद्रांक शुल्क करण्यात आले आहे.

मा. उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे संदर्भ क्र.१ चे आदेशानुसार शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्र सादर करतांना नागरिकांकडून मुद्रांकाचा आग्रह करु नये असे स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच ई-सेवा केंद्रामध्ये नागरीकाकडून सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी रुपये १००/- चे स्टॅम्प पेपरची मागणी करीत असतात. दिनांक १४/१०/२०२४ चे शासन निर्णयानुसार ई-सेवा केंद्रामध्ये पक्षकाराकडून रुपये ५००/- चे स्टॅम्प पेपरची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय कार्यालय तसेच न्यायालयासमोर दाखल करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ केलेले असल्याने या संदर्भात आपल्या अधिपत्याखाली असलेले उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना मार्गदर्शन करण्यात यावे.

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



Tuesday, October 29, 2024

राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांत वैद्यकिय आपत्कालिन परिस्थितीत अनुसरावयाच्या कार्यपध्दीतीबाबत शासन निर्णय 29/10/2024

 

राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांत वैद्यकिय आपत्कालिन परिस्थितीत अनुसरावयाच्या कार्यपध्दीतीबाबत शासन निर्णय 29/10/2024


राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांमध्ये दररोज किमान सहा ते सात तास विद्यार्थी उपस्थित असतात. या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. अशा वेळी शाळेच्या नजीक वैद्यकीय सुविधा असेलच असे नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत शाळा प्रशासनाने समयसूचकता दाखवून तातडीने आवश्यक कार्यवाही केल्यास विद्यार्थ्याला वैद्यकीय मदत मिळून अप्रिय घटना टाळता येतील. विद्यार्थ्यांना तात्काळ वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी सहका-यांनी त्याबाबतीत नेहमी सजग असणे आवश्यक आहे. उपरोक्त बाबींचा विचार करता सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना तातडीच्या काळात वैद्यकीय सुविधा देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

. शाळेमध्ये प्रथमोपचाराकरीता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात.

२. शाळांत संबंधित प्राधिकरणांच्या मानकांनुसार तातडीने प्रथमोपचाराकरीता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी First aid/sick room याकरीता खोली उपलब्ध असावी.

३. शाळेत आवश्यकतेनुसार प्रथमोपचार पेट्या (Frst Aid Kit) ठेवाव्यात. ४. शाळेतील विद्यार्थी / कर्मचाऱ्यांकरीता दरवर्षी कमीत कमी एक वैद्यकीय प्रथमोपचार प्रशिक्षण व वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात यावे.

५. सदर शिबिरामध्ये कृत्रिम श्वासोश्वास (Artificial Respiration), कृत्रिम वायुजिवन (CPR- Cardiopulmonary Resuscitation) व इतर तातडीचे प्रथमोपचार देणेबाबत त्यांना प्रशिक्षिण देण्यात यावे. शाळेच्या नजीक उपलब्ध असलेल्या शासकीय रुग्णालये, शासकीय आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाने आणि शासकीय व सार्वजनिक रूग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्यात यावेत व त्यांचेशी समन्वय ठेवण्यात यावा.

७. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शाळेत आवश्यकतेनुसार समन्वयक नेमण्यात यावेत.

८. आपत्कालीन परिस्थितीत सदर समन्वयकांने रुग्णास तात्काळ उपचार मिळण्याच्या दृष्टीने रुग्णालयांशी संपर्क साधावा व आजारी विद्यार्थ्यांस रुग्णालयात भरती करण्यात मदत करावी. ९. शाळेने नजीकच्या दवाखान्यांशी तसेच जवळपासच्या डॉक्टरांशी On-call सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत सामंजस्य करार करावेत व विद्यार्थ्यांना गरजेनुसार डॉक्टर On-call सुविधा उपलब्ध करुन द्यावी

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.




YCMOU B. Ed Admission Process Update - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ च्या प्रवेश कागदपत्र पडताळणी वेळापत्रक सूचना अधिकारपत्र

 

YCMOU B. Ed Admission Process Update - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ च्या प्रवेश कागदपत्र पडताळणी वेळापत्रक सूचना अधिकारपत्र



बी.एड (सेवांतर्गत) प्रवेशेच्छूक अध्ययनार्थीना प्रवेश अर्ज कागदपत्र पडताळणी संदर्भातील सूचना

 नमस्कार,

सर्व बी.एड. प्रवेशेच्छुक अध्ययनार्थीना कळविण्यात येते की, आपण बी.एड. प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारे, उमेदवारांच्या जिल्हानिहाय कागदपत्र पडताळणी याद्या (Documents Verification List) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. ज्या जिल्ह्यातून आपण अर्ज केला आहे, त्या जिल्ह्याच्या प्रवेश अर्ज व कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या नियोजित तारखेला आपण मूळ कागदपत्र व एका छायांकित प्रतीच्या संचासह सकाळी ठीक १०.०० वा. त्या-त्या जिल्ह्याच्या विभागीय केंद्रावर उपस्थित रहावे.

दिव्यांग उमेदवारांना स्वतः उपस्थित राहता येत नसल्यास, अन्य व्यक्तीला तसे अधिकार पत्र देऊन आपल्या मूळ कागदपत्रांसह अर्ज व कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित विभागीय केंद्रावर नियोजित दिवशीच पाठविणे बंधनकारक आहे. बी.एड. प्रवेश २०२४-२६ तुकडीसाठी अनुभवाची अंतिम दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

कागदपत्रे पडताळणीसाठी पुढील सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक/अनिवार्य आहे. १) बी.एड. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या प्रवेशेच्छुकांनी माहितीपुस्तिकेतील 'परिशिष्ट २' आणि ऑनलाइन प्रवेश अर्जासह कागदपत्र पडताळणीसाठी विभागीय केंद्रावर नियोजित दिवशी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

२) उमेदवाराने आपल्या प्रवेश अर्जाची छापील प्रत व प्रवेश अर्ज भरतेवेळी वापरलेला User Id व Password आणावा, त्याशिवाय आपल्या अर्जाची पडताळणी होणार नाही.

३) ऑनलाईन प्रवेश अर्ज व कागदपत्रांची पडताळणी केलेले बी.एड. प्रवेश अर्ज, सन २०२४-२६ तुकडीसाठीची गुणवत्ता यादीसाठी व प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील.

४) विभागीय केंद्रामार्फत बी.एड. प्रवेश अर्ज पडताळणी (Documents Verification) न करणारे उमेदवार सन २०२४-२६ तुकडीच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद होतील.

५) प्रवेश अर्ज पडताळणी करताना उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी समितीला प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीचे मूळ पुरावे सादर करणे बंधनकारक असेल. (पुरावे सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यात कोणत्याही स्वरूपाच्या नवीन माहितीची भर घातली जाणार नाही.) याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

६) विभागीय केंद्रावर प्रवेश अर्ज पडताळणी दरम्यान शांतता राखावी. कोणत्याही प्रकारचा गोंधळ गोंगाट निर्माण होणार नाही, याची काळजी घेवून समितीला पूर्णपणे सहकार्य करावे.

७) कागदपत्र पडताळणी समिती कक्षात फक्त उमेदवारांनाच प्रवेश करता येईल. उमेदवारांशिवाय अन्य नातेवाईकांना पडताळणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

८) उमेदवारांनी प्रवेश समितीवर कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी, जबरदस्ती, मारहाण, अपशब्द वापर, वाद घालणे, दस्तऐवज चोरणे, सरकारी कार्यालयात गोंधळ अथवा अनधिकृत जमाव केल्यास भारतीय दंड संहितेनुसार

(IPC) कार्यवाहीस पात्र राहतील याची नोंद घ्यावी.

९) अर्ज पडताळणी शक्यतो यादीत दिलेल्या क्रमाने करण्यात येईल. परिस्थितीनुसार विभागीय संचालक त्यात बदल करु शकतील व तो बदल सर्व उमेदवारांना बंधनकारक असेल.

१०) प्रवेश अर्ज कागदपत्रे पडताळणीसाठी समिती असेल. ती समिती प्रत्येक प्रवेशार्थीची वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती, शैक्षणिक अर्हता, शिक्षक म्हणून नियुक्ती आदेश, अध्यापनाचा एकूण सेवा अनुभव व समांतर / सामाजिक आरक्षण इ. तपशीलासंदर्भात सर्व माहिती उमेदवाराने सादर केलेल्या मूळ कागदपत्रांच्या आधारे तपासणी करतील. त्या संदर्भातील सर्व मूळ कागदपत्रे व एक फोटोकॉपी (छायांकित) संच ठेवावा. फोटोकॉपी (छायांकित) संच, तुमचा प्रवेश अर्ज तपासणी नंतर तुमच्या ऑनलाईन प्रवेश अर्जासोबत समितीकडे द्यावयाचा आहे

११) जर आपण आपल्या जिल्ह्याच्या दिनांकाला कागदपत्र पडताळणीसाठी वैद्यकीय, तांत्रिक व शासकीय कारणामुळे उपस्थित राहू शकणार नसाल, तर आपले मूळ कागदपत्रासह व आपण कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या अधिकार पत्रासह आपले अधिकार प्राप्त व्यक्तीला संबंधित दिनांकाच्या दिवशी विभागीय केंद्रावर मूळ कागदपत्रासह उपस्थित राहून आपल्या कागदपत्रांची पडताळणी करता येईल, मात्र याची सर्वस्वी जबाबदारी आपली स्वतःची असेल, याची नोंद घ्यावी.

अपेक्षित कागदपत्रे :

(क) ऑनलाईन संगणकीय मूळ अर्जाची प्रत.

ख) शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या मूळ व सत्यप्रती

(ग) प्रवेश अर्जात नोंद केल्याप्रमाणे प्रत्येक शाळेतील सुरूवातीपासून पुढील सर्व नेमणूकीच्या आदेशांच्या मूळ व प्रमाणित सत्यप्रती अनुभवाचे दाखले.

(घ) मागासवर्गीय असल्यास पुढे नमूद केल्याप्रमाणे मूळ प्रत व प्रमाणित सत्यप्रत-

* अनुसूचित जाती (SC) -

जातीचा दाखला

• अनुसूचित जमाती (ST) जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र

• विमुक्त जमाती भटक्या जाती इतर मागासवर्गीय/विशेष मागासवर्गीय (VJ/NT/OBC/SBC) जातीचा दाखला, ऑनलाईन संगणकीय अर्जात नमूद केलेल्या नावाचे वैध कालावधीचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र,

* आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रवर्गाच्या उमेदवारांना शासन नियमानुसार वेळोवेळी निर्देशित केलेली प्रमाणपत्रे / दाखले / दस्ताऐवज. 

* SEBC साठी सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र,

(च) उमेदवाराने प्रवेश अर्ज कागदपत्रे तपासणी करताना (माहितीपुस्तिकेतील परिशिष्ट क्र. २) आपण केलेल्या सेवेचा तपशील वरील तक्त्यात भरून प्रवेश अर्जासोबत जोडावा.

(छ) बी.एड. प्रवेश अर्ज कागदपत्रे पडताळणी करताना बी.एड. प्रवेश माहितीपुस्तिकेतील दिलेल्या महानगरपालिका आयुक्त / गट शिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी / जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी / मुख्याध्यापक / संस्था प्रमुख आश्रम शाळा असल्यास प्रशासन अधिकारी यांनी प्राथमिक शिक्षकांना दिलेले शिफारस प्रमाणपत्र पडताळणीस येताना प्रत्येक उमेदवारांनी भरून आणणे अनिवार्य आहे. त्याची फोटो प्रत ग्राह्य रली जाणार नाही. (माहितीपुस्तिकेतील परिशिष्ट क्र.-४)) जन्मतारखेचा पुरावा (ज दर्शविणारी कोणत्याही प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत.

(झ) सर्व सेवेचे नेमणूक आदेश, शिक्षणाधिकारी/शिक्षण उपसंचालक यांच्या शिक्षक किंवा पदमान्यता पत्राच्या सर्व साक्षांकित प्रती, शाळा मान्यता पत्र.

सुरूवातीपासूनच्या (ण) शाळा अनुदानित असेल तर वर्षनिहाय शाळा तपासणी अहवालाच्या साक्षांकित प्रती.

(ट) सेवापुस्तिकेतील संबंधित नोंदी (संपूर्ण सेवापुस्तिकेची साक्षांकित केलेली फोटोकॉपी)

(ठ) नावात बदल असल्यास नाव बदल पुरावा म्हणून राजपत्र.

महत्वाचे :

आपण नोंदवलेल्या अध्यापन अनुभवाचा पुरावा म्हणून आपली मूळ सेवापुस्तिका/सेवा ऑर्डर/इन्स्पेक्शन रिपोर्ट इ. पैकी किमान एका मूळ दस्ताऐवजाची प्रत तुमच्याकडे असणे बंधनकारक आहे समितीला मूळ कागदपत्र तपासताना शंका निर्माण झाल्यास, त्या मुद्यांसंदर्भात दुसऱ्या पुराव्याची मागणी समिती करेल. त्यावेळी तात्काळ तुम्ही तो सादर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सेवा पुस्तिका व सेवा आदेशाच्या सर्व प्रती सोबत ठेवाव्यात. ११) आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या उमेदवाराकडे शासन नियमानुसार जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र व ना सायस्तर (नॉन क्रिमीलेयर) दाखला इ. शासन नियमानुसार आवश्यक ते दस्तऐवज असणे बंधनकारक आहे.

● १२) सामाजिक आरक्षणासंदर्भात लाभ घेणाऱ्या उमेदवारांकडे खालील पुरावे असावेत.

* दिव्यांग : दिव्यांग असल्याबाबतचे शासन निर्णयानुसार सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र (जिल्हा शल्य चिकित्सक)

* प्रकल्पग्रस्त : जिल्हा पुनर्वसन अधिकारी/सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकारी प्रमाणपत्र, परंतु त्या प्रमाणपत्रात उमेदवाराचे नाव असणे आवश्यक,

* आपत्तीग्रस्त : उपविभागीय अधिकारी/तहसिलदार यांचे प्रमाणपत्र, परंतु त्या प्रमाणपत्रात उमेदवाराचे नाव असणे आवश्यक.

* स्वातंत्र सैनिक पाल्य : सैनिकाचा पत्नी/मुलगा/अविवाहित मुलगी यांनी स्वातंत्र सैनिकाच्या ओळखपत्राची प्रत

व पाल्याच्या नातेसंबंधाचा पुरावा. * आजी/माजी सैनिक पाल्य सैनिकाची पत्नी/मुलगा/अविवाहित मुलगी यांनी जिल्हा सैनिक बोर्डाचे प्रमाणपत्र आवश्यक नातेसंबंधाचा पुरावा, डिस्चार्ज पुस्तक आवश्यक. * विधवा : महानगरपालिका/नगरपालिका/ग्रामपंचायत यांच्याकडून प्राप्त झालेले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र.

* घटस्फोटीता: विवाहनोंदणी दाखला किंवा न्यायालयाचे घटस्फोटाबाबतचे आदेश किंवा मुस्लीम महिलांच्या बाबतीत नियमाप्रमाणे निकाह लावणारे काझी/इमामांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र. ते प्रमाणपत्र नोटरी करून मराठी भाषेत भाषांतर करून आणणे आवश्यक.

* गोवा, बेळगाव, बिदर हा मराठी भाषिक प्रदेश असल्याने या उमेदवारांनी नियुक्ती आदेश व अनुभवाचे दाखले हे मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेत आणावे व त्यावर संबंधित अधिकारी/मुख्याध्यापकाची सही व शिक्का आणणे अनिवार्य आहे. प्रवेश अर्ज पडताळणी वेळी वरील मूळ व साक्षांकित प्रमाणपत्राआधारे आपल्या प्रवेश अर्जातील माहितीची सत्यता पडताळून पाहण्यात येईल. त्यामुळे उपरोक्त आवश्यक ती कागदपत्रे तुमच्या जवळ नसल्यास,

ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यात येतील,

१३) प्रवेश अर्जातील कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर पुढील प्रवेश सूचना विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध

करण्यात येतील. त्या सूचना पाहणे व त्याप्रमाणे कार्यवाही करणे ही उमेदवारांची जबाबदारी राहील.

१४) अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी विद्यापीठ संकेतस्थळाला भेट देत राहावी व अधिक माहितीसाठी बी. एड. माहितीपुस्तिका वाचावी.

१५) कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर, आपल्याला पुढीलपैकी दोन अध्यापन पद्धर्तीची निवड करावयाची आहे, ती समिती सदस्यांना सांगावयाची आहे. त्यांनी अध्यापन पद्धतीची योग्य नोंद केलेली आहे का ? ह्याची खातरजमा करण्याची जबाबदारी प्रवेशार्थीची असेल.


१) EDU 405 : मराठी

२) EDU 406 : हिंदी

३) EDU 407 : इंग्रजी

४) EDU 408 : संस्कृत

५) EDU 409 : इतिहास

६) EDU 410 : भूगोल

७) EDU 411 : गणित

८) EDU 412 : विज्ञान

९) EDU 413 : अर्थशास्त्र

१०) EDU 414 : हिशोबशास्त्र


संचालक,

शिक्षणशास्त्र विद्याशाखा

संचालक, 

विद्यार्थी सेवा विभाग


Friday, October 25, 2024

YCMOU B. Ed Admission Process Update - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ च्या प्रवेश कागदपत्र पडताळणी

 

YCMOU B. Ed Admission Process Update - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ च्या प्रवेश कागदपत्र पडताळणी


सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ च्या प्रवेश कागदपत्र पडताळणीच्या वेळी परिशिष्ट- ४ सादर करणेबाबत.


सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ साठीची कागदपत्र पडताळणी ही विभागीय केंद्रावर जिल्हानिहाय आयोजित करण्यात आलेली आहे. बी.एड. प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्र पडताळणीस येतांना सर्व उमेदवारांनी बी.एड. माहितीपुस्तिका २०२४-२६ पान क्र. ३१ वरील 'परिशिष्ट ४' हे संबंधित सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी व शिक्यानिशी भरून आणणे आवश्यक आहे. त्याशिवाय कागदपत्र पडताळणी व सेवा पडताळणी केली जाणार नाही. त्या संदर्भात कोणत्याही उमेदवारास मुदतवाढ दिली जाणार नाही.

कृपया याची नोंद घ्यावी.


संचालक,

विद्यार्थी सेवा विभाग

संचालक,

शिक्षणशास्त्र विद्याशाखा

Download

Thursday, October 24, 2024

Ycm Bed प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता यादी जाहीर

 

YCM OPEN UNIVERSITY ADMISSION यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया गुणवत्ता यादी जाहीर




बी.एड. विशेष शिक्षण (P21) -2024-27 तुकडी प्रवेश

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक ज्ञानगंगोत्री, नाशिक

Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik

Dnyanga Dnyangangotri, Nashik (Maharashtra) India

• संकेतस्थळ Website: ycmou.ac.in ycmou.digitaluniversity.ac

नोंदणी कक्ष / Registration Department

जा.क्र.यचममुवि/नोंदणी/2024/239

दिनांक: 22.08.2024

सूचनापत्रक क्र. 4/2024-25

बी.एड. विशेष शिक्षण (P21) -2024-27 तुकडी प्रवेश

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2024-27 या तुकडीसाठी बी.एड. विशेष शिक्षण शिक्षणक्रम (HI, VI &ID) (P21) या शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश सुरू होत आहे.

अ.क्र.
1. तपशील
• मुदत - ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत

दिनांक 23.08.2024 ते दिनांक 11.09.2024 पर्यंत (रात्री 11.59 पर्यंत)

1) ज्या विद्यार्थ्यांना या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या 
🌐👉LINK👈 या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहिती पुस्तिका) 2024-25 या ठिकाणी या शिक्षणक्रमाची माहिती पुस्तिका उपलब्ध आहे.

2) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

उपकुलसचिव नोंदणी कक्ष

संचालक
विद्यार्थी सेवा विभाग

                  District wise list