General Election Vidhansabha 2024 Duty Update - निवडणूक काळात रजा नाही! वैद्यकीय रजेवर गेले तर त्याची तपासणी वैद्यकीय मंडळाकडून! कडून
निवडणूक कालावधीत कोणालाही वैद्यकीय रजेवर जाता येणार नाही आणि वैद्यकीय रजेवर गेले तर त्याची तपासणी वैद्यकीय मंडळ यवतमाळ कडून होईल मा. विभागीय आयुक्त अमरावती यांचे पत्र पुढील प्रमाणे
.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अमरावती / अकोला / यवतमाळ / वाशिम / बुलढाणा
विषयः - निवडणूक कालावधीत वैद्यकीय रजेबाबत..
माझे असे निदर्शनास आले आहे की, निवडणूकीच्या कालावधीत काही निवडणूकीशी संबधित अधिकारी हे वैद्यकीय कारणास्तव रजेचे अर्ज सादर करतात. निवडणूक कालावधीतील जबाबदारीची आणि कालमर्यादीत कर्तव्ये पाहता कुणालाही सबळ कारणाशिवाय रजा देणे योग्य नाही. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव अर्ज सादर केलेल्या प्रकरणात संबधित अधिकाऱ्यांची त्वरीत शासकीय वैद्यकीय मंडळामार्फत वैद्यकीय तपासणी करुन ते खरोखर शासकीय कामकाज करण्यास असमर्थ आहे किंवा कसे याची त्वरीत खात्री करावी व त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी.
जर सरकारी नोकरीत दोघेही नवरा बायको असतील तर त्यापैकी फक्त एकाची इलेक्शन ड्युटी लागेल!
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाने हे निर्देश जारी केले आहेत. पती-पत्नी दोघेही शासकीय सेवेत असल्यास दोघेही निवडणुकीत ड्युटी करणार नसून, लोकसभा निवडणुकीत दोघांपैकी एकच कर्मचारी कर्तव्यावर असेल, असे निर्देशात म्हटले आहे. उत्तर प्रदेश मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाने हे निर्देश जारी केले आहेत. त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज द्यावा लागणार असून त्या आधारे ते एका जोडप्याला कर्तव्यातून मुक्त करण्याचा निर्णय
■ सरकारी सेवेतील दाम्पत्यांच्या अडचणी लक्षात घेता, दोघांपैकी एकाला अर्जाच्या आधारे निवडणूक ड्युटीतून सूट दिली जाईल.
■ सर्व जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची माहिती अधिकारी/सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
■ आयोगाने आपल्या सूचनांची ही प्रत युनायटेड टीचर्स असोसिएशन, मिनिस्ट्रिअल कलेक्टर एम्प्लॉईज असोसिएशन आणि युनायटेड टीचर्स असोसिएशनला पाठवली आहे.
No comments:
Post a Comment