Sanch Manyata 2024-25 Update - संच मान्यता डिसेंबर २०२४ पूर्वी जनरेट करुन शाळांना संच मान्यता मिळणार? आदेश
त्यानुषंगाने शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय संदर्भ क्र. 1, दि.28.08.2015 मधील निकषानुसार सन 2014-15 पासून ऑनलाईन संच मान्यता शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सन 2014-15 च्या संच मान्यतेत गत शैक्षणिक वर्ष 2013-14 मध्ये शिक्षणाधिकारी यांचेमार्फत निर्गमित करण्यात आलेल्या ऑफलाईन संच मान्यतेमधील मंजूर पदे नमूद करण्यात आलेली आहे.
सन 2014-15 ते सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्येमुळे कमी झालेली पदे विद्यार्थी संख्या असल्यास सन 2017-18 मध्ये मंजूर करणेसाठी शासनास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यास अनुसरुन शासन पत्र संदर्भ क्र.3, दि.25.06.2020 अन्वये विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना पूर्वीचीच मंजूर पदे व विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे कमी झालेली पदे विद्यार्थी संख्येनुसार असल्यास 2013-14 मधील मंजूर पदांच्या मर्यादेत सन 2019-20 मध्ये मंजूर करण्याऐवजी सन 2018-19 च्या स्थितीच्या अनुषंगाने मंजूर करण्यास मान्यता दिलेली आहे. शासन पत्र संदर्भ क्र.4, दि. 17.07.2023 नुसार सन 2014-15 ते सन 2021-22 या कालावधीत विविध कारणास्तव संच मान्यता प्रलंबित असलेल्या शाळांच्या सन 2022-23 च्या संच मान्यता आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन मागील लगतच्या झालेल्या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पायाभूत पदांच्या मर्यादेत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे,
उपरोक्त नमूद शासन पत्र दि.25.06.2020 व 17.07.2023 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाईन संच मान्यता दुरुस्ती करतांना काही शाळांना सन 2016-17 च्या संच मान्यतेमध्ये समायोजनाने दिलेल्या शिक्षकांची पदे दर्शविण्यात आली असून सदर शाळांना सन 2014-15 च्या ऑनलाईन संच मान्यतेमधील शै. वर्ष 2013-14 मधील नमूद मंजूर पदांपेक्षा जादा पदे अनुज्ञेय झाली असल्याचे दिसून येते
No comments:
Post a Comment