google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: आगाऊ वेतनवाढ देणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ; दि.18.11.2024

Sunday, November 24, 2024

आगाऊ वेतनवाढ देणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ; दि.18.11.2024

जिल्हा स्तरावरुन पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचे लाभ देणेबाबत , राज्य शासनांच्या ग्रामविकास विभाग मार्फत दि.18 नोव्हेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरचे शासन परिपत्रक हे राज्य शासनांच्या दि.01.07.2022 व दि.06.10.2023 रोजीच्या संदर्भाधिन पत्रानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे . तर सदरचे परिपत्रक हे राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे .

सदरच्या परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सन 2018 पर्यंत ज्या आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्यात आलेला नाही , अशा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना , जिल्हा परिषदेकडे प्राप्त होणाऱ्या ..

स्वनिधीतुन आगाऊ वेतनवाढीपोटी अनुज्ञेय देय होणारी रक्कम तात्काळ अदा करण्याबाबत , शासनांच्या संदर्भाधिन पत्रानुसार , सर्व जिल्हा परिषदांना यापुर्वी कळविण्यात आलेले आहेत . तसेच जिल्हा परिषदेने स्वनिधी अर्थसंकल्पात त्याप्रमाणे तरतुद करावी असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच दि.01.07.2022 व दि.06.10.2023 रोजीच्या पत्रानुसार दिलेल्या सूचना स्वयंस्पष्ट असून , त्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे तसेच सदरच्या प्रकरणी मा.न्यायालयाचा अवमान होणार नाही , याची दक्षता घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे .

No comments:

Post a Comment