हर घर संविधान" अभियान - संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून "घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करणेबाबत नवीन आदेश 22/10/2024
संदर्भ : १. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांकः बीसीएच-२०.क्र.प्र/२४२५९२-शिक्षण/ मंत्रालय विस्तार, मुंबई दिनांक: १०/१०/२०२४
२. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र संकीर्ण २०२४/प्र.क्र.३३४/एसडी-४ दि.२२/११/२०२४
३. शालेय शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.
दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता, तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबददल सर्व नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" साजरा करण्यासाठी संदर्भ क्र १ अन्वये कळविले आहे. तसेच संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" अंतर्गत घ्यावयाचे स्पर्धा व उपक्रम याबाबत विस्तृत सूचना दिलेल्या आहेत.
दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते
व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट होईल.
५. राष्ट्रीय एकात्मताः-
२. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय व अनुदानित वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा / आश्रमशाळा व वसतिगृहे ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था व महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ "घर घर संविधान" साजरा करण्याच्या अनुषंगाने खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ "घर घर संविधान" अंतर्गत घ्यावयाचे स्पर्धा / उपक्रम :-
प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे.
१. शाळा/महाविद्यालय / वसतिगृहे यांच्या दर्शनी भागात संबंधित सर्व विभाग संविधानाची उद्देशिका लावणे
२. शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका/उद्देशिकचे वाचन विद्यार्थ्यांकडून करवून घेणे.
३. शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करवून देणे
४. भारतीय संविधान बाबत सर्वसाधारण माहिती देणे, जसे, निर्मिती, निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषता, कर्तव्ये यावर व्याख्यान (किमान ६० ते ९० मिनिटे)
५. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे, हक्क, आणि यांवर मार्गदर्शन करणे
६. कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्त्वज्ञान आणि मूल्ये समजावून सांगणे.
७. संविधान मुल्ये यावर पथनाट्य तयार करणे
८. शाळा/महाविद्यालयात संविधानाच्या विविध मुद्यांवर फलक, पोस्टर, आणि प्रदर्शन आयोजित करणे
9. संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे, ज्यात पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन याचा समावेश करावा.
No comments:
Post a Comment