मतदान दिवसांच्या सुट्टी मध्ये झाला महत्वपूर्ण बदल
महाराष्ट्र राज्य
शिक्षणालय
महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे ४११००१
दूरध्वनी क्र.: ०२०-२६१२०१४१
ई मेल- educommoffice@gmail.com
क्र. आशिका/प्राथ/१०६/निवडणूक सुट्टी/
दिनांक : १६/११/२०२४
परिपत्रक :
विषय: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुट्टीबाबत
संदर्भ:
१. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे पत्र क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र. ३३२/एसडी-४, दि. १४/११/२०२४
२. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्रमांक आशिका/प्राथ/१०६/निवडणूक सुट्टी/६८६०, दि. १६/११/२०२४
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये क्षेत्रिय स्तरावर दिनांक १८/११/२०२४ व दिनांक १९/११/२०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते.
२/- शासनाच्या संदर्भ क्रमांक १ मधील पत्रान्वये दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत. याबाबतीत असे कळविण्यात येते की, दिनांक १८/११/२०२४ व दिनांक: १९/११/२०२४ रोजी शाळा सुरु राहतील. तसेच उक्त दिवशी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.
३/- केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापतक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरु राहतील.
४/- केवळ उपरोक्त परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी. तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घ्यावी. तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
(सूरज मांदर भा.प्र.से.) अयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग) शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) (सर्व)
प्रत : मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई याना माहितीस्तव सादर
प्रत : संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
प्रत : शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), (प्राथमिक), (योजना), पुणे
No comments:
Post a Comment