google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: Election Duty Updates - मतदान केंद्रांवरील मुक्कामी कर्मचाऱ्यांच्या पार्टीवर नजर ५० टक्के मतदान केंद्रांवर 'वेब कॅमेरे'

Monday, November 4, 2024

Election Duty Updates - मतदान केंद्रांवरील मुक्कामी कर्मचाऱ्यांच्या पार्टीवर नजर ५० टक्के मतदान केंद्रांवर 'वेब कॅमेरे'

 

Election Duty Updates - मतदान केंद्रांवरील मुक्कामी कर्मचाऱ्यांच्या पार्टीवर नजर ५० टक्के मतदान केंद्रांवर 'वेब कॅमेरे

'विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण नुकतेच पार पडले. आता प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदान केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्रांवर 'वेब कॅमेरे' कर्मचाऱ्यांच्या हालचाली व वर्तन टिपणार असल्याने पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जरा सांभाळून राहावे लागणार आहे. कर्मचारी आदल्या दिवशी मतदान केंद्रांवर पोहोचतात. त्यांना रात्र काढणे कठीण होते. त्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचारी पार्टी करताना आढळून आल्याच्या घटना घडल्या होत्या.

बहुतेक मतदान केंद्रावर मनोरंजन म्हणून रात्रीच्या जेवणाला पार्टीचे स्वरूप आलेले असते. त्यातून कधीकधी मतदान केंद्रांवर कर्मचारी मद्य प्राशन करून गोंधळ घालत असल्याचे चित्र दिसून येते. अगोदर ड्राय डे पाळला जातो, हे लक्षात घेऊन काही कर्मचारी त्याची व्यवस्था स्वतःच मतदान केंद्रावर येतानाच करीत असतात. यामुळे काही मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांमध्ये आपसात वाद होत असल्याच्या घटना मतदान केंद्रांवर घडत आहेत



No comments:

Post a Comment