Scholarship Class 5th 8th Maharashtra Update - पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी व पाचवी अर्ज भरण्यास सुरुवात अधिकृत अधिसूचना
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी
, २०२५ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना जाहीर.
शासनमान्य शाळांमधून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.inव https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. १७/१०/२०२४ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
उपरोक्त परीक्षा दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
सोबत :- अधिसूचना
स्वाक्षरीत /- (अनुराधा ओक) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
१५) शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना अनिवार्य बाबी / कागदपत्रे खालीलप्रमाणे :-
१. विद्यार्थ्यांची फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी (jpg/jpeg/png/bmp format मध्ये 100 kb पेक्षा जास्त नसावी.)
उदा.:-
विद्यार्थ्यांचा फोटो
विद्यार्थ्याची स्वाक्षरी
२. विदर्भातील ११ जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.२०,०००/- पेक्षा कमी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र. (इ. ५ वी व इ. ८ वी साठी)
३. विद्यार्थ्याचे पालक रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर व रू.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम अधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे. (इ. ८ वी साठी)
४. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी.
१६) विद्यार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांकाबाबत :-
ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या आधारकार्डशी संलग्न असलेले विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याचे आई, वडील किंवा पालक यांच्या सोबतच्या संयुक्त बँक खात्याची माहिती (विद्यार्थ्याशी नाते, बँकेचे नाव, IFS Code व बँक खाते क्रमांक), उपलब्ध असल्यास नमूद करावा. सदर बाब अनिवार्य नसल्याने बँक खात्याच्या तपशीलाबाबत विद्यार्थी / पालकांवर सक्ती करण्यात येऊ नये.
केवळ सदर माहिती उपलब्ध नाही म्हणून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
No comments:
Post a Comment