मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ या अभियानासाठी पारितोषिकाचा निधी वितरीत करण्यास मान्यता.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक:- ०९ जानेवारी, २०२५
प्रस्तावना:-
संदर्भ क्र.०१ येथील दि.२६.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ हे अभियान राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या अभियानांतर्गत सदर शासन निर्णयान्वये शासकीय शाळा व अन्य व्यवस्थापनांच्या शाळा या दोन्ही वर्गवारींकरिता स्वतंत्रपणे विविध स्तरांवरील विजेत्या शाळांसाठी रु.७३.८२ कोटी इतक्या रकमेची पारितोषिके प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे अभियान पुर्ण झाले असून अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ दि.१४.१०.२०२४ रोजी संपन्न झाला आहे. सदर अभियानांतर्गत शासकीय शाळा व अन्य शाळा या दोन वर्गवारीतून स्वतंत्रपणे विविध स्तरावरील विजेता शाळांना पारितोषिकाची रक्कम प्रदान करण्यासाठी रु. ४९.८५ कोटी इतका निधी सं.क्र.४ येथील शासन निर्णयान्वये वितरीत केला असून उर्वरीत रु.२३.९७ (अक्षरी रु. तेवीस कोटी सत्यान्नव लक्ष) इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा-२ अंतर्गत शासकीय शाळा व अन्य शाळा या दोन वर्गवारीतून स्वतंत्रपणे विविध स्तरावरील विजेता शाळांना पारितोषिकाची रक्कम प्रदान करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
२. या संदर्भात होणारा खर्च "मागणी क्र. ई-०२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१ - प्राथमिक शिक्षण, १०१, शासकीय प्राथमिक शिक्षण, (००) (०१) राज्यात आदर्श शाळा विकसित करणे (कार्यक्रम) (२२०२ जे ०७२)
५०, इतर खर्च" या लेखाशिर्षाखालील सन २०२४-२५ च्या मंजूर तरतूदीमधून भागविण्यात यावा. यासाठी आयुक्त (शिक्षण) यांना नियंत्रक अधिकारी व लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
५. सदरच अनुदान ज्या प्रयाजनासाठा मजूर व वितरात करण्यात आल आह त्याच प्रयाजनासाठा त खच करण्यात यावेत.
६. सदर अनुदान सशर्त असून त्याच्या अटी व शर्ती शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत.
७. सदर शासन निर्णय नियोजन विभागाचा अनौपचारीक संदर्भ क्र. ४६९/२४, दि.२९.११.२०२४ तर वित्त विभागाचा अनौपचारीक संदर्भ क्र.१३८५/व्यय-५, दि.१९.१२.२०२४ व संदर्भ क्र.१४६७/व्यय-५, दि.२७.१२.२०२४ अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागांच्या सहमतीने तथा सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.
८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०१०९१६४१३००७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
No comments:
Post a Comment