PM Poshan Update - प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदुळ प्राप्त, खर्च व लाभार्थी संखेची माहिती सादर करणे बाबत.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदुळ प्राप्त, खर्च व लाभार्थी संखेची माहिती सादर करणे बाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत माहे एप्रिल, २०२४ ते डिसेंबर, २०२४ या कालावधी करीता शाळा, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदांनी नोंदविलेल्या मागणीनुसार १०० टक्के तांदूळ भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामधून उचल करुन शाळा व केंद्रीय स्वयंपाकगृहस्तरावर पुरवठा करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यांना डिसेंबर, २०२४ व जानेवारी, २०२५ करीता तांदुळ नियतन मंजुर करण्यात आलेले आहे.
तथापि शाळा / केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली संस्था तसेच पुरवठादार यांचेकडे शिल्लक असणाऱ्या तांदुळ व धान्यादी मालाचा आढावा न घेता पुढील तांदुळ मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे तांदुळ उचल, वाटप आणि लाभार्थी संख्या यांच्या प्रमाणामध्ये विसंगती आढळून येत आहे. सबब सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यामध्ये सर्व शाळा आणि केंद्रीय स्वयंपाकगृह संस्था यांचेकडून अचूकपणे तांदूळ उचल, वाटप व शाळांस्तरावरील प्रत्यक्ष लाभार्थी संख्या यांची अचूक माहिती संकलित करुन प्राथमिक शिक्षण संचालनालयास दि. १५.०१.२०२५ पर्यंत सादर करण्यात यावी. जेणेकरुन जिल्ह्यांच्या मागणीनुसार पुढील तांदुळ नियतन मंजूर करणे सुलभ होईल. सदर माहिती त्वरीत संकलित करणेकरीता गुगल शीटचा उपयोग करण्यात यावा. जिल्ह्याची शाळानिहाय माहिती संचालनालयाकस सादर करुन नये, तालुकानिहाय एकत्रित माहिती सादर करण्यात यावी,
ज्या जिल्ह्यांची माहिती प्राप्त होणार नाही, अशा जिल्ह्याना पुढील कोणतेहीत तांदुळ नियतन मंजुर करण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी तसेच जिल्ह्यांनी माहिती सादर करण्यात विलंब केल्यास व त्यामुळे तांदूळ नियतन मंजूर करण्यास विलंब झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याची राहील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक).
महाराष्ट्र राज्य, पुणे
वरील माहिती सादर करण्यासाठी पीडीएफ डाउनलोड
वरील परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
No comments:
Post a Comment