1. ज्या शिक्षकांना Deputation दिले आहे ते शिक्षक मूळ शाळेच्या आस्थापनेवर असतात. त्यामुळे त्यांना नवीन शाळेत गुण भरता येणार नाहीत. याकरिता त्या शाळेतील जुन्या शिक्षकांच्या लॉगिन वरून सर्व वर्गांची माहिती भरावी. 

2. यावर्षी दुसरीतील मुले सरल पोर्टलवर तिसरीमध्ये प्रमोशन केल्यास, तिसरी मध्ये विद्यार्थी दिसतील त्याप्रमाणे त्यांची माहिती भरावी. 

3. Chat Bot संदर्भात समस्या नोंदविण्यासाठीची लिंक पत्रामध्ये देण्यात आलेली आहे. लिंक : (https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA

4. इयत्ता नववीचे विद्यार्थी दिसण्याकरिता Swifchat ॲप वरून लॉग आऊट करून पुन्हा रजिस्ट्रेशन करावे. (तांत्रिक अडचण असल्यामुळे) 

5. मोबाईल नंबर चेंज झाला असल्यास शालार्थ पोर्टल, यु डायस प्लस व सरल पोर्टलवर नवीन नंबर अपडेट करावा. यानंतर सात ते आठ दिवसात आपला नवीन नंबर Chat Bot वर अपडेट होईल.

6. सद्यस्थितीत सेवार्थ प्रणाली वरील शिक्षकांना माहिती भरता येत नाही. याबाबत राज्यस्तरावर निर्णय झाल्यानंतर आपणास स्वतंत्रपणे पत्राद्वारे कळविण्यात येईल.


----------------

विद्या समीक्षा केंद्र,

SCERT, महाराष्ट्र, पुणे.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे कार्यालयातून निर्गमित दिनांक 26 जुलै 2024 रोजी च्या परिपत्रकानुसार पायाभूत मूल्यमापन चाचणी महाराष्ट्र चे गुण चॅटबोट वर नोंदवणे बाबत पुढील प्रमाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना निर्देश देण्यात आले आहे.