google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education

Wednesday, August 28, 2024

केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दि. १. ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविणेबाबत...

 

केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दि. १. ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविणेबाबत... 

केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दि. १. ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविणेबाबत... 

 

 महाराष्ट्र शासन


शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे-४११००१.

E-mail Id:- directorscheme.mh@gmail.com

दूरध्वनी क्रमांक :-०२०/२६१२६७२६/२६१२३५१५

शिसंयो/योजना-३/नभासा/साक्षरता सप्ताह/२०२४-२५/1850 प्रति,

दिनांक-२७/०८/२०२४


१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व

२. प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व

३. शिक्षणाधिकारी (प्रामिक/माध्यमिक/योजना) सर्व

४. प्रशासन अधिकारी (म.न.पा./न.पा) सर्व

५. शिक्षण निरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर)


विषयः- केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दि. १. ते ८सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविणेबाबत...

 

संदर्भ:- १. मा. सहसचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक १६/०८/२०२३


२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुबई दि.१४/१०/२०२२


उपरोक्त संदभर्भीय विषयान्वये, देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्याअनुषंगाने संदर्भ क २ अन्वये, केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत "उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम" सन २०२२-२०२७ या कालावधीसाठी अंमलबजावाणी सुरु करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाकडून "जन-जन साक्षर व राज्य शासनाकडून "साक्षरतेकडून समृध्दीकडे" ही घोषवाक्ये देण्यात आलेली आहेत.


संदर्भ क्र.१ नुसार दि. ८ सप्टेबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात दि. १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये "साक्षरता सप्ताह" रावणिबाबत निर्णय केंद्रशासनाने घेतलेले आहे. त्याअनुषंगाने राज्यामध्ये या निर्णयाची प्रभावी अमंलबजावणी करणेबाबत सूचित करण्यात आलेले आहे. सदर साक्षरता सप्ताह दरम्यान उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा लोगो, घोषवाक्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवावेत. विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्फूतीने भाग घेण्यासाठी उत्पनास नवभारत साक्षरता कार्यक्रम mobile app वर स्व- नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. सदरच्या "साक्षरता सप्ताह" कालावधी मध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वार्ड/गाव/शाळा/महाविद्यालय स्तरावर आयोजित करावयाचे उपक्रम या पत्रासोबत संलग्न करण्यात आलेल्या केंद्रशासनाच्या पत्रामध्ये सविस्तरपणे नमूद करण्यात आलेले आहेत.


उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदरच्या "साक्षरता सप्ताह" कार्यक्रमाची आपल्या व आपल्या अधिनस्त यंत्राणाकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. ज्या गावांमध्ये अद्यापही साक्षरता वर्ग चालू झालेले नाहीत. अशा गावांमध्ये प्राधान्याने क्षेत्रिय यंत्रणांमार्फत भेटी देऊन ८ सप्टेबर २०२४ या साक्षरता दिनी वर्ग सुरु करावेत व असाक्षरांचे अध्ययन-अध्यापन प्रभावीपणे चालू ठेवण्यात यावे. तसेच असाक्षरांच्या FLNT परीक्षेसाठी सराव चाचणीद्वारे तयारी करुन घ्यावी. साक्षरता सप्ताहामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचा प्रचार- प्रसार करावा. साक्षरता वर्गातील अध्ययन-अध्यापनासाठी निपुण भारत अंतर्गत साधरणपणे १००० उपलब्ध FLN व्हिडीओ, दिक्षा पोर्टलवर अपलोड केलेल्या FLN संबंधित व्हिडीओ व उज्जास भाग- १.२.३.४ ची मदत घेण्यात यावी.

शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. सर्व यांनी आपल्या जिल्हयामध्ये दिनाक १ सप्टेबर ते ८ सप्टेबर वा कालावधीत घेण्यात येणा-या विविध उपक्रमाची माहिती निवडक फोटो यासह अहवाल दिनांक १०/९/२०२४ रोजी सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील प्रपत्रामध्ये directorscheme.mh@gmail.com या email वर न चूकता सादर करावा, जेणेकरुन केंद्रशासनास सदरची माहिती फोटो सादर करणे सोयीचे होईल.


साक्षरता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमांचा दैनंदिन अहवाल खाली दिलेल्या लिंक मध्ये अचूक नांदवावा.


https://forms.ale/CYEpAiY46FJ5shy77


सहपत्र १) संदर्भीय पत्र क्र.


२) अहवाल प्रपत्र


(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे,


प्रत माहितीस्तव सादर.


१. मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई,


२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.





Saturday, August 24, 2024

Medical Bill Grant Through Shalarth - सन २०२४-२५ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके शालार्थ प्रणाली मधुन ऑनलाइन अदा करता येतील!

 

Medical Bill Grant Through Shalarth - सन २०२४-२५ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके शालार्थ प्रणाली मधुन ऑनलाइन अदा करता येतील!

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देणेबाबत शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य 23 August 2024 चे निर्देश पूढील प्रमाणे. 


संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमापू/शिक्षक-शिक्षकेतर/टि-५/२४-२५/३०४१ दि. १२.६.२०२४.

२) अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्य) संबधित सर्व यांचेकडुन वैद्यकीय देयकाची प्राप्त माहिती.

उपरोक्त विषयास अनुसरून वेतन पथक (माध्यमिक) सर्व यांचेकडे दि. १३/८/२०२४ अखेर प्राप्त वैद्यकीय देयक संख्या व त्यासाठी लागणारी रक्कम याबाबतची माहिती मागविण्यात आली होती.

त्यानुसार वेतन पथक (माध्यमिक) यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सन २०२४-२५ या आथिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्हयाचा संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशीर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२०५५८, २२०२०५७६, २२०२०४६९ मध्ये वैद्यकीय देयके बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरची वैद्यकीय देयके आपल्या कार्यालयास प्राप्त आवक क्रमांकानुसार तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व नियमाप्रमाणे अदा करावी. (दिन् ३०/९/ 2028 अखेरपर्यंत) उपरोक्त वैद्यकीय देयके अदा करताना नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री करूनच संबंधित वेतन पथक यांनी देयके अदा करावीत. सन २०२४-२५ मध्ये प्रशासकीय मान्यता/पुनर्मान्यता मिळालेली थकीत देयके अदा करण्यात नेऊ नये तथापि लेखाशीर्ष २२०२१९४८, २२०२१९०१ व २२०२एच९७३ मध्ये पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने सदर लेखाशीषाअंतर्गत वैद्यकीय देयके शालार्थमधून ऑनलाईन अदा करण्यात येऊ नये.


(संपत सुर्यवंशी) 

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)


प्रत- माहितीस्तव सविनय सादर.

१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१

प्रत- माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी.

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२) जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व




सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके शालार्थ प्रणाली मधुन ऑनलाइन अदा करण्या बाबत शिक्षण संचालक यांचे दि 1 डिसें 2023 रोजीचे निर्देश.. 


दि. २६/१०/२०२३ रोजी व्हीसीमध्ये वैद्यकीय प्रतिपुती देयके अदा करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाकडून लेखाशीर्षनिहाय मागणी करण्यात आली होती. तसेच विविध संघटनेकडून मागणी करण्यात आली होती.


जुनी पेन्शन नाहीच! एनपीएसच्या ऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा केंद्रीय कॅबिनेटचा निर्णय!

 

जुनी पेन्शन नाहीच! एनपीएसच्या ऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा केंद्रीय कॅबिनेटचा निर्णय!

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरत असतानाच आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने आता नवीन पेन्शन योजना अर्थात एनपीएसच्या ऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे. या एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली आहे.

या नविन योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर निवृत्तीपूर्वीच्या नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल.

जर एखाद्या निवृत्तीवेतनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्याच्या मृत्यूपर्यंत मिळालेल्या पेन्शनपैकी 60 टक्के रक्कम मिळेल. 10 वर्षांनंतर कोणी नोकरी सोडल्यास त्याला 10,000 रुपये पेन्शन मिळेल. युनिफाईड पेन्शन योजनेचा सुमारे 23 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.


काय आहे नवीन योजना?

जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान 50 टक्के रक्कम मिळणार

पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी 60 टक्के रक्कम मिळते. 





Friday, August 23, 2024

विषय : संचमानिता वर्ष २०२४-२०२५ बाबत..

 प्रति,


1. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)


2. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद (सर्व)


विषय : संचमानिता वर्ष २०२४-२०२५ बाबत..


संदर्भ: सरकारी पत्र क्रमांक न्यायप्र-२०२४/प्र.सं.१६७/टीएनटी-२, दिनांक १२.०७.२०२४


वरील संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद यांच्या रिट याचिका क्र. 2822/2024 आणि रिट याचिका क्र. 5472/2024 मधील दिनांक 12.06.2024 च्या आदेशानुसार. न्यायालयाच्या दिनांक 15.03.2024 च्या रिट याचिका क्रमांक 2896/2024 मधील आदेशाच्या परिच्छेद 5 मधील निर्देशानुसार, सरकारने संदर्भ पत्राद्वारे निर्देश जारी केले आहेत. 2/- 15.03.2024 च्या शासन निर्णयानुसार मान्यताप्राप्तीसाठी सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत. तसेच 15.03.2024 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि शिक्षकांच्या शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये.


भावी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.


3/- आधार वैध गुणाकार विचारात घेऊन दिनांक 30.09.2024 च्या शासन निर्णयानुसार आणि


सुधारात्मक कारवाई करण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तथापि, वर्ष 2024-


2025 साठी 'सरलीकृत' प्रणालीमध्ये विहित कालावधीत सामान्य मान्यता आवश्यक असलेली माहिती


सर्व शाळांना 30.09.2024 पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. 'सरलीकृत' प्रणालीमध्ये विद्यार्थी पदोन्नती


शाळा प्रोफाइल माहिती, रिक्त जागा माहिती, 'सरलीकृत' प्रणालीमधील विद्यार्थी स्थलांतर माहिती, विद्यार्थी माहिती


आधार प्रमाणीकरण आणि इतर आवश्यक प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण केल्या पाहिजेत. यामध्ये विलंब झाला तर


संबंधितांची जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी.


(शरद गोसावी) शिक्षण संचालक


परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

                         Download


शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत शासन निर्णय ashaikshanik kame shasan nirnay

शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत शासन निर्णय ashaikshanik kame shasan nirnay

प्रस्तावना:बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्यातील सर्व मुलांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षातून प्राथमिक वर्गासाठी किमान २०० दिवस आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान २२० दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे. असे असूनही शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जातात व या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासावर बाधक परिणाम होत असून, अशैक्षणिक कामे न देण्याबाबत विविध संघटना यांची प्राप्त होणारी निवेदने तसेच, विधिमंडळ सदस्य यांचेकडून याबाबत अधिवेशनात विविध आयुधांमार्फत होत असलेली मागणी विचारात घेता, याअनुषंगाने सविस्तर अभ्यासपूर्वक चर्चा करुन यासंदर्भात निर्णय घेण्याच्या दृष्टीने शासन निर्णय दि.०६.०९.२०२३ अन्वये प्रधान सचिव (शालेय शिक्षण) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीची दि.२४.११.२०२३ रोजी बैठक पार पडली असून, समितीने शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करुन शासनास अहवाल सादर केलेला आहे. यास्तव शैक्षणिक व अशैक्षणिक काम कोणते, याबाबतची स्पष्टता राज्यातील सर्व शिक्षक तसेच इतर संबंधित यंत्रणा यांना व्हावी, याकरीता शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करुन ते सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत :

१. अशैक्षणिक कामे म्हणजे ज्याचा शिक्षण विभागाशी संबंध नाही किंवा अन्य विभागाकडे परंपरागतरित्या जी कामे शिक्षकांना सांगितली जातात, अथवा जी डाटा एन्ट्री जिचा थेट शिक्षकांशी संबंध नाही, अथवा यासाठी अन्य साधने वापरून जी पूर्ण केली जाऊ शकतात, अशा प्रकारच्या कामांना अशैक्षणिक कामे समजण्यात यावीत.

२. ज्या बाबीचा शिक्षण या बाबीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध आहे, अशा सर्व बाबी शैक्षणिक बाबी समजण्यात

याव्यात. ३. याअनुषंगाने सोबतच्या परिशिष्ट “अ” येथे शैक्षणिक कामे नमूद करण्यात येत असून, शिक्षक वर्गानी सदर शैक्षणिक कामे करणे आवश्यक राहील.

४. शैक्षणिक कामांव्यतिरिक्त परिशिष्ट “ब” येथे अशैक्षणिक कामे नमूद करण्यात येत आहेत. ५. सदर अशैक्षणिक कामे शासनाच्या कोणत्याही विभागाकडून शिक्षकांना बंधनकारक करण्यात येऊ नयेत.

६. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम २७ खाली परिशिष्ट- क येथे नमूद केलेली दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारणाची कामे व स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधीमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणूकांची कामे ही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त येणारी कामे शिक्षकांनी करणे अनिवार्य राहील.

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

                    Download

Wednesday, August 21, 2024

राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत शासन निर्णय

 

राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत शासन निर्णय

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/ विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अलिकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बाबीची शासनस्तरावर गंभीर दखल घेण्यात येत आहे. वस्तुतः शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनासंदर्भात शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने, या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाही. अस्तित्त्वात असलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.


शासन निर्णय :-

अ) शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे :-

1) शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे.

I) खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिना कालावधीत शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहील. या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल. यामध्ये प्रसंगपरत्वे शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गाचा देखील अवलंब करण्यात येईल.

III शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत, अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसविण्याबाबत कार्यवाही करावी. संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजना (DPC) अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयान्वये ज्या योजनांसाठी हा निधी वापरण्यास मुभा आहे, त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. यात पायाभूत सुविधांचे निर्माण या घटकाचा देखील समावेश आहे. त्यामुळे या घटकांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ५ टक्के प्रमाणात राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर करता येईल. अशी कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल.

IM) शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे पुरेसे नसून, ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे. असे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकाची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल. मुख्याध्यापकाने आठवड्यातून किमान तीन वेळा अशी तपासणी करणे आवश्यक राहील. याबाबत शाळेमध्ये कंट्रोल रुम असावी. मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील.


ब) शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी :-

1) शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे.

II) नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्यस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पध्दतीने ज्या नेमणुका केल्या जातात जसे सुरक्षारक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूल बसचे चालक, इ. बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे. यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील, नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी.

1) शाळांमध्ये बाह्यस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पध्दतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.

क) तक्रार पेटी :-

) शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याबाबत संदर्भ क्र. १ येथील शासन परिपत्रकान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन / क्षेत्रीय यंत्रणा यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात सदर परिपत्रकान्वये सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि या तक्रार पेटींचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहेत किंवा कसे, याची तपासणी होणेदेखील तितकेच आवश्यक आहे.

1) सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता तक्रार पेटी बसविणे व त्यासंदर्भात संदर्भ क्र. १ येथील परिपत्रकातील तरतुदींचे पालन करणे अनिवार्य आहे. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल. यात कसूर झाल्याचे आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

ड) सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे अनुपालन :-


शाळा, केंद्र, तालुका/शहर साधन केंद्र या स्तरांवर संदर्भ क्र. २ येथील शासन परिपत्रकान्वये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे. सदर परिपत्रकान्वये या समितीने करावयाची कार्ये तपशीलवारपणे नमूद करण्यात आली आहेत. राज्यात प्रत्येक स्तरावर गठित करण्यात आलेल्या समित्यांनी त्यांना नेमून दिलेली कार्ये विहित कालावधीत पार पाडणे आवश्यक आहे. याबाबतचा आढावा विशेषत्वाने विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात घेणे महत्वपूर्ण आहे.


इ) विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन :-


) शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात. समाजाचा अशा घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो व अशा घटनांचे विपरित परिणाम विद्यार्थी, त्यांचे कुटूंबीय व संपूर्ण समाजावर देखील होत असतो. अशा अनुचित प्रकारांचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे.

ज्याप्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैगिक छळाबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने POSH Act २०१३ या कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्याचप्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी अशा उपाययोजना होणे आवश्यक आहे. यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षणाधिकारी यांच्यास्तरावरुन एक आठवड्यात करावे, अशी समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करुन


त्यांच्या समस्या समजावून घेऊ शकेल.


फ) राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती :-


) उपरोल्लेखित अ, ब, क व ड येथे नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनांचा राज्यस्तरावर आढावा घेण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती गठित करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे :-


आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे

अध्यक्ष

राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

शिक्षण संचालक (प्राथमिक)

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) 

आयुक्त (शिक्षण) यांनी नामनिर्देशित केलेल्या शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या गट-अ मधील दोन महिला अधिकारी

सहसंचालक (प्रशासन), आयुक्त (शिक्षण) कार्यालय

सदस्य सचिव

1) उपरोक्त अ, ब, क व ड येथे नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनांचा ठराविक कालावधीत आढावा घेणे आवश्यक आहे. गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांनी अनुक्रमे महिन्यातून एकदा व दोन महिन्यातून एकदा या उपाययोजनांचा आढावा घ्यावा. यासाठी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे व पालकांचे जबाब नोंदवावेत. याबाबतचा अहवाल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीस सादर करावा.

III) राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीने तीन महिन्यातून एकदा शैक्षणिक विभागनिहाय उपरोक्त उपायायोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा व त्याबाबतचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा. याबाबतची जबाबदारी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांची राहील.

२. शाळेमध्ये विद्यार्थ्यासोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन / संस्था/मुख्याध्यापक/शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब चोवीस तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी. अशी अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निर्देशनास आल्यास, 

संबंधित व्यक्ती/संस्था गंभीर शास्तीस पात्र ठरतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२४०८२११५१४३४५८२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(प्रमोद पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

                       Download

Tuesday, August 20, 2024

सखी सावित्री मंच स्थापनेबाबत- शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी चे नवीन निर्देश

 

सखी सावित्री मंच स्थापनेबाबत- शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी चे नवीन निर्देश

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी राज्याच्या शिक्षणाची राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रारपेटी बसवण्याबाबत व सती सावित्री समिती गठित करण्याबाबत निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकांच्या अंमलबजावणी बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


महोदय,


राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी / विद्यार्थीनोंच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून गज्यानीन्न शाळांमध्ये "तक्रारपेटी" बसवण्याबाबत संदर्भ क्र. १ येथील दिनांक ०५ मे, २०१७ च्या शासन परिपत्रकानुसार निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला- मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समता मुलक वातावरण निर्मितीसाठी संदर्भ क्र. २ येथील दिनांक १० मार्च. २०२२ च्या शासन परिपत्रकान्वये विविध स्तरावर "सखी सावित्री" समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये संदर्भाधीन क्र. १ व २ येथोल शासन परिपत्रकानुसार करण्यान आलेल्या कार्यवाहीयावतची सद्यस्थिती शासनास तात्काळ सादर करण्यात यावा. तसेच ज्या शाळांमध्ये सदर परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यात आलेली नसेल, त्या शाळांमध्ये पुढील आठ दिवसात कार्यवाही करण्याच निर्देश आपल्यास्तरावरून संबंधितांना देण्यात यावेत. विहित मुदतीनंतरही संदभर्भाधीन शासन परिपत्रकांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या संबंधितांवर यथायोग्य कारवाई करण्यात यावी, ही विनंती.

सखी सावित्री मंच स्थापनेबाबत- 

शासन निर्णय 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठण करणे बाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.

सदर सत सावित्री समितीही स्तरावर वेगवेगळी असणार आहे ती शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षच या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Download